एथर रिझताचे बुकिंग करा घरबसल्या, तेही पूर्णपणे रिफंडेबल. ही वाचा माहिती

Ather Rizta electric scooter booking

तुम्हीसुद्धा Ather Energy ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Rizta ची चर्चा ऐकून या स्कूटरचे बुकिंग करायला किंवा टेस्ट-ड्राइव करायला चालला आहात का? मग थांबा यासाठी तुम्ही शोरूममध्ये जायची अजिबात गरज नाहीये, चक्क घरबसल्या तुम्ही या एथर एनर्जीच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचे घरबसल्या बुकिंगच काय तर संपूर्ण माहिती मिळवू शकता. खालील लेखात रिझाटा स्पेसिफिकेशन्स-फिचर्स,किंमत, रंगसोबत रिझाटा स्कूटरचे रिफंडेबल बुकिंग कसं करायचं? या सर्व बाबींची संपूर्ण माहिती देत आहे.

तुम्ही जर पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत एखादी चांगली इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेण्याच्या विचारात असाल तर एथर रिझता ही स्कूटर तुमच्यासाठी सर्वात उत्तम पर्याय ठरू शकते. एथर रिझता स्कूटर 1. 5 लाखपेक्षा कमी किंमतीमध्ये मिळत असून आत्तापर्यंतच्या सर्वात मोठी सीट असणारी इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून ओळखण्यात येत आहे. रिझताचे बुकिंग सुरू झाले असून स्कूटर बुक करण्याची प्रक्रिया अतिशय सोप्पी आहे. नवीन डिझाइन आणि फीचरसोबत रिझता लाँच झाल्याने एथर स्कूटरच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे.

तुमची रिझता बुक करा

सियासेन व्हाइट, पानगोंग ब्लू आणि डेक्कन ग्रे या तीन रंगामधून ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही विकत घेऊ शकता. एथरच्या मूळ वेबसाइटवरून तुम्ही या स्कूटरचे बुकिंग अगदी आरामात घरी बसून करू शकता. या स्कूटरचे तीन व्हेरिएंट तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. रिझता एस जिची रेंज 123 किमी असून 2.9 kWh बॅटरी पॅक असणाऱ्या या अथर व्हेरिएंटची किंमत ₹ 1,09,999 रुपये इतकी आहे. रिझता झेडची रेंज 123 किमी असून 2.9 kWh बॅटरी पॅक असणाऱ्या या व्हेरिएंटची किंमत ₹1,24,999 इतकी आहे. पुन्हा रिझता झेडची रेंज 159 किमी असून 3.7 kWh बॅटरी पॅक असणाऱ्या या अथर व्हेरिएंटची किंमत ₹ 1,44,999 रुपये इतकी आहे. ₹ 999 रुपये स्कूटरची पूर्णपणे परत करण्यायोग्य बुकिंग अमाऊंट आहे. (Fully refundable amount)

अथर व्हेरिएंटबॅटरी पॅक किंमत
रिझता एस2.9 kWh1,09,999 रुपये
रिझता झेड2.9 kWh1,24,999 रुपये
रिझता झेड3.7 kWh 1,44,999 रुपये

एथर रिजटा तपशील

रिझता येसमध्ये 105 किमी रेंज देणारी 2.9 kWh बॅटरी देण्यात आली आहे तर रिझता झेडमध्ये सुद्धा 105 किमी रेंज देणारी 2.9 kWh बॅटरी पॅकसोबत 3.7 kWh बॅटरी जी 125किमीचा पल्ला पार करू शकते अशी बॅटरी देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्समधल्या बॅटरी पॅकना 5 वर्ष किंवा 60,000 किलोमीटरची वॉरंटी देण्यात आली आहे. एकूण 56 लीटरची बूट- स्पेस असणाऱ्या या स्कूटरला 900 मिमी इतकी लांब सीट दिली गेली असून, ज्यामध्ये किराणा, दैनंदिन आयुष्यात गरजेच्या असणाऱ्या सर्व वस्तू आरामात मावू शकतील अशी स्पेस देण्यात आली आहे. ही सीट आतापर्यंच्या इतर कोणत्याही स्कूटरच्या तुलनेत 34 लिटरची अंडर स्टोरेज असणारी मोठी सीट आहे. ह्या स्कूटरमध्ये 12 इंचाचे टायर दिले आहेत. स्कूटरमध्ये स्मार्ट, इको मोड आणि झिप मोड दिले आहेत. रिझतामध्ये इतर एडवांस्ड फिचरसोबत डिपव्यु LED डिस्प्ले, पार्क असिस्ट, टच- स्क्रिन सोबत TFT डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, ब्लूटूथ कनेक्टिविटी आणि नॅविगेशन सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

Ather Rizta ची किंमत किती आहे?

एथर रिझता स्कूटर 1. 5 लाखपेक्षा कमी किंमती असून ही किंमत व्हेरिएंट नुसार अवलंबून आहे.

अथर रिझ्टा ची श्रेणी/ रेंज किती आहे?

रिझता झेडची रेंज 123 किमी आणि रिझता झेडची रेंज 159 किमी इतकी आहे.

EV Rizta ची किंमत किती आहे?

या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1,09,999 रुपये पासून सुरु होते.

Ather rizta खरेदी करणे योग्य आहे का?

तुम्ही जर एक फॅमिली स्कूटर शोधत असाल तर Ather rizta खरेदी करणे योग्य आहे.

कोणते Ather मॉडेल सर्वोत्तम आहे?

या कंपनीचे सर्व स्कूटर बेस्ट स्कूटर म्हणून नावाजन्यात आले असून, एथर रिझता स्कूटर 1. 5 लाखपेक्षा कमी किंमतीमध्ये मिळत असून आत्तापर्यंतच्या सर्वात मोठी सीट असणारी इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून ओळखण्यात येत आहे.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment