Tata Nexon.ev फेसलिफ्टच्या या 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Five things you must know about Tata nexon electric

तुम्ही जर टाटा मोटर्सच्या सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या मॉडेल टाटा नेक्सॉन. ईव्ही फेसलिफ्ट विकत घेण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी तुम्हाला फेसलिफ्टेड Nexon.ev बद्दलच्या काही अश्या हायलाइट्सची माहिती घेणं खूप गरजेचं आहे, ह्या हाईलाइटसच्या मदतीने तुम्हाला ही कार तुमच्या सोयीनुसार-गरजेनुसार आणि वापरानुसार योग्य आहे की नाही याची माहिती मिळेल.

नेक्सॉन ही एक SUV असून या कारमध्ये दोन बॅटरी पॅक दिले गेले आहेत,ज्यामुळे 300 ते 460 किमीपर्यंतची रेंज केवळ एकदा चार्ज केल्यावर मिळते. तुम्ही जर ही कार विकत घेण्याच्या विचारात असाल तर ह्या कारच्या कोणत्या बॅटरीचे व्हेरिएंट चांगले? कोणत्या प्रकारात फिचर्स-स्पेसिफिकेशन्स चांगले मिळतात? किंवा किमतीच्या मानाने कोणता प्रकार योग्य? याची संपूर्ण माहिती खालील दिलेल्या हायलाईटद्वारे दिली गेली आहे.

  1. दोन प्रकारांमध्ये टाटा नेक्सॉन. ईव्ही फेसलिफ्ट उपलब्ध
  2. Nexon.ev फेसलिफ्ट एडवांस्ड फिचर्स
  3. Nexon.ev फेसलिफ्ट चार्जिंग सिस्टिम
  4. Nexon.ev फेसलिफ्टचे सेफ्टी फिचर्स
  5. टाटा नेक्सॉन. ईव्ही – किंमत

दोन प्रकारांमध्ये टाटा नेक्सॉन. ईव्ही फेसलिफ्ट उपलब्ध

या इलेक्ट्रिक कारमध्ये दोन प्रकाराचा बॅटरी पॅक मिळतो. एक 30kWh बॅटरी–पॅक ज्यातून 325 किमी इतकी रेंज मिळते आणि 40.5kWh बॅटरी-पॅक 465 किलोमीटर इतकी रेंज देते.  30kWh बॅटरी–पॅक 127bhp आणि 215Nm जनरेट करतो दरम्यान 40.5kWh बॅटरी-पॅक 143bhp आणि 215Nm जनरेट करतो. तुम्ही ही कार 7.2kW होम चार्जरने, 15kW पोर्टेबल चार्जरने, AC चार्जर अथवा DC फास्ट चार्जरने ही कार चार्ज करू शकता.

Nexon.ev फेसलिफ्ट एडवांस्ड फिचर्स

या कारची आकर्षित करणारी गोष्ठ म्हणजे LED लाइट बार, Y-आकाराचे LED टेललाइट्स, LED DRLs, टू-स्पोक स्टीयरिंग व्हील, सेंट्रल कन्सोलमध्ये फ्रीस्टँडिंग टचस्क्री ज्यात Apple Carplay आणि Android Auto सारखे पर्याय वापरात येतात शिवाय एअर प्युरिफायर, OTA अपडेट्स, 9-स्पीकर म्युझिक सिस्टम, Type-C USB चार्जिंग पोर्ट, पॅडल शिफ्टर्स, वायरलेस चार्जर ani 360 डिग्री कॅमेरा सारखे एडवांस्ड फिचर्स मिळतात.

सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर Nexon.ev फेसलिफ्ट कशी चार्ज करावे?

इलेक्ट्रिक कार अथवा स्कूटर खरेदी केल्यानंतर सर्वात जास्त प्रश्न पडतो तो म्हणजे कार- स्कूटर बाहेर चार्ज कशी आणि कुठे करायची? पण आजकालच्या चार्जिंग स्टेशन सिस्टिममुळे कार कुठेही कधीही चार्ज करणं खूप सोप्प झालं आहे, आणि त्यात जर फ़ास्ट चार्जर असेल तर मार्गच मोकळा.

  • इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन शोधा- तुम्हाला तुमच्या मोबाईल द्वारे तुमच्या जवळचे चार्जिंग स्टेशन कुठे आहे ? याची संपूर्ण माहिती मिळेल.
  •  तुमच्यासाठी EV चार्जर उपलब्ध आहे की नाही तपासा.
  • तुमचे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केबलला जोडून चार्जिंग चालू करा.

Nexon.ev फेसलिफ्टचे सेफ्टी फिचर्स

नेक्सॉन इलेक्ट्रिक या कारमध्ये आतील प्रवाशयांच्या सुरक्षितेसाठी 6 ड्युअल क्लासिक एअरबॅग्ज मिळतात. अधिक सेफ्टी फिचर्समध्ये ESP म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, ऑल-व्हील ड्राइव, फ्रंट पार्किंग सेन्सर्स, ISOFIX अँकर, हिल डिसें, असेंट कंट्रोल, तीन रिजनरेटिव्ह मोड्स, ऑटो सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलँप, ऑटो होल्ड आणि ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर मिळतात.

Nexon.ev फेसलिफ्ट किंमत

टाटाच्या या इलेक्ट्रिक कारची किंमत 14.49 लाख ते 19.54 लाख इतकी आहे, ही किंमत ठराविक व्हेरिएंट म्हणजेच प्रकारावर अवलंबून आहे. टाटा मोटर्सने या कारचे पहिले फेसलिफ्ट 14  सप्टेंबर 2023 मध्ये सादर केले होते. नेक्सॉन इलेक्ट्रिकमध्ये क्रिएटिव्ह+, फियरलेस, फियरलेस+, फियरलेस+एस, एम्पॉवर्ड आणि एम्पॉवर्ड+असे वेरिएंट्स उपलब्ध आहेत. 

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment