‘या’ सिक्रेटमुळे वाढेल तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज

How to Get Longer Range in an Electric Scooter

आजकाल इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, यामागचं कारण म्हणजे किफायतशीर किंमत आणि चांगली रेंज. तुम्हीसुद्धा इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेण्याचा विचार करताय का किंवा इलेक्ट्रीक स्कूटर वापरता का? आणि तुम्हाला तुमची इलेक्ट्रिक स्कूटर चांगली लाँग रेंज देईल की नाही याची काळजी वाटते का ? मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे, खालील माहितीमध्ये तुमची इलेक्ट्रिक स्कूटर रेंज वाढवण्याच्या 5 सिक्रेट टिप्स दिल्या आहेत.

इलेक्ट्रिक स्कूटर रेंज वाढवण्याच्या 5 सिक्रेट टिप्स

इलेक्ट्रिक स्कूटरच्या लोकप्रियतेचं कारण म्हणजे पेट्रोल अथवा इंधन स्कूटरच्या तुलनेत कमी किंमत आणि चांगले एडवांस्ड फिचर्स. एथर एनर्जी, ओला इलेक्ट्रिक , बजाज चेतक सारख्या अनेक इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्या बाजारात उपलब्ध आहेत, ज्यांची लोंग रेंज देण्याची क्षमता आहे, तरीही ही रेंज कशी वाढवता येईल. सदर माहितीमध्ये असे 5 सिक्रेट टिप्स दिले आहेत, ज्यामुळे तुमच्या इलेक्ट्रीक स्कूटरची रेंज वाढू शकते.

5. टॉयर प्रेशर मेंटेन करा

बऱ्याच वेळा आपण इलेक्ट्रिक स्कूटरच्या छोट्या छोट्या मेंटेनस कडे लक्ष देत नाही, त्यातील एक मुद्दा म्हणजे टॉयर प्रेशर चेक करणे. जर तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या टायरमध्ये प्रेशर कमी असेल तर टायरचा संपर्क जमिनीसोबत जास्त होतो, परिणामी रोलिंग प्रतिरोधकच प्रमाण कमी होतं.

4. इलेक्ट्रिक स्कूटर हलकी ठेवा.

तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटरवर जास्तीचा भार जर कमी केला तर तुमची इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज वाढते. स्कूटरवर भार वाढला की स्कूटरची कार्यक्षमता सुद्धा वाढते.

3. रीजनरेटिव्ह ब्रेकिंग वापरा

कोणत्याही इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या स्कूटरमध्ये रीजनरेटिव्ह ब्रेकिंग दिलं जात, रीजनरेटिव्ह ब्रेकिंगचा वापर म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटरकडून अतिरिक्त तयार झालेल्या एनर्जी वाया जाऊ न देता तिचं एनर्जी रेंज वाढवण्यास वापरणे. रीजनरेटिव्ह ब्रेकिंग वापरण्यासाठी प्रत्येक स्कूटरमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहे, काही स्कूटरमध्ये इलेक्टीक स्कूटरचं थ्रोतल उलटं फिरवावं लागत काही स्कूटर थांबल्यावर आपोआप बॅटरी रिचार्ज होतात तर काही इलेक्ट्रिक स्कूटर जेव्हा उताराच्या दिशेने प्रवास करतात तेव्हा आपोआप रिचार्ज होतात.

2. नॅविगेशनचा वापर करा

तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या एडवांस्ड फिचरमध्ये मैप किंवा नॅविगशन cha समावेश जरूर करा. हयाच्या मदतीने तुम्हाला इच्छित ठिकाणी जाण्याचे अचूक आणि जवळचे मार्ग मिळतील. ज्यामुळे तुमची इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरी चार्ज वाचवून जास्तीची रेंज मिळवून देईल.

1. बॅटरी चांगली ठेवा

तुम्हाला जर तुमची इलेक्ट्रिक स्कूटर कडून कायम चांगली रेंज मिळवून घ्यायची असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ठ म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी मैंटेन करणं. तुमच्या स्कूटरच्या बॅटरीला ओल लागली किंवा बॅटरी ओव्हरचार्ज केली तरी स्कूटर चांगली रेंज मिळवून देत नाही.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment