होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक साठी वाट पाहणाऱ्या ग्राहकांच्या उत्कंठा इतक्या दिवस कंपनीने ताणून धरल्या होत्या पण आता खुद्द सीईओ साहेबांनीच एक्टिवा इलेक्ट्रिक च्या लॉंच डेट बद्दल खुलासा केला आहे. होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया लि.चे सीईओ त्सुत्सुमु ओटानी यांनी सांगितले की, ॲक्टिव्हाने जवळपास वीस वर्षांपासू टॉप सेलिंग चा ताज कायम ठेऊन आहे.
पुढे ते म्हणाले की भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच करण्यास आम्ही १ वर्ष उशिर केला आहे. ओटानी यांनी इव्हेंट वेळेस जाहीर केले की होंडा ची भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर ही मार्च 2025 मध्ये लॉंच केली जाईल.
पण ही इलेक्ट्रिक स्कूटर पेट्रोल एक्टिवा सारखीच असणार आहे का? रेंज किती मिळेल आणि किंमत किती असेल याची सखोल माहिती मी तुम्हाला आजच्या या पोस्ट मध्ये सांगणार आहे..
एक्टिवा इलेक्ट्रिक ची भारतातून सर्वच स्तरातून वाट पाहिली जात आहे.. जपानी ब्रांड असलेल्या होंडा ने भारतात चांगले आणि दणकट दुचाकी विकण्यास फेमस आहे.. होंडा ची एक्टिवा भारतातच नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे.
सध्या जे मॉडल भारतात ICE वर्जन मध्ये विकले जात आहे तेच इलेक्ट्रिक अवतारात कंपनी लॉंच करणार आहे.. होंडा ने इलेक्ट्रिक एक्टिवा लॉंच करण्यास जाणून बुजून उशीर का केला ते बघुयात.
सुमारे 4 ते 5 वर्ष झाली होंडा एक्टिवा च्या प्रत्येक महिन्याला 2 लाख युनिट्स विकल्या जात आहेत.. कंपनी त्यांच चांगली विक्री सुरू असलेल्या प्रोडक्टला का उगाच खीळ घालेल? बरोबर ना? इलेक्ट्रिक वाहन लॉंच करायचं म्हणजे R&D कारणे, टेस्टिंग करणे आणि मग प्रोडक्ट लॉंच त्यात पैसा जाणार होता आणि मार्किट मध्ये इलेक्ट्रिक गाड्याना मागणी मिळेल का याची शंका होती पण आता भारतीय मार्किट मध्ये इलेक्ट्रिक स्कूटर तुफान विकल्या जातात.. मग होंडा आता उशीर करू इच्छित नाही.
आगामी मार्च 2025 रोजी लंच होणारी होंडा एक्टिवा स्वेपबल बॅटरी सह येणार आहे.. ज्याना स्वेपबल बैटरी म्हणजे काय ते सांगतो.. होंडा जागो जागी 4 – 5 किमी अंतरावर पेट्रोल पम्प मध्ये बैटरी चार्जिंग स्टेशन बसवते आहे.
गाडीची बॅटरी डाउन झाली की त्या स्टेशनवर जाऊन गाडीची बैटरी बदलून चार्ज असणारी बैटरी घ्यायची म्हणजे चार्जिंग च टेन्शन नाही.. प्लस चार्जर सुद्धा मिळणार म्हणजे गाडी घरी सुधा चार्ज करता येईल.. 2 वर्ष झाले होंडा बैटरी स्वैप स्टेशन उभे करते आहे. गाडी लॉंच होई पर्यंत सर्व देशाच्या काणा कोपऱ्यात स्टेशन्स उभे राहतील..
ऐक्टिवाचे इलेक्ट्रिक वर्जन पेट्रोल च्या मानाने हलक ठेवण्यात येईल.. पण लांबी रुंदी सें असेल.. ई एक्टिव मध्ये LED हेडलॅम्प, टेल लैंप आणि इंडिकेटर दिले जातील.. फ्रंट आणि रिअर ला डिस्क ब्रेक्स दिले जातील.. कमी बजेट असलेल्या मॉडल मध्ये मागे ड्रम ब्रेक मिळेल.. या शिवाय डिजीटल इंट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेविगेशन, ऍप फिचर्स यांसारखे फीचर्स मिळतील..
ई-एक्टिवा मधे बैटरी आणि मोटर किती kw ची असेल, टॉप स्पीड किती असेल याची माहिती समोर आलेली नाही परंतु येत्या काही महिन्यात त्याची माहिती माझ्याकडे उपलब्ध होईल म्हणूनच सब्सक्राइब करून ठेवा आणि आमचा व्हॉट्सअप चैनल जॉइन करा म्हणजे लगेच तुम्हाला माहिती मिळेल..
गाडीची किंमत
होंडा इंडिया त्यांच्या पेट्रोल ऐक्टिवाच्या सेल शी रिस्क घेऊ शकत नाही. सध्या ती गाडी 1 लाख रुपयांत मिळते आहे.. आणि प्रतिस्पर्धी टीव्हीस, ओला, अथर, बजाज आणि विदा यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर शी सुद्धा स्पर्धा करावी लागेल त्यामुळ आगामी इलेक्ट्रिक एक्टिव 1 लाख 20 हजार ते 1 लाख 50 हजार रुपयांच्या दरम्यान ठेवली जाईल.. जय महाराष्ट्र..