25 लाखाच्या आतमध्ये मिळणारी Tata Sierra EV ही वाचा संपूर्ण माहिती

Tata to launch Sierra EV in 2025: टाटा ही भारतातील नामांकित कंपनी ICE इंजिन कार सोबत Electric vehicle लाँच करुन Top Selling Cars in India यादीत बसले आहे. नेक्सॉन ईव्ही, electric punch सारख्या कमाल कारच्या लाँचिंगनंतर टाटा मोटर्स पुन्हा एकदा मार्केटमध्ये 25 लाखाच्या आतमध्ये मिळणारी Tata Sierra – Sport utility vehicle या कारला लाँच करायला सज्ज झालं आहे. चला जाणून घेवूया या tata electric car ची संपूर्ण माहिती.

वाचा: टाटाच्या या ५ गाड्यांच्या विक्रीने बाजारात खळबळ, सर्वात जास्त विकली जाणारी टाटाची ही कार, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

टाटा सिएरा इलेक्ट्रिक संपूर्ण माहिती

महिंद्रा आणि मारुती सुजुकीसारख्या कारमेकर कंपन्या कारचे फेसलिफ्ट आणि नव्या कार लाँच करत असताना टाटा मोटर्ससुद्धा अशी इलेक्ट्रिक कार लाँच करत आहे, जिला रेट्रो डिझाइन तरीही मॉडर्न लुक सोबत पुढच्या-मागच्या बाजूला LED DRl स्ट्रिप देण्यात आली आहे, ज्यामुळे ही कार इतर कारच्या ताफ्यातसुद्धा पटकनं उठून दिसते. अश्या कोणत्या फिचर्समुळे- स्पेसिफिकेशनमुळे tata sierra ev इतकी लोकप्रिय होतेय, लोक बुकिंगसाठी या कारची अतुरतेने वाट बघत आहे, चला जाणून घेवूया याची संपूर्ण माहिती.

वाचा: होंडाची इलेक्ट्रिक ॲक्टिव्हा स्कूटर लाँच, पहा रेंज आणि टॉपस्पीड

कारच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला कनेक्टेड LED DRl स्ट्रिप, LED टर्न इंडिकेटर, हेडलँप, डिझाइन केलेले आलोय व्हिल्स, ब्लॅक पॅनल्स कारच्या आतील बाजूस ब्लॅक सपाट स्टिअरिंग, इन्फोटमेंट सिस्टम, इंस्ट्रूमेंट क्लस्टर, AC कंट्रोल यूनिट, स्मार्ट गियर नॉब, अपहोलस्ट्री फॅब्रिक सीट्स, स्किड प्लेट्स, रूफ टेल, इंटिग्रेटेड स्पॉइलर, फ्लश फिटिंग डोअर सारखे प्रमुख आकर्षक फिचर्स देण्यात आले आहेत. 5 प्रवाशी ह्या कारमधून आरामात प्रवास करू शकतात. कारचे इंजिन ऑटोमॅटिक ट्रांसमिशनमधून आहे. 2025 मध्ये टाटा सिएरा ईव्ही लाँच होणार असून या कारची किंमत 25 लाख रुपये इतकी आहे.

वाचा: २० रुपयात फिरा १०० किलोमीटर, क्वांटम एनर्जी इलेक्ट्रिक स्कूटरवर १० हजाराचा डिस्काउंटसुद्धा

याआधी टाटाने अल्ट्रोस रेसर आणि टाटा कर्व सारखे कमालीचे मॉडेल्स लाँच केले आहेत, अल्ट्रोस कार दिसायला अतिशय स्पोर्टी तर त्याचं तुलनेत कर्व आकर्षक कूप एसयुव्ही असून दोन्ही कारमध्ये कमालीचे हायटेक फिचर्स देण्यात आले आहेत. 

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment