Upcoming top 5 Tata EV: या ‘5’ आगामी टाटाच्या इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Top 5 TATA Upcoming Cars : सध्याच्या घडीला जगभरात EV चाच बोलबाला चालू आहे, आणि भारतात EV म्हंटल कि सर्वात आधी TATA हेच नाव तोंडात येत. फीचर्स पासून सेफटी पर्यंत १०० पैकी १०० गुण मिळवणारी एकमेव TATA आता Tata Nexon EV च्या नंतर EV गाड्यांच्या बाजारपेठेत नवीन टॉप ५ EV वेहिकल लाँच करण्यास सज्ज झाली आहे. ह्या टाटा इलेक्ट्रिक कार कोणत्या आहेत? नवीन टाटा कारची नवे काय , फीचर्स काय आणि महत्वाचं म्हणजे किंमती काय ? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला खालील लेखात तर मिळतीलच शिवाय तुमच्यापैकी टाटा बाबतीत पडलेले प्रश्न आणि शंकाचे निरसरं लेखामध्ये सर्वात शेवटी केले जाईल. Top 5 TATA Upcoming Cars

नावाजलेली टाटा कंपनीने त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक वेहिकलचा श्रीगणेशा २०१९ साली केला होता, आणि त्या गाडीचं नाव होत Tigor EV. त्यांनतर टाटांकडून मिळणारी सेफेटी ची हमी, गाडीची गुणवत्ता आणि चांगलं मायलेज यामुळे टाटा कायम लोकप्रिय ठरलं आहे. लोकांची EV वाहन खरेदी करण्यासाठी असणारी ओढ बघून टाटा ने अनेक नव्या गाडयांना मार्केटमध्ये आणलं, आणि आता २०२४ पर्यंत टाटा अजूनही काही टॉप आणि बेस्ट EV आणण्याच्या मार्गावर आहे.

टाटा पंच इ.व्ही- Top 5 TATA Upcoming Cars

PUNCH

अपेक्षित लाँच तारीख 01 डिसेंबर 2023
अपेक्षित किंमत12 लाख अंदाजे किंमत

5-सीटर इलेक्ट्रिक मायक्रो SUV टाटा पंच इ.व्ही गाडीमध्ये 2 बॅटरी पॅक मिळणार आहेत जे साधारण 500km पेक्षा जास्त रेंज देणार आहे. टाटाच्या बाकीच्या EV प्रमाणेच या गाडीलासुद्धा मल्टिपल ब्रेकिंग रिजनरेशन मोडस दिले आहेत.हेडलाइट्स, रेन सेन्सिंग वाइपर, क्रूझ कंट्रोल आणि पुश बटण स्टार्ट/स्टॉप शिवाय गाडीमध्ये टचस्क्रीन डिस्प्ले , डिजिटल ड्रायव्हरचा डिस्प्ले दिला गेला आहे. या गाडीची तुलना Citroen eC3 , MG धूमकेतू सोबत केली जाईल.

VIP Fancy Number Plate:वाहनासाठी फॅन्सी व्हीआयपी क्रमांक कसा मिळवायचा,नोंदणी आणि किंमत

टाटा हॅरियर ईव्ही-Top 5 TATA  Upcoming Electric Cars

हॅरियर ईव्ही

अपेक्षित लाँच तारीख  एप्रिल 2025
अपेक्षित किंमत 30 लाख अंदाजे किंमत

TATA ची हि गाडी 5-सीटर असून ह्या गाडीच्या बॅटरी OMEGA Arc प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत. या गाडीमध्ये ड्युअल-मोटर सेटअप आणि ऑल-व्हील ड्राइव्हट्रेन असणार आहे. सोबत पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग आणि रेन सेन्सिंग वायपर गाडीमध्ये मिळणार आहेत. टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि क्रूझ कंट्रोल यासारखी वैशिष्ठे गाडीत दिली असून सहा एअरबॅग, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्थिरता कार्यक्रम (ESP), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) असणार आहेत. ह्या गाडीची तुलना हा Hyundai Kona electric आणि MG ZS EV शी केली जाऊ शकते.

टाटा सफारी इ.व्ही

सफारी इ.व्ही

अपेक्षित लाँच तारीख 2024 सुरवातीस
अपेक्षित किंमत35 लाख अंदाजे किंमत

या गाडीमध्ये ड्युअल-मोटर सेटअप असून Harrier EV पेक्षा वजनाने थोडी कमी असणार आहे. सोबत या गाडीमध्ये सात एअरबॅग्ज, 12.3 इंच टचस्क्रीन डिस्प्ले , ड्युअल-झोन एसी,  आणि अधिक लोडेड प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) असणार आहे.Top 5 TATA Upcoming Cars

Domino’s e-bikes : आता डॉमिनोझची डिलेव्हरी होणार ‘अधिक फास्ट’

Tata Curvv EV – टाटा कर्व 

Top 5 TATA Upcoming Cars

अपेक्षित लाँच तारीख 01 डिसेंबर 2023
अपेक्षित किंमत20 लाख अंदाजे किंमत

टाटाच्या Nexon EV चे फीचर्स या गाडीमध्ये असणार आहेत. अधिक फीचर्समाहिती देता,सहा एअरबॅग्स, 2.3-इंच टचस्क्रीन, 10.25-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, आणि प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) या गाडीमध्ये मिळणार आहे.

टाटा अवन्या-Top 5 TATA Upcoming Cars

अवन्या

अपेक्षित लाँच तारीख जानेवारी 2025
अपेक्षित किंमत 30 लाख अंदाजे किंमत

या गाडीमध्ये ५ जनाची आसन क्षमता असून 500km पेक्षा मायलेज देणारी हि कार आहे.या गाडीचा ग्राउंड क्लीयरन्स 200mm इतका आहे. हि गाडीचे अल्ट्रा -फास्ट चार्जिंग बॅटरी असणार आहे जी केवळ 30 मिनीटात पूर्ण चार्ज होणार आहे. आतापर्यन्त केलेल्या गाडीच्या अभ्यासात या गाडीचे फीचर्स लक्षात घेता, हिची कोणाशीही तुलना केली जाऊ शकत नाही.

New Ather Electric Scooter: एथर एनर्जी लाँच करणार फॅमिली स्कूटर; बजाज चेतक, टीव्हीएस ई-स्कूटरची करणार छुट्टी!

असेही लोक विचारतात

 • टाटा नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे का?
  – हो
 • टाटा नॅनो ईव्ही येत आहे का?
  -टाटा नॅनो ईव्ही लवकरच भारतात लाँच होत आहे.
 • टाटा इलेक्ट्रिक कार लॉन्च 2023 ची किंमत किती आहे?
  -टाटाच्या गाड्यांच्या किंमती या मॉडेलनुसार वेगवेगळ्या असतात,तुम्हाला ज्या गाडीची माहिती जाणून घ्यायची असेल तो लेख आपल्या या पेजवर मिळेल.
 • टाटा हॅरियर ईव्ही लाँच करणार आहे का?
  -हो
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment