शेवटी कॉमेडियन अनुभव सिंग बस्सीने जाहीर केलंच Ather Rizta सोबतच नातं, जाणून घ्या एथर रिझटाचे अपडेटेड फीचर्स

Ather Rizta Revealed By Comedian Anubhav Singh Bassi: भारतामध्ये टॉप 10 इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये आवर्जून घेतलं जाणारं नाव एथर रिझटा आणि आता लोकप्रिय कॉमेडियन अनुभव सिंग बस्सीसुद्धा या इलेक्ट्रिक स्कुटरचा वापरकर्ता झाला आहे. नुकतीच सोशल मीडियावरून खुद्द अनुभव सिंग बस्सीने या बातमीची पुष्टी दिली असून, चला जाणून घेउया, एथर रिझटा फीचर्स, किंमत आणि अनुभव सिंग बस्सीची इंस्टाग्राम पोस्ट बद्दल अधिक माहिती

फॅमिली ओरिएंटेड आणि लॉन्ग रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कुटर म्हणजे एथर रिझटा. सध्याची-जनरल एथर 450 स्कूटर आणि एथर रिझटा दोन्ही इलेक्ट्रिक स्कुटर एकाच प्लॅटफॉर्मवर बनलेल्या आहेत, तरीही एथर 450 स्कुटरच्या तुलनेत या एथर रिझटामध्ये चांगली रेंज आणि परफॉर्मन्स असण्याची अपेक्षा मांडली जातेय.

वाचा: मारुती जिम्नी भारी पडली इंडिनेशियाच्या मार्केटवर

Ather ritza 1

कॉमेडियन अनुभव सिंग बस्सीच्या पोस्टमध्ये एथर एनर्जीचा उल्लेख

एथर रिझटा बाबत स्टॅन्ड-अप कॉमेडियन अनुभव सिंग ने लिहिले;  बस्सी ये है मेरा नया #रिझता. अथेर का नया फॅमिली स्कूटर. किसी को बताना चटई पर मैने तो टेस्ट राइड लेली है. आपके और आपके परिवार के जल्द ही नई रिज़्टा की सवारी करने का इंतज़ार नहीं कर सकते। #RishtaNahiRizta #Rizta

एथर रिझटामध्ये अडवान्सड बॅटरीचा समावेश

एथर Rizta मध्ये अडवान्सड बॅटरी सिस्टमसह जोडलेली हाय परफॉर्मेंस इलेक्ट्रिक मोटर जोडली जाणार आहे; ज्यामुळे स्कुटर हाय-स्पीड आणि कमालीची रेंज प्रदान करेल. एथर रिझटा दैनंदिन प्रवास आणि बिझी रोड म्हणजेच शहरातील राइड्ससाठी उत्तम पर्याय ठरू शकणार आहे.

वाचा: ‘स्वस्तात मस्त’ टाटाची Altroz Racer

एथर रिझटामध्ये हे अपडेटेड फीचर्स असणार

रिझटा मधल्या फीचर्समध्ये स्पेस भरपूर देण्यात आली आहे. अपेक्षित फीचर्समध्ये प्रशस्त फ्लोअरबोर्ड, डिजिटल क्लस्टर, टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट कन्सोल, अलॉय व्हील, फ्रंट डिस्क ब्रेक, स्टायलिश एलईडी लॅम्प, राइडिंग मोड , फास्ट चार्जिंग आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी यांचा समावेश आहे.

वाचा: महिंद्रा इलेक्ट्रिक थार देते, 400 किमीपेक्षा जास्त रेंज

एथर इलेक्ट्रिक स्कुटरसाठी चार्जिंग स्टेशनसुद्धा तयार

भारतात नाही तर संपूर्ण जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचे महत्व उमगले आहे हे काही नव्याने सांगायची गरज नाहीये, इलेक्ट्रिक स्कुटरचा वाढता वापर लक्षात घेता भारतमध्ये इलेक्ट्रिक स्कुटरसाठी चार्जिंग स्टेशन जागोजागी बनवण्यात आले आहेत, ज्यामुळे इ- स्कुटर वापरकर्त्यांची गैरसोय टाळू शकेल. एथरमुळे भविष्य हिरवे, अधिक सुलभ होण्यास खूप मदत होत आहे. हे चार्जिंग स्टेशन तुम्ही तुमच्या मोबाईल इंटरनेटवर अथवा एथर अँपवर सहज मिळू शकतात.

एथर रिझटा किंमत

एथर लाइनअप तुलनेत अधिक आकर्षक असणारी हि स्कुटर २०२४ मध्ये लॉन्च होणार असून या इलेक्ट्रिक स्कुटरची तुलना TVS iQube आणि Bajaj Chetak Premium होत आहे  Rizta ची अंदाजे किंमत रु. 1.25 लाख (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता मंडळी जातेय.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment