BGauss RUV350 इलेक्ट्रिक स्कूटर झाली लाँच, वाचा भारताच्या पहिल्या RUV ची संपूर्ण माहिती

India’s 1st RUV – BGauss RUV350 Electric Scooter

BGauss या इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या कंपनीने RUV350 इलेक्ट्रिक स्कूटरचे अनावरण केले आहे, ही स्कूटर 25 जूनमध्ये लाँच होणार आहे. इतर इलेक्ट्रिक स्कूटरच्या तुलनेत RUV350 स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटरचा प्रवास खूप आरामदायी आणि सुरक्षित असल्याने ह्या स्कूटरची चर्चा सर्वत्र होत आहे. ही स्कूटर भारतातील पहिली RUV स्कूटर आहे.  RUV स्कूटर म्हणजे काय आणि BGauss RUV350 इलेक्ट्रिक स्कूटरच्या संपूर्ण माहितीसाठी खालील माहिती वाचा.

RUV350 स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर

पुढचं भविष्य म्हणजे इलेक्ट्रिक वाहनच आहेत, ही गोष्ठ जाणवून BGauss या इलेक्ट्रिक स्कूटरला लाँच करण्यात आल आहे. जिथे 3 वर्षामध्ये इंधन वाहनांचा खर्च 78,000 रुपये येतो त्याच तुलनेत या इलेक्ट्रिक स्कूटरचा खर्च केवळ 4,650 रुपये इतकाच येतो. ह्या स्कूटरला स्मार्ट स्कूटर म्हणून नावाजण्यात येण्याचं कारण हिचे कमालीचे फिचर्स आहेत. स्कूटर कुठे आहे, व्यवस्थित पार्क आहे कि नाही याची माहिती, स्कूटर कोण चालवत आहे याची माहिती, स्कूटरमध्ये असणाऱ्या बॅटरीची हेल्थची स्थिती माहिती, तुम्ही केलेल्या रायडिंगचा संपूर्ण इतिहास सारखे इतर अनेक एडवांस्ड फिचर्स या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मिळतात.

स्कूटरची किंमत वेरिएंटनुसार बदलणारी आहे. RUV 350i, RUV 350 EX आणि RUV 350 Max हे तीन वेरिएंट्स स्कूटरमध्ये उपलब्ध आहेत. BGauss RUV 350 ची किंमत 1.10 लाख रुपये, RUV 350 EX ची किंमत 1.25 लाख रुपये आहे आणि टॉप-स्पेक MX व्हेरिएंट ची किंमत 1.35 लाख रुपये इतकी आहे.

RUV स्कूटर म्हणजे काय?

RUV म्हणजेच रिक्रिएशनल युटिलिटी व्हेईकल (RUV).  BGauss RUV350 इलेक्ट्रिक स्कूटर एक आरयुव्ही स्कूटर मानण्याचे कारण म्हणजे स्कूटरमध्ये असणारा प्रिमियमनेस, स्मार्ट फिचर्स आणि अतुलीय परफॉर्मन्स. या स्कूटरमध्ये बॅटरी पॅक अथवा चार्जिंगबाबतीत जरी इतर माहिती तुर्तास देण्यात आली नसली तरी अन्य स्मार्ट आणि एडवांस्ड फिचर स्कूटरमध्ये भरपूर मिळतात. ह्या स्कूटरचे आकर्षक करणारे वैशिष्ठ्य म्हणजे व्हाइसलेस रायडिंगचा अनुभव आणि शून्य CO2 उत्सर्जन.

इलेक्ट्रिक स्कूटर RUV350 सारांश

भारतामध्ये या स्कूटरचे लाँचिंग जून दरम्यान होणार आहे. 1,30,000 इतकी किंमत असणारी ही स्कूटर विदा V1 ला टक्कर देऊ शकते. फिचर्समध्ये डिजिटल स्पीडोमीटर, इंस्ट्रूमेंट कंसोल, ऑडोमीटर, लो बॅटरी इंडिकेटर, सीतखाली स्टोरेज, LED हेडलाईट-टेललाईट- टर्न सिग्नल, इलेक्ट्रिक स्टार्ट सोबत स्कूटर स्टार्ट अथवा स्टॉप करण्याचे बटण, 16 इंचाचे आलोय व्हील्स, ट्युब्लेस टायर्स सारखे इतर अनेक फिचर्स या स्कूटरमध्ये दिले गेले आहेत. 16-इंच मिश्रधातूची चाके,मायक्रो-अलॉय ट्यूबलर फ्रेम आणि मागच्या बाजूला टेलीस्कोपिक फोर्क देण्यात आले आहेत.

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3kWh, लिथियम LFP बॅटरी आणि 3.5kW ची इलेक्ट्रिक मोटर आहे जी 165Nm टॉर्क जनरेट करते.  स्कूटर चा टॉप स्पीड 75 किमी प्रति तासइतका आहे. ही बॅटरी एका चार्जवर 120km ची रेंज देते. स्कूटरची बॅटरी 500W च्या चार्जरने चार्ज केली तर 5 तासामध्ये पूर्णपणे चार्ज होते.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment