अचानक आग लागली इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीला, का लागते इलेक्ट्रिक बॅटेरीला आग? आग टाळा या ५ सोप्या उपायांनी

Published:

सध्या सोशल मीडियावर एका इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी चार्ज होताना आग लागल्याची घटना आणि त्याचा व्हिडिओ बराच वायरल होत आहे. ही आग इतक्या मोठ्या प्रमाणावर लागली होती, या आगीच्या धुराचे लोट संपूर्ण खोलीभर तयार होऊन, हि परिस्थिती खूपच भयानक झालेली दिसत होती. ह्या इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरीच्या आगीचे व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की नक्की काय घडलं असेल, ज्यामुळे त्या इलेक्ट्रिक बॅटरीने पेट घेतला आणि अशी काय इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटेरीची काळजी घ्यावी, ज्यामुळे ही परिस्तिथी येणार नाही. तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे खालील लेखात मिळतील.

काय घडलं नक्की व्हिडिओमध्ये?

ऑनलाइन वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी घरात चार्ज होताना दिसते आणि चार्ज होणारी बॅटरी अचानक पेट घेते, बॅटरीला लागलेली आग इतकी भयानक होते की, आगीतून हानिकारक वायू बाहेर पडत असताना दिसतात. काही सेकंदातच संपूर्ण खोली आगीने आणि हानिकारक वायूंनी भरलेली दिसते.

वाचा: ‘शेतीचा भार ते कंपनीचं ओझ’ सगळं वाहून नेईल ही Motorvolt M7 इलेक्ट्रिक स्कूटर, 999 रुपये भरून करा बुकिंग

वाचा: ‘अंत’ जवळ आलाय यामाहा R1 आणि R1M चा, जाणून घ्या काय आहे कारण

वाचा: MG ची जगातील सर्वात लहान आणि स्वस्त SUV होणार लाँच, जाणून घ्या किंमत, रेंज आणि संपूर्ण माहिती

बॅटरीला आग का लागते आणि स्फोट का होतो?

  1. ठराविक कालावधी पेक्षा जास्त वेळ इलेक्ट्रिक बॅटरी चार्ज झाली तर बॅटरीला आग लागण्याचे किंवा बॅटरी एक्सप्लोड होण्याचे बरेच चान्सेस असतात.
  2. बरेचदा बॅटरी चार्ज करत असताना आग लागण्याचे सर्वात मोठं कारण असतं शॉर्टसर्किट होणं कारण वाहता करंट इतका हेवी असतो, ज्यामुळे शॉर्टसर्किट होण्याची शक्यता असते त्यामुळे टू व्हीलर मध्ये ठराविक किलोवॅटचा चार्जर वापरणे कधीही सेफ.
  3. स्कुटरची बॅटरी भिजलेल्या अवस्थेत अथवा ओल्या ठिकाणी चार्ज करणे ज्यामुळे आगीचे चान्सेस किंवा बॅटरी एक्सप्लोड होण्याचे चान्सेस असतात.
  4. राईड संपल्या-संपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी चार्जसाठी लावल्यावर सुद्धा बॅटरीला आग लागू शकते.
  5. बॅटरी चुकीच्या चार्जरने चार्ज करणे अथवा स्कुटरसोबत मिळणाऱ्या चार्जरपेक्षा अधिक वोल्टच्या चार्जरने बॅटरी चार्ज झाल्यावर सुद्धा बॅटरीला आग लागण्याचे चान्सेस आहेत.

ही काळजी घ्या तुमच्या इलेक्ट्रिक बॅटरीची

  1. राईड झाल्यावर लगेच बॅटरी चार्जला लावू नका.
  2. बॅटरी चार्ज करताना व्हेंटिलेशन होईल अशा ठिकाणी बॅटरी चार्जिंगसाठी लावा.
  3. ठराविक कालावधीपेक्षा जास्त वेळ बॅटरी चार्ज करू नका.
  4. रात्रभर बॅटरी चार्जिंगसाठी लावू नका.
  5. काही कारणास्तव बॅटरीवर पाणी पडले असेल किंवा बॅटरी ओली झाली असेल, तर सामान्य तापमानात बॅटरी वाळल्यानंतर मगच चार्ज करा.
  6. चिनी कंपन्यांकडून बॅटऱ्या विकत घेणे किंवा चिनी कंपन्यांचे इलेक्ट्रिक स्कूटर वापरणं टाळा.
  7. सर्वात महत्त्वाचं इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेतल्यावर इलेक्ट्रिक स्कूटरचा विमा उतरवून घ्या.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment