‘पेट्रोलविना चालणारी’ Maruti WagonR, आता लाँच होतंय वॅगन-आरचे Electric वर्जन, वाचा संपूर्ण माहिती

इलेक्ट्रिक वाहनाच्या जगात मारुती सुझुकी आत्ता टॉप सेलिंग कार वॅगन- आरला अपडेट देत, ह्या कारचे इलेक्ट्रिक वर्जन लाँच करत आहे. ही इलेक्ट्रिक वॅगन- आर एका चार्जमध्ये 230 किमी धावेल असा बॅटरी पॅक या कारमध्ये देण्यात येत आहे, शिवाय ही eWX कार म्हणजेच इलेक्ट्रिक वॅगन-आर ही 1620 मिमी उंचीने, 3395 मिमी लांबीने म्हणजेच मारुतीच्या Xpresso पेक्षाही कॉम्पॅक्ट आणि लहान असणार आहे. मारुतीची ही इलेक्ट्रिक कार 10 लाख रुपयांपेक्षाही कमी किंमतीमध्ये मिळणार आहे. ही इलेक्ट्रिक कार भारतीयांसाठी बजेट फ्रेंडली कारचा पर्याय ठरू शकतो. चला जाणून घेवूया या कारची संपूर्ण माहिती सोबत या वर्षात लाँच होणाऱ्या मारुती सुझुकीच्या कारची माहिती.

मारुती वॅगनआर इलेक्ट्रिक

नवीन इलेक्ट्रिक eWX ही संपूर्णपणे इंडियन मेड असणार आहे तरीही ह्या उत्पादनांची निर्यात देशबाहेरसुद्धा होणार आहे. भारतामध्ये ही कार 15 जानेवारी 2026 या दिवशी लाँच होणार आहे. नवीन इलेक्ट्रिक वॅगन-आर ही ऑटोमॅटिक ट्रांसमिशन पर्यायामध्ये असणार आहे, जिच्यामध्ये 5 लोक आरामात प्रवास करू शकतील. रेनॉल्ट कायगर, ह्युंदाई वेन्यू सारख्या कारची बरोबरी नवीन वॅगन-आर ईव्ही शी केली जाऊ शकते. या कारच्या बाहेरील लूकबाबतीत माहिती देता , कारमध्ये C आकाराचे LED हेडलँप मिळणार आहेत, फ्लॅट लोखंडी जाळी आणि मोठी विंडशिल्ड मिळणार आहे, इंटेरिअरमध्ये रंगीत अपव्होलस्ट्री सीट्स, फ्लोटिंग इन्फोटमेंट स्क्रिन, टू- स्पोक स्टेरिंग व्हील, छोट्या आकाराचा सेंटर कंसोल सारखे फिचर्स या कारमध्ये मिळणार आहेत. कारमध्ये असा बॅटरी पॅक मिळणार आहे, जो एका चार्जवर 200 पेक्षा आधी म्हणजेच 230 किमीचा पल्ला गाठू शकेल. या इलेक्ट्रिक कारची किंमत 8,50,000 रुपये असून पॉवरफुल परफॉर्मन्स, कमालीची रेंज आणि एडवांस्ड फिचर्सने भरपूर अशी ही कार असणार आहे.

वाचा: Maruti Brezza EV एका चार्ज मध्ये ५५० किमी धावणार, स्वस्त किंमत पण फीचर्स ने असणार लोडेड

यंदा मारुतीच्या ‘या’ गाड्या लाँच होण्याच्या मार्गावर

कारच्या या नव्या इलेक्ट्रिक वॅगन-आर कारसोबत नवीन स्विफ्ट डिझायर, Maruti eVX SUV (YY8), XUV700, EV MPV, Suzuki eWX-based Small electric hatch (K-EV), Suzuki Spacia-based MPV (YDB) सारख्या इतर कारसुद्धा लाँच होण्याच्या मार्गावर आहेत. इलेट्रिक वॅगन- आर सोबत मारुती सुझुकीची डिझायरसुद्धा लवकरचं लाँच होण्याच्या मार्गावर आहे, या कारचे वैशिष्ठ्य म्हणजे हिचे सनरूफ असणार आहे. ह्या नव्या कारमध्ये पॉवरफुल इंजिनसोबत 6 एयरबॅग्स,9 इंचाची टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग व्यवस्थासुद्धा या कारमध्ये समाविष्ठ आहे. 1.2 लिटरचे पेट्रोल इंजिन असणाऱ्या डिजायरची किंमत 7 लाख रुपये इतकी असणार आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment