महाराष्ट्रातील TVS खरेदीकरांसाठी खुशखबर, टीव्हीएस स्कूटरवर मिळतोय बोनस

Published:

TVS iQube ST Top Variant Delivery Starts

तुम्ही जर TVS इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचारात असाल तर हा लेख वाचून लगेच या इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोरूमला भेट द्या, कारण TVS कंपनी त्यांच्या iQube ST व्हेरिएंटवर तब्बल 10,000 रुपयांचा लॉयल्टी डिस्काउंट देत आहे, पण हा डिस्काउंट केवळ त्या ग्राहकांना मिळणार आहे, ज्यांनी ह्या इलेक्ट्रिक स्कूटरचे 15 जुलै 2022 आधी बुकिंग केले असेल. या स्कूटरच्या किंमतबाबतीत, मिळणाऱ्या डिस्काउंट बाबतीत संपूर्ण माहिती सदर लेखात दिली आहे.

TVS iQube ST टॉप व्हेरिएंटवर 10 हजाराची लॉयल्टी सवलत

टीव्हीएस मोटर्सने iQube लाँच झाल्यानंतर एका वर्षामध्ये या स्कूटरचे ST व्हेरिएंट आणले होते, पण लेट- डिलिव्हरी सोबत स्टेट सबसिडी बंद झाल्याने आणि केंद्र सरकारची सबसिडी कमी झाल्याने ह्या स्कूटरच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली, या कारणास्तव बऱ्याच जणांनी बुक केलेल्या टॉप-स्पेक ST ट्रिमचे बुकिंग रद्द केले. या ई-स्कूटरमध्ये मोठ्या बॅटरी पॅकसोबत लोंग रेंजची हमी दिली जाते. हे व्हेरिएंट परवडणाऱ्या किंमतीमध्ये उपलब्ध असणार आहे, ज्याची किंमत 1,47,003 इतकी आहे. ह्या इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी महाराष्ट्रात सुरू झाली असून, ज्या ग्राहकांनी 15 जुलै 2022 पूर्वी iQube ST बुक केली होती, त्यांना 10,000 लॉयल्टी सवलतीचा फायदा मिळणार आहे.

TVS iQube ST

TVS iQube ची ही सिरीज 11 रंगामधून उपलब्ध असून, स्टँडर्ड आणि S ट्रिम व्हेरिएंट्सच्या तुलनेत या स्कूटरमध्ये एडवांस्ड फिचर्समध्ये 7-इंचाची टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिविटी ,म्युझिक कंट्रोल, फ्लिप कि, अंडर सिट स्टोरेज, वॉइस असिस्टन्स, टायरप्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम आणि टर्न-बाइ-टर्न नॅविगेशन सारखे 118 फिचर्स मिळतात. TVS iQube ST 2 प्रकारांमध्ये 3.4 kWh, आणि 5.1 kWh उपलब्ध झाली ; स्कूटरमधील 5.1kWh बॅटरीचा 82 किमी प्रति तास इतका टॉप स्पीड असून, एका चार्जवर 150 किमी पर्यंतची रेंज मिळवून देते तर 3.1kWh बॅटरी पॅक एका चार्जवर 100 किमी इतकी रेंज देते. iQube ST मधील 3.4kWh बॅटरी पॅक असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत 1.56 लाख रुपये एक्स-शोरूम इतकी आहे, तर iQube ST मधल्या 5.1kWh बॅटरी पॅक असणाऱ्या प्रकाराची किंमत 1.86 लाख रुपये इतकी आहे.

Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment