महिंद्राची जुगलबंदी टाटाशी ! Tata Curvv बेस्ट की Mahindra Thar roxx बेस्ट ?

Compare Tata Curvv vs Mahindra Thar

लवकरच आता भारतामध्ये कारची जुगलबंदी होणार आहे, कारण इंडियन ऑटोमिकल टाटा मोटर्स आणि महिंद्रा ह्या त्यांच्या कारला घेऊन भारतीय बाजारपेठेत उतरत आहेत. लवकरच टाटा कुपे हे टाटा मोटर्सची कार आणि महिंद्राची फाईव्ह डोअर्स असणारी थार असलेली लॉन्च होत आहे.

Mahindra Thar 5-Door- संपूर्ण माहिती

महिंद्रा थार फाईव डोअर म्हणजेच महिंद्रा थार roxx हिला 15 ऑगस्टच्या दरम्यान लॉन्च करण्यात येणार असून, गाडीच्या एक्सटेरियर मध्ये फ्रंट ग्रील, नवीन एलईडी हेडलाईट आणि टेल-लैंप सोबत यांचा समावेश आहे. महिंद्रा थार फाईव डोअरमध्ये दोन इंजिनचे प्रकार मिळतात; त्यामधील पहिले इंजिन दोन लिटर टर्बो पेट्रोल इंजिन तर दुसरे इंजिन 2.2 लिटर डिझेल इंजिन दिलेले आहे. महिंद्रा थार च्या सेफ्टी फीचर्स मध्ये 6 एअर बॅग, मागच्या बाजूला पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, EBD-ABS यांचा समावेश आहे. या कारच्या डॅशबोर्ड मध्ये 10.25 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, अँड्रॉइड ऑटो सोबत 10.25 इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो- प्ले, ऐपल कार-प्ले , पुश बटन सोबत किलेस एन्ट्री, 360 डिग्री कॅमेरा आणि पारनॉमिक सनरूफ यांचा समावेश आहे.

महिंद्रा थार आरोएक्सएक्स ची अपेक्षित किंमत 15 लाख रुपये इतकी आहे.

Tata Curvv-टाटा कर्व कुपे संपूर्ण माहिती

लवकरच टाटा मोटर्सची टाटा कर्व ही कुप एसयूव्ही लॉन्च होणार आहे, ही एसयूव्ही भारतामध्ये ICE आणि EV या दोन वेरियंट्स मधून लॉन्च केले जाणार आहे. टाटा कर्व कुप एसयूव्हीमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, नेवीगेशन, 12 इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टीम, जेबीएल स्पीकर ऑडिओ सिस्टीम, वायरलेस चार्जिंग आणि पॅनोरमिक पॅनोरमिक सनरूफ यांसारखे फीचर्स दिलेले आहेत, कारच्या सेफ्टीमध्ये रिवर्स कॅमेरा, पार्किंग सेन्सर, आयसोफिक्स चाइल्ड सीट माउंट आणि सहा एअर बॅग यांसारख्या सेफ्टी फीचर्स समावेश आहे.

कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन भारतामध्ये 7 ऑगस्ट रोजी लॉन्च केले जाणार आहे. या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये दोन बॅटरी पॅक ऑफर केले जाणार आहेत, जे एका चार्जमध्ये 500 किलोमीटर पर्यंत चा प्रवास पूर्ण करू शकतील तर ICE व्हेरिएंट मध्ये 1.2 लिटर आणि 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर 4-सिलेंडर टर्बोचार्ज्ड डिझेल युनिट इंजिन असणार आहे. या कारमध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय सुद्धा दिला जाण्याची शक्यता आहे. टाटा कर्व इलेक्ट्रिकची किंमत 17 लाख तर टाटा कर्व ICE इंजिनची किंमत 11 लाख असण्याची शक्यता मांडली जाते.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment