कॉलेजकुमारांपासून ते वयस्करांना आवडणारी पॉईस ईव्ही ग्रेस स्कूटर, ॲक्टिव्हापेक्षा कमी किंमत तर ओलाइतकी रेंज

Poise Grace Electric scooter price

पॉईस ग्रेस नावाच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच झाली आहे, जिची किंमत Activa स्कूटर इतकीचं आहे आणि रेंज OLA इलेक्ट्रिक स्कूटर इतकी. ह्या स्कूटरच्या आगमनामुळे मात्र इतर इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या कंपनीचे तोंडचं पाणी पळणार आहे हे मात्र नक्की ! तुमच्यासाठी पॉईस ग्रेस इलेक्ट्रिक स्कूटर नवीन असेल तर खालील माहितीमध्ये पॉईस ग्रेसची प्रमुख वैशिष्ट्ये, Poise EV ग्रेस किंमत आणि या इलेक्ट्रिक स्कूटरची संपूर्ण माहिती वाचा.

एडवांस्ड फिचर्स- सेफ्टी फिचर्स असणारी आणि बॅझेटफ्रेंडली चांगली स्कूटर मिळणं खूप कठीण झालं आहे, म्हणूनच सदर लेखामध्ये पॉईस ईव्ही ग्रेस स्कूटरच्या माहिती दिली आहे, जी एडवांस्ड-सेफ्टी फिचर्स, कमी किंमतीमध्ये आणि 100 किमी इतकी रेंज देणारी आहे. बाजारामध्ये ह्या इलेक्ट्रिक स्कूटरचे 3 वेरिएंट्स उपलब्ध आहेत. ज्याची किंमत 79,999 रुपयांपासून सुरू होते. ही स्कूटर खूप कमी वजनाची म्हणजेच लाइटवेटड आहे. 

पॉईस ईव्ही ग्रेस व्हेरिएंटकिंमत
स्टँडर्ड व्हेरिएंट- ग्रेस लाइट79,999 रुपये
मिडल व्हेरिएंट- ग्रेस प्रो84,600 रुपये
टॉप व्हेरिएंट- ग्रेस प्रीमियम92,300 रुपये

पॉईस ईव्ही ग्रेस तपशील

या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फिचर्समध्ये साइड स्टँड इग्निशन लॉक, डिजिटल ओडोमीटर-स्पीडोमीटर-ट्रिप मीटर, LED हेडलाइट-टेल लाईट-टर्न सिग्नल लॅम्प, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, रिव्हर्स मोड डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल यासोबत इतर फिचर्सचा समावेश आहे. स्कूटरमध्ये टेलिस्कोपिक फोर्क आणि हायड्रॉलिक शॉक सस्पेंशन असून पुढचा डिस्क ब्रेक आणि मागचा ड्रम ब्रेक मिळतो. सुरक्षतेसाठी साइड स्टँड सेन्सर, रिव्हर्स मोड, यूएसबी चार्जिंग, पुश बटण स्टार्ट सारखे फिचर्स मिळतात. स्कूटरमध्ये इको, रायिड, स्पोर्ट आणि नार्मल मोड दिला गेला आहे.

या स्कूटरमधील 60 V 42 Ah चा लिथियम आयन बॅटरी पॅक दिला गेला आहे, जो 4 तासात पूर्णपणे चार्ज होतो शिवाय एका चार्जमध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर 120 किमीपर्यंतची रेंज मिळवून देते. या इलेक्ट्रिक बॅटरीवर आणि मोटरवर 3 वर्षाची वॉरंटी मिळते. स्कूटरसाठी 6000-8000 किमीची वॉरंटी मिळते. स्वॅप करण्यायोग्य बॅटरीचा पर्याय या स्कूटरमध्ये मिळतो. तुम्हाला या स्कूटरच्या खरेदीसाठी EMI चा पर्याय सुद्धा मिळतो.

पॉईस ईव्ही ग्रेस विकत का घ्यावी ?

  • स्वॅप करण्यायोग्य बॅटरी
  • 3 वर्षाची मोटर आणि बॅटरी वॉरंटी
  • लाँग राइडिंग रेंज
  • फ़ास्ट चार्जिंग
  • ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि USB चार्जिंग पोर्ट
  • कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम
  • बजेट फ्रेंडली किंमत

तुम्हाला पडलेले प्रश्न

पॉईस ग्रेसला स्कूटर चालवण्यासाठी लायसनची गरज आहे का?

होय, पॉईस ग्रेस चालविण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता आहे.

पॉईस ग्रेस स्कूटरचा टॉप स्पीड किती आहे?

पॉईस ग्रेसचा टॉप स्पीड 50 किमी/तास आहे.

ग्रेस ई बाईकची किंमत किती आहे?

ग्रेस ई बाईकची किंमत 79,999 रुपयापासून सुरू होते.

पॉईस ईव्ही ग्रेसचे किती व्हेरिएंट महाराष्ट्रात उपलब्ध आहेत?

पॉईस ईव्ही ग्रेसचे 3 व्हेरिएंट विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

पॉईस ईव्ही ग्रेस या इलेक्ट्रिक स्कूटर ची किती रेंज आहे?

100 किमी

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment