पेट्रोल स्कूटरच्या किंमतीमध्ये मिळतेय बजाज चेतक 2901

Most Affordable Chetak Yet: 2901 Blue Line Launched At Rs 95,998

बजाजची आत्तापर्यंतची सर्वात स्वस्त किंमतीमध्ये मिळणारी स्कूटर लाँच झाली आहे. 2901 ब्लू लाइन ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 100 किमी पेक्षा जास्त रेंज देत असून आकर्षक रंग आणि किफायतशीर किंमतीमध्ये म्हणजे अगदी 1 लाखाच्या आतील किंमतीमध्ये ही स्कूटर उपलब्ध होणार आहे. 

तुम्ही जर कुटुंबासाठी एखादी चांगली रेंज देणारी पण स्वस्तात मस्त अशी इलेक्ट्रिक स्कूटर शोधत असाल तर बजाजने तुमच्यासाठी उत्तम पर्याय सादर केला आहे; 2901 ब्लू लाइन. बजाजच्या आत्तापर्यंतच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या  यादीतली ही स्कूटर लोंग रेंजसोबत चांगल्या फिचर्सने भरलेली सर्वात स्वस्त स्कूटर म्हणून ओळखण्यात येणार आहे. ओला येस-वन एयरची प्रतिस्पर्धी असणाऱ्या ह्या 2901 ब्लू लाइन स्कूटरची किंमत 96 हजार रुपये इतकी आहे. संपूर्ण भारतामध्ये जवळजवळ 500 शोरूममध्ये ही स्कूटर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

2901 ब्लू लाइन

ही स्कूटर रोजच्या आयुष्यात उपयोगी पडण्यासाठी आणि अधिक टिकाऊ बनण्यासाठी स्कूटरची बॉडी मेटल मटेरियलपासून बनवण्यात आली आहे. रिव्हर्स, स्पोर्ट आणि इकॉनॉमी मोड, TecPac हिल होल्ड, कॉल-म्युझिक कंट्रोल, फॉलो मी होम लाइट्स, इन्हान्स्ड ब्लूटूथ ॲप कनेक्टिव्हिटी, कलर डिजिटल कंसोल, ब्लूटूथ कनेक्टिविटी, आलोय व्हिल्स सारखे स्कूटरला चालवणाऱ्या व्यक्तीला आराम मिळेल आणि प्रवासात उपयोगी पडतील असे फिचर्स देण्यात आले आहेत. ही स्कूटर लाल, पांढरा, काळा, लाइम यलो आणि अझर ब्लू या आकर्षक रंगामधून उपलब्ध होणार आहे. या स्कूटरची किंमत 95,998 रुपये आहे. ही स्कूटर एका चार्जमध्ये 123 किमी इतकी रेंज देते.

बजाज चेतकचे आता तीन मॉडेल्स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध

आत्तापर्यंत चेतकचे दोन वेरिएंट्स बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत- चेतक अर्बने आणि चेतक प्रीमियम. या दोन्ही स्कूटर 100 पेक्षा अधिक रेंज एका चार्जमधून पुरवतात. चेतक अर्बने या स्कूटरमध्ये 2.9 kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे,जो एका चार्जवर 113 किमी रेंज देतो आणि चेतक प्रीमियममध्ये 3.2 kWh बॅटरी पॅक मिळतो जे एका चार्जवर 126 किमी इतकी रेंज देतो. चेतकच्या अर्बने या व्हेरिएंटची किंमत 1.23 तर चेतक प्रीमियमची किंमत 1.47 लाख रुपये इतकी आहे. बजाजच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये टर्न-बाय-टर्न नॅविगेशन, कॉल-म्यूजिक, कस्टमाईझ थीम, इलेक्ट्रॉनिक हॅंडल, स्टिअरिंग लॉक सारखे इतर एडवांस्ड फिचर्स दिले आहेत, आणि आता 2901 ब्लू लाइन ही स्कूटरसुद्धा दैनंदिन वापरासाठी उपलब्ध झाली आहे.

बजाजच्या स्कूटरची 1 लाख युनिटची विक्री

बजाजने 2023 मध्ये 32,829 इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली होती तर 2024 वर्षात 1,07,069 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या. मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 226 टक्क्याने बजाजने यंदा जास्त विक्री केली आहे. बजाजच्या सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बजाज चेतक नाव आवर्जून येत, या बजाज चेतकच्या 14,144 युनिट्स विकल्या गेल्या आहेत.

तुम्हाला पडलेले प्रश्न

बजाजची आत्तापर्यंतची सर्वात स्वस्त कोणती?

 2901 ब्लू लाइन ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 100 किमी पेक्षा जास्त रेंज देत असून या स्कूटरची किंमत 95,998 रुपये आहे.

2901 ब्लू लाइनची रेंज किती आहे? 

2901 ब्लू लाइन स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर 123 किमीचा पल्ला गाठू शकते.

चेतक इलेक्ट्रिकचा टॉप स्पीड किती आहे?

नवीन चेतक प्रीमियम 2024 चा टॉप स्पीड ७३ किमी प्रतितास असून एका चार्जमध्ये ही स्कूटर 126 किमी इतकी रेंज देते.

2024 मध्ये कोणती स्कूटी-स्कूटर खरेदी करायची?

तुम्ही जर स्वस्तात चांगली रेंज आणि मजबूत बॉडी असणारी स्कूटर शोधत असाल तर बजाजची नवीन 2901 ब्लू लाइन स्कूटर तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

बजाज चेतक वॉटरप्रूफ आहे का?

हो.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment