Bajaj Chetak Premium 2024 – पहा नवीन चेतकची ऑन-रोड किंमत, फीचर्स आणि न सांगितलेल्या गोष्टी

अनेक दिवसांपासून Bajaj Chetak Premium 2024 बद्दल लोकांचे कुतूहल वाढले होते आणि अंततः हि गाडी लाँच करण्यात आली आहे. तुम्ही जर पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, बीड, नागपूर, मुंबई, रायगड, रत्नागिरी या शहरांत चेतक ची Road Price आणि फीचर्स ची माहिती घेऊ इच्छित आहात तर हा लेख तुमची सर्व मदत करेल.

ठळक मुद्दे –

  • बजाज चेतक प्रीमियम २०२४ मॉडेल ५ जानेवारी रोजी लाँच
  • १.३५ लाख रुपयांपासून किंमत सुरु
  • पूर्वीपेक्षा ११ टक्के अधिक बॅटरी

बजाज चेतक प्रीमियम २०२४ फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि व्हेरिएंट्स

५ जानेवारी २०२४ रोजी सर्व भारतात बजाज सिनेट प्रीमियम २०२४ मॉडेलचे अनावरण करण्यात आले आहे. हे मॉडेल पूर्वी पेक्षा अधिक शक्तिशाली आणि फीचर्स ने समृद्ध असणार आहे. जुन्या मॉडेल मध्ये असणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारींना गांभीर्याने घेऊन बजाज ऑटो ने नवीन गाडीमधे अनेक बदल केले आहेत ज्यामधे डिस्प्ले, बॅटरी आणि मोटर मध्ये अपग्रेडस केले आहेत.

01
Bajaj Chetak Premium 2024

डिस्प्ले – 

नवीन चेतक प्रीमियम मध्ये गोल ऐवजी आयताकृती कलरफुल TFT डिस्प्ले दिला गेला आहे जो पूर्वी पेक्षा अधिक प्रखर आणि एक्ससायटींग आहे. या डिस्प्ले मध्ये नेव्हिगेशन, नोटिफिकेशन्स, मेनू आणि मुसिकचे ऑपशन्स दिले आहेत या व्यतिरिक्त गाडीच्या बॅटरीची हेल्थ, ट्रिप, इफिशिअन्सी, सॉफ्टवेअर व्हर्जन, थीम सेट करणे, ब्राईटनेस अड्जस्ट करणे असे ऑपशन उपलब्ध आहेत. या सर्व सेटिंग्स बदलण्या करिता बटन्स पूर्वी पेक्षा अधिक मोठे आणि ऍडव्हान्स दिले आहेत.

04
Bajaj Chetak Premium 2024

मोटर आणि बॅटरी – 

चेतक २०२४ मध्ये ३.२ kwh लिथियम अयन बॅटरी दिली आहे. पूर्वी २.८८ kwh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला जात असे. नवीन अपडेट मुळे ११ टक्के बॅटरी पॅक मिळणार आहे ज्यामुळे १०८ किमी रेंज ऐवजी १२७ किमी सर्टिफाईड रेंज मिळेल, खऱ्या आयुष्यात रोड वर १०५ किमी रेंज नवीन मॉडेल ला मिळणार आहे. मोटर देखील ३.८ kw वरून अपग्रेड करत ४.० kw करण्यात आली आहे ज्याने ७३ किमी/तास चे टॉप स्पीड मिळणार आहे.

व्हेरिएंट – 

बजाज ने अर्बन २०२४ मॉडेल प्रमाणे या मॉडेल मध्ये देखील स्टॅंडर्ड आणि टेकपॅक असे व्हेरिएंट दिले आहेत. स्टॅंडर्ड मध्ये सगळे फॅक्टरी सेट फीचर्स असतील जसे कि ७३ किमी/तास चे टॉप स्पीड, १२६ किमी रेंज, ड्राइव्ह आणि रिव्हर्स मोड, Mono chrome TFT डिस्प्ले आणि लिमिटेड अँप कनेक्टिव्हिटी. पण ९ हजार रुपये एक्सट्रा देऊन तुम्ही टेकपॅक खरेदी केलात तर त्यामध्ये इको सहा स्पोर्ट मोड मिळणार, हिल असिस्ट, कलर डिस्प्ले फुल अँप कनेक्टिव्हिटी इत्यादी.

03
Bajaj Chetak Premium 2024

 

वाचा – बजाज ऑटो ने बंद केली लोकप्रिय चेतक इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या कारण

कलर ऑपशन्स – 

प्रीमियम २०२४ मध्ये ३ कलर्स उपलब्ध असतील ज्यामध्ये (Indigo Blue) निळा, (Brooklyn Black) काळा आणि (Hazelnut) सोनेरी. स्टॅंडर्ड आणि टेकपॅक दोन्ही व्हेरिएंट मध्ये हे कलर सेम असतील.

045
Bajaj Chetak Premium 2024

वाचा – Electric Honda Activa: ठरलं! या तारखेला लाँच होणार इलेकट्रीक होंडा ऍक्टिवा

चार्जर आणि वेळ – 

नव्या व्हेरिएंट मध्ये ६५० वॅट ऑन-बोर्ड चार्जर दिला असून हा चार्जेर गाडीला फक्त ४ तास ३० मिनिटांत फुल चार्ज करतो. ऑन-बोर्ड चार्जर म्हणजे गाडीच्या आतमध्येच चार्जर फिट असेल त्याला काढणे किंवा हाताळणे शक्य नसेल. या चार्जरला अर्थिंग कंपलसरी असेल.

Bajaj Chetak Premium 2024 Road Price in Maharashtra

बजाज चेतक प्रीमियम २०२४ च्या स्टॅंडर्ड आणि टेकपॅक च्या किंमती मध्ये बॅटरी पॅक मध्ये बदल केल्याने वाढ झालेली आहे. प्रीमियमच्या स्टॅंडर्ड मॉडेल ची एक्स शोरूम किंमत ₹१,३५,४६३/- आणि टेकपॅक व्हेरिएंट ची एक्स शोरूम किंमत ₹१,४४,४६३/- रुपये आहे.

02
Bajaj Chetak Premium 2024

बुकिंग कशी करावी – 

तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने ₹२,००० देऊन गाडी बुक करू शकता. बाकीच्या प्रोसेस साठी तुम्हाला शोरूम कडून कॉल येईल. जर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यात वास्तव्य करत असाल तर खालील शोरूम शी संपर्क करू शकता.

Patil Motors
Near atigre phata,atigre Kolhapur-Sangli Highway Kolhapur 416118
संपर्क – 8669096275

ऑन-रॉड किंमत – 

बजाज चेतक प्रीमियम २०२४ (STD)बजाज चेतक प्रीमियम २०२४ (TECPAC)
एक्स शोरूम₹१,३५,४६३एक्स शोरूम₹१,४४,४६३
RTO चार्जेस₹२५८RTO चार्जेस₹२५८
इन्शुरन्स₹७,७०९इन्शुरन्स₹७,७०९
हँडलिंग चार्जेस₹१४१६हँडलिंग चार्जेस₹१४१६
HP₹५००HP₹५००
ऍक्सेसरीज₹३५३५ऍक्सेसरीज₹३५३५
एक्सटेंडेड वॉरंटी₹५९९०एक्सटेंडेड वॉरंटी₹५९९०
ऑन रॉड किंमत₹१,५४,८७३/-ऑन रॉड किंमत₹१,६३,८७३

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment