अशी असणार Tata Harrier EV !

Tata Harrier EV

लाँगटाईम आणि दणकट वापरासाठी बेस्ट गाड्या बनवणारी कंपनी म्हणजेचं टाटा मोटर्स. हीचं कंपनी आत्ता त्याचं सर्वात आवडतं मॉडल टाटा हॅरियरच इलेक्ट्रिक वर्जन घेऊन लवकर येत आहे. तुम्हीसुद्धा ह्या टाटाच्या लोकप्रिय कारच्या इलेक्ट्रिक वर्जनची वाट बघत असाल तर लवकरच तुमच स्वप्न पूर्ण होणार आहे. सदर माहितीमध्ये इलेक्ट्रिक टाटा हॅरियरमध्ये कोणत्या फिचर्स-स्पेसिफिकेशन चा समावेश असणार आहे? ह्या इलेक्ट्रिक कारची किंमत काय असणार आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे.

नुकतीच टाटाची कर्व ईव्ही जगासमोर आली आहे, जिला देखणा लुक आणि कमालीच्या एडवांस्ड इलेक्ट्रिक फिचर्सची जोडणी मिळाली आहे.

Tata Harrier EV ला मिळाले नवीन आलोय व्हील्स

टाटा हॅरियर इलेक्ट्रीकची चाचणी करताना काही छुपे चित्र बाहेर पडले आहेत ज्यामध्ये या गाडीला नवीन आलोय व्हील्स मिळाले आहेत. हे आलोय व्हील्स २०२३ मधल्या ऑटो एक्सपो मध्ये सादर केलेल्या हॅरियर ईव्हीसारखेच आहेत. टाटाची हॅरियर ईव्ही -इलेक्ट्रिक acti.ev या प्लॅटफॉर्मवर बनवली आहे, याआधी टाटा पंचसुद्धा याच प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आली होती.

60-kWh बॅटरी पॅक असणार

Harrier EV मध्ये 60-kWh बॅटरी पॅक दिला जाणार आहे, जो केवळ एका चार्जमध्ये 500 किमी चा पल्ला गाठू शकतो. ह्या कारची बॅटरी 7.2 kW ते 11kW AC चार्जरने चार्ज करू शकता येणार आहे आणि जर तुम्ही हा बॅटरी पॅक 150 kW DC या फ़ास्ट चार्जरने चार्ज केला तर फक्त 10 मिनिटांमध्ये 100 किमी प्रवास करण्यायोग्य गाडी चार्ज होते. या कारमध्ये ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) चा पर्याय मिळणार आहे.

या कार मधले अजून एक आकर्षणाची बाब म्हणजे हॅरियर ईव्ही ला वेहिकल टू लोड आणि वेहिकल टू वेहिकल चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये मिळणार आहेत, यातील वेहिकल टू लोड या पर्यायांमध्ये आपल्या इलेक्ट्रिक कारला जर पावर द्यायची असेल तर पावर देणारे डिवाइस कनेक्ट करायचे आपोआप आपली कार कुठेही चार्ज होऊ शकते.

या दिवशी होणार Tata Harrier EV लाँच

2.0 लिटरची आणि चार सिलेंडर डिझेल इंजिन असणारी हॅरियर डिझेलचे टॉप मॉडेल ची किंमत 33.49 लाख रुपये इतकी आहे.  इलेक्ट्रिक हॅरियर भारतामध्ये 2025 दरम्यान लाँच होणार आहे. सध्या भारतामध्ये हॅरियरचे डिझेल व्हेरिएंट, स्मार्ट, प्युअर, एडवेंचर, फेयरलेस आणि डार्क एडिशन अशा पाच प्रकारात उपलब्ध आहे ची किंमत साधारण 30 लाखाच्या पुढे असण्याची शक्यता आहे, लवकरच या कारचे पेट्रोल वर्जनसुद्धा उपलब्ध होण्याची शक्यता पण मांडली जाते. टाटा हॅरिअरला भारत अँड कॅप क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग सुद्धा मिळालेले आहे.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment