नेक्सॉनचे CNG व्हेरिएंट सुद्धा बाजारात विक्रीसाठी हजर ! must know information about Nexon CNG

Tata Nexon CNG – Launch Timeline And Price

टाटा नेक्सॉनचे पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक व्हेरिएंट भारतामध्ये उपलब्ध आहे आणि आता लवकरच Tata Nexon CNG व्हेरिएंट सुद्धा येत्या सप्टेंबर मध्ये लॉन्च होत आहे.

tata motors च्या सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या Tata Nexon CNG व्हेरिएंट येत्या सप्टेंबर 2024 मध्ये लॉन्च होणार आहे, तुम्ही सुद्धा जर टाटा नेक्सॉन सीएनजी वेरिएंटची आतुरतेने वाट बघत होतात, तर लवकरच तुमचं स्वप्न पूर्ण होत आहे. या कारमध्ये सीएनजीच्या पर्यायासोबत 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनचा ऑप्शन सुद्धा मिळणार आहे. चला जाणून घेऊया या कारची संपूर्ण माहिती.

नेक्सॉन सीएनजी इंजिन माहिती

नेक्सॉनचे सीएनजी ही पहिली CNG कार असणार आहे, जिला टर्बो पेट्रोलचे इंजिन मिळालेल आहे. हे 1.2-लिटरचा टर्बो पेट्रोल इंजिन 118 bhp इतकी पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करत. ही कॉम्पॅक्ट एसयुव्ही मारुती सुझुकीच्या ब्रेजा सीएनजी कारची प्रतिस्पर्धी असू शकते. या कारमध्ये ट्विन सीएनजी सिलेंडर टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे, ज्या नवीन मॉडेलमध्ये टर्बो-चार्ज्ड पेट्रोल इंजिन सोबत जोडलेले सीएनजी किट सुद्धा मिळणार आहे. 5 स्पीड असणारा मॅन्युअल गेअरबॉक्स तर या मॉडेलमध्ये असणारच आहे, तरीसुद्धा ऑटोमॅटिक गेअरबॉक्सची या कारमध्ये अपेक्षा केली जातेय.

नेक्सॉन पेट्रोलसारखे असणारे स्पेसिफिकेशन

नेक्सॉनच्या पेट्रोल व्हेरिएंटला जे स्पेसिफिकेशन मिळालेले आहेत, त्याचप्रमाणे या CNG कारला सुद्धा दिले जाण्याची अपेक्षा मांडली जाते, ज्यामध्ये टू स्पोक स्टेरिंग व्हील, टच-स्क्रीन, एसी कंट्रोल पॅनल्स, टाटाचा लोगो आणि 10.25 इंचाची स्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारख्या स्पेसिफिकेशचा समावेश आहे तर कारच्या फीचर्समध्ये मोठे पॅनोरामिक सनरूफ , टाईप-सी चार्जिंग पोर्ट आणि IRVM यांसारख्या इतर फीचर्स सुद्धा समावेश आहे.

Tata Nexon CNG – लाँच आणि किंमत 

भारतात सध्या विक्रीस उपलब्ध असणाऱ्या टाटा नेक्सॉन ची किंमत 11.80 लाखापासून पुढे असून नेक्सॉनच्या सीएनजी व्हेरिएंटची किंमत 10.50 लाख ते 18.50 लाख या दरम्यान असू शकते.

टाटा मोटर्स नेक्सॉन च्या सीएनजी व्हेरिएंट सोबत त्यांचे सर्वात लोकप्रिय मॉडेल टाटा हॅरियरचे इलेक्ट्रिक व्हर्जनसुद्धा ,बाजारामध्ये विक्रीस उपलब्ध करून देणार आहे या इलेक्ट्रिक हॅरियरमध्ये 60-KWH बॅटरी पॅक असणार आहे जो एका चार्जमध्ये 500 किलोमीटरचा पल्ला आरामात गाठू शकतो. भारतामध्ये इलेक्ट्रिक हॅरियर 2025 दरम्यान लॉन्च होणार असून या कारची किंमत 33.49 लाखा इतकी आहे.

टाटा कर्व ईव्ही

यंदा टाटा मोटर्स एक-सो-एक EV, ICE आणि CNG कार लाँच करत आहे, आणि या चर्चेतल्या कारमधली एक कार म्हणजे ‘टाटा कर्व’ जी भारतात ICE आणि इलेक्ट्रिक या दोन व्हेरिएंट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे आणि आता सगळ्यांना आतुरता झालेली आहे, ती म्हणजे टाटा नेक्सॉनच्या सीएनजी व्हेरिएंटच्या लाँचिंगची ! जी येत्या सप्टेंबरमध्ये लाँच होत आहे.

हॅरियर ईव्ही सुद्धा बाजारात होणार हजर !

नेक्सॉन सीएनजी व्हेरिएंट आणि इलेक्ट्रिक हॅरियर सोबत टाटा कर्व ही कार सुद्धा 7 ऑगस्ट 2024 या दिवशी लॉन्च होणार आहे नुकतिचं या कारची क्रॅश-टेस्ट सुद्धा करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये या कारला 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळालेले आहेत. ह्या कारच्या इलेक्ट्रिक व्हर्जनसोबतच आयसीई वर्जनसुद्धा लाँच होणार आहे, ज्याची किंमत 10.5 लाख रुपये ते 20 लाख रुपये इतकी असू शकते.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment