85 हजारात TVS iQube चे नवे मॉडल लाँच, 150 किमी रेंज देणाऱ्या इलेक्ट्रीक स्कूटरची वाचा माहिती

Published:

इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी TVS मोटर्सने त्यांच्या आयक्युब चे एंट्री लेव्हल मॉडल लाँच केले आहे ज्याची किंमत १ लाख रुपयांच्या आतमध्ये आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये ७५ किमी ही स्कूटर  प्रवास करेल अशी बॅटरी देण्यात आली आहे. भारतामध्ये सर्वात आधी दिल्ली शोरूममध्ये टीव्हीएस मोटर्स येथे ह्या इलेक्ट्रिक स्कूटरची डिलव्हरी होणार असून, तुम्ही जर अश्या ​टॉप 10 सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर ज्या एक लाखापेक्षा कमी किंमतीमध्ये मिळत असणाऱ्या स्कूटरच्या शोधात असाल, तर जाणून घ्या टीव्हीएस आयक्युब च्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची iQube ST बद्दलची संपूर्ण माहिती

टॉप 10 मधली सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर iQube

iQube इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन स्टँडर्ड मॉडल लाँच झाले आहे, ज्याला TVS iQube चे एंट्री लेव्हल मॉडल म्हणून सुद्धा ओळखले जात आहे. आज भारतामध्ये iQube चे एकूण 5 वेरिएंट्स उपलब्ध आहेत, हया वेरिएंट्सचा बॅटरी पॅक वेगवेगळा आहे. TVS iQube 2.2 kWh, TVS iQube 3.4 kWh, TVS iQube S 3.4 kWh, TVS iQube ST 3.4 kWh, TVS iQube ST 5.1 kWh.

वाचा: 100 किमीच्या रेंज देणाऱ्या अँपिअर इलेक्ट्रिक स्कूटरची 10 हजाराने किंमत ‘कमी’, नो लायसेन्स-नो रजिस्टेशन

TVS iQube चा नवीन ST प्रकार लॉन्च

टीव्हीएस आयक्युब ST बॅटरी पॅकरेंजकिंमत
2.2 kWh 75 किमी84.999 रुपये
3.4 kWh100 किमी 1.38 लाख रुपये
5.1 kWh 150 किमी1.85 लाख रुपये

वाचा: एथरची सर्वात महागडी इलेक्ट्रिक स्कूटर, या नव्या अपडेट्समुळे वाढली स्कुटरची किंमत

लाँच झालेल्या iQube चा ST हा प्रकार नवा असणार आहे, ज्यामध्ये 3 बॅटरी पॅक सामावलेले आहेत; 2.2 kWh युनिट, 3.4 kWh युनिट आणि 5.1 kWh युनिट. या तीनही व्हेरिएंट्सच्या फिचर्ससंबंधी माहिती देता, TFT स्क्रीन, क्रॅश एंड टो अलर्ट, टर्न बाय टर्न नॅविगेशन, म्युझिक कंट्रोल, फ्लिप कि, अंडर सिट स्टोरेज, वॉइस असिस्टन्स, टायरप्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम सारखे एडवांस्ड फिचर्स दिले गेले आहेत. यातील 2.2 kWh ची बॅटरी एका चार्जवर 75 किमी इतकी रेंज देईल, 3.4 kWh ची बॅटरी एका चार्जवर 100 किमी इतकी रेंज देईल आणि 5.1 kWh ची बॅटरी एका चार्जवर 150 किमी इतकी रेंज देईल. या नवीन आयक्युब च्या स्टँडर्ड वेरिएंटला चार रंग मिळाले आहेत; टायटॅनियम ग्रे,स्टारलाइट ब्लू, कोरल सैंड सेटिन, कॉपर ब्राँझ मॅट.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment