इलेक्ट्रिक स्कूटरला 31 मार्च नंतर ही मिळणार FAME 2 subsidy फक्त करा हे काम

31 मार्च 2024 नंतर फेम सबसिडी (Fame 2 Subsidy) मिळणार की नाही या चिंतेने ग्राहकांना ग्रासले होते कारण, बुक केलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर किंवा बाईकच्या किमती 22 ते 23 हजारांनी वाढणार आहेत. पण सरकारच्या एका निर्णयाने ग्राहकांचे हे पैसे वाचणार आहेत परंतु त्यांना एक काम करावे लागणार आहे.

Fame 2 सबसिडीची मुदत

सरकार फेम 3 सबसिडी भारतामध्ये मार्च 2024 नंतर लागू करणार असल्याच्या बातम्या होत्या पण आता सरकारने निर्णय बदलला असून फेम 2 सबसिडीला एक्स्टेंड केले असून फेम 3 सबसिडी येत्या काही वर्षात लागू करणार आहे. सबसिडी एक्सटेंड जरी झाली असली तरी दुचाकी इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम होती परंतु पुन्हा एकदा सरकारने सुखाचा धक्का दिला आहे.

ही स्कीम सरकारने 2019 रोजी लागू केली होती आणि त्यासाठी Rs 10,000 करोड रुपये फंड दिला होता. सरकारचे धोरण होते की तीन वर्षात 7 हजार ई बस, 55 हजार ई कार, 5 लाख 3 व्हीलर आणि 10 लाख टू व्हीलर यांना सबसडाईझ करायचे. आतापर्यंत 12 लाख वाहनांना सबसिडी मिळाली असून 5,400 करोड पेक्षा जास्त सबसिडी वितरित झाली आहे.

इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक च्या सबसिडीत मुदत वाढ

इलेक्ट्रिक वाहनांचा भारतातील वाढता खप पाहता केंद्र सरकारने Rs 500 करोड रुपये फंड दिला असून e2W आणि e3Ws साठी 31 जुलै 2024 पर्यंत मुदवाढ केली आहे. जे ग्राहक सबसिडीच्या चिंतेत होते त्यांना आता ई स्कूटर खरेदी करण्याचे काम 31 जुलै 2024 च्या आधी करून घेणे गरजेचे असेल कारण त्यानंतर सबसिडी एक्स्टेंड होण्याचे मार्ग बंद होतील.

FAME-III सबसिडी येणार

भारतातील इलेक्शन पार पडल्यावर सरकारने फेम 3 सबसिडी लागू करण्याचा प्लॅन आखला आहे. 2025 पासून भारतात फेम 3 सबसिडी लागू केली जाऊ शकते.

वाचा – टेस्लाला टक्कर देत, विनफास्ट ईव्हीची भारतात एंट्री

कंपन्यांनी केली प्राईज कट

31 मार्च 2024 नंतर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अनेक दिग्गज इलेक्ट्रिक टू व्हीलर निर्माता कंपन्यांनी आत्ताच मोठा डिस्काउंट देण्यास सुरुवात केली आहे.

बेंगलोर बेस कंपनी अथर, ओला आणि बाऊन्स ल या कंपन्यांनी त्यांच्या स्कूटर वर आधीच 25 हजार रुपयांपर्यंत किमतीत घट केली आहे. येत्या काही दिवसात बजाज, विदा, टीव्हीएस आणि इतर कंपन्या त्यांच्या वाहनांच्या किमतीत घट करू शकतात.

फेम सबसिडीचे अपडेट्स मिळवा – Telegram Channel

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment