जागतिक स्तरावर हिरो मोटोकॉर्पचा ‘या’ स्कूटरसोबत मोठा कमबॅक…!

हिरो मोटोकॉर्प म्हणजे Hero MotoCorp – India’s Leading Two-Wheeler Manufacturer कंपनी आता ३ वर्षाच्या मोठ्या ब्रेक नंतर, हिरोच्या फ्लॅगशिप आणि नवनवीन ऑफरसोबत जोरदार कमबॅक करत आहे, Hero zoom 160 ऍडव्हेंचर मॅक्सि स्कुटर ला घेऊन.. !

मिलान(इटली) मध्ये सहा दिवस सलग चालणाऱ्या EICMA 2023 कार्यक्रमामध्ये मध्ये ह्या गाडीचे अनावरण होणार आहे. 2023 जानेवारीमध्ये सुद्धा हिरोने ‘110 सीसी स्कुटर झूम’ लॉंच केली होती आणि ह्या गाडीला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता.

Xoom 160 : नवीन इंजिन असं असणार..!

साधारण 15 bhp आणि 14 Nm टॉर्क तयार करणारे 163 सीसी च हे ‘एअर-कूल्ड इंजिन इंधन-इंजेक्टर इंजिन’ असू शकतं. हे इंजिन चार व्हॉल्व्हसह 5-स्पीड गिअर बॉक्स जोडलेल आहे. या इंजिनच्या पॉवरची जर तुलना करायला गेलं तर, यामाहा एरॉक्स 155 , अप्रिलिया एसआर 160 सोबत होऊ शकते

Hero zoom 160: वैशिष्ट्ये आणि रंग

Hero zoom 160 च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या इमेज जर निरखून पहिल्या, तर तुमच्या सहज लक्षात येईल कि ,Hero zoom 160 ऍडव्हेंचर मॅक्सि स्कुटर ला डबल हेडलाइट्स दिले आहेत. स्कूटर मध्ये ‘ड्युअल-चॅनल एबीएस आणि डिस्क ब्रेक्स’ चे फीचर्स दिले आहे, एलिव्हेटेड एक्झॉस्ट आणि भक्कम फ्रंट फोर्क्स सोबत उंच अशी विंडशील्ड, मोठे अलॉय-व्हील ज्याचे ‘ड्युअल पर्पज टायर्स’ आहेत, शिवाय कॉर्नरिंग लाइट्स, स्टेप अप सिंगल सीट या गोष्टींचा समावेश अपेक्षित आहे. गाडीच्या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांमध्ये सांगायचं झालं, तर गाडीमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी हा ऑप्शन दिलेला आहे, ज्यामध्ये डिजिटल कन्सोल ऑफर करतात डिजिटल कन्सोल मध्ये चालक नेविगेशन, कॉल-टेक्स्ट अलर्ट, म्युझिक, रायडर टेलीमॅटिक असं बऱ्याच गोष्टी आपण सहजरित्या हाताळू शकतो.

स्पोर्ट्स झूम स्कुटर ला ‘स्पोर्ट्स रेड,पोलेस्टार ब्लू ,ब्लॅक, मॅट अब्राक्स, ऑरेंज,पर्ल्स सिल्वर व्हाईट’ ह्या रंगाचे पर्याय दिले आहेत.

 

आता जागतिक स्तरावर या EV गाड्यांच्या स्पर्धेमध्ये हिरो V1 या इलेक्ट्रिक या इलेक्ट्रिक स्कूटर सोबत विडा ब्रँड चे सुद्धा नव्याने अनावरण होत आहे.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment