आता BMW कंपनी कारसोबत बनवणार इलेक्ट्रिक स्कूटर, ही किंमत-फिचर्स असणार या स्कूटरची

BMW CE 04 electric scooter with a range of 129 km

BMW सारखी नावाजलेली कार बनवणारी कंपनी आता भारतामध्ये कार नंतर BMW CE 04 इलेक्ट्रिक स्कूटर बनवणार असून ही स्कूटर महाग असणार की स्वस्त? फिचर्स काय असणार ह्या स्कूटरमध्ये ? BMW इलेक्ट्रिक स्कूटरची खासियत काय ? अश्या BMW CE 04 इलेक्ट्रिक स्कूटरशी निगडित सर्व माहिती तुम्हाला खालील लेखात मिळेल.

C 400 GT बेस्ट स्कूटर

याआधी BMW या कारमेकर कंपनीने C 400 GT ही इंधन स्कूटर बाजारात लाँच केली होती, जिला भारतातील रस्ताच्या दृष्ठिकोनातून बनवलं आहे. ऑप्टिमाइझ ASC, एलेमेंट्स पासून बचाव करणारी विंडशिल्डस, एलईडी हेडलाइट्स, फ्लेक्सकेस स्टोरेज कंपार्टमेंट, कीलेस राइड, TFT डिस्प्ले ज्यामध्ये BMW Motorrad कनेक्टिव्हिटीचा पर्याय उपलब्ध यासारखे फिचर्स आहेत. या स्कूटरचे इंजिन 350 cc चे आहे. अल्पाइन व्हाइट आणि गोल्डन कॅलिपर या दोन रंगातून उपलब्ध असणारी BMW C 400 GT ची भारतात किंमत 11.25 लाखांपासून सुरू होते.

BMW CE 04 इलेक्ट्रिक स्कूटर माहिती

तुमचं महागातलं बजेट असेल आणि चार चौघात उठून दिसणारी अशी स्टायलिश इलेट्रिक स्कूटर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर BMW CE04 या पर्याय तुम्ह्यासाठी बेस्ट ऑप्शन नक्कीच ठरु शकतो. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीबाबतीत माहिती अजुनतरी बाहेर पडली नसली तरी BMW C 400 GT ची किंमत लक्षात घेता CE04 ही इलेक्ट्रिक स्कूटर C 400 GT किंमतीइतकीच किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. 231 किलोग्रॅम वजन असणारी ह्या स्कूटरची बॅटरी संपूर्ण बॉडीच्या मध्ये असून,स्टोरेज स्पेस स्कूटरच्या दोन्ही बाजुला देण्यात आले आहेत. स्कूटरचा टॉप स्पीड 120 किमी प्रति तास इतका आहे आणि 130 किमी इतकी रेंजची क्षमता या इलेक्ट्रिक स्कूटरची आहे. स्कूटरमध्ये लिक्विड-कूल्ड सिंक्रोनस इलेक्ट्रिक मोटर आहे जी 41bhp इतकी पॉवर आणि 61Nm इतका टॉर्क जनरेट करते.

CE 04 इलेक्ट्रिक स्कूटर खासियत

60 मिनिटात स्कूटर पटकन चार्ज होईल असा चार्जर आणि यासोबत LED हेडलाइट्स, कीलेस ऍक्सेस, BMW Motorrad कनेक्टेड टेक, तीन राइड मोड, ASC, ड्युअल चॅनल ABS सारखे अन्य अद्यावत फिचर्स या स्कूटरमध्ये मिळतात. स्कूटरच्या हार्डवेअर फिचर्समध्ये प्लेन बॉडी पॅनेल्स ,ABS , USB टाइप-सी चार्जर, बेल्ट-ड्राइव्ह, फ्रंट टेलिस्कोपिक फोर्क्स, मागच्या बाजुला मोनो-शॉक, ड्युअल डिस्क सेटअप आणि मागील बाजूस सिंगल डिस्क, सिंगल-साइड स्विंगआर्म सारखे फिचर्स मिळतात. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इको, रेन आणि रोड हे तीन मोड्स मिळतात. भारतामध्ये ही स्कुटर 24 जुलै रोजी लॉन्च होईल. 

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment