सर्वात ‘जास्त’ वाहन-विक्री करते ही कंपनी, चक्क 33% ने सेल वाढला TVS मोटरचा, वाहन विक्री-अहवाल

TVS Sales February 2024: भारतातील अग्रगण्य दुचाकी आणि तीनचाकी कंपनी TVS motors ने, नुकताच 2024 वाहन-विक्रीचा अहवाल जाहीर केला, या कंपनीने प्रॉडक्टच्या निर्यातीमध्ये कमालीची प्रगती केली आहे. हा Auto Companies Sales वार्षिक म्हणजेच 2023 ते 2024 दरम्यानचा आहे, चला जाणून घेयूया यासंदर्भात अधिक माहिती.

स्कूटर, मोटारसायकल, मोपेड, इलेक्ट्रिक, थ्री-व्हीलर यासाठी प्रसिद्ध असणारी TVS Motors ने फेब्रुवारी 2023 मध्ये 2,76,150 युनिट्सची विक्री केली होती. या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये एकूण विक्री 33% ने वाढून 3.68 लाख युनिट झाली आहे. या वाहनांमध्ये दुचाकीची 3.58 लाख युनिट विक्री झाली, इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 17,959 युनिट्सची झाली तर मोटरसायकलची विक्री 1.84 लाख युनिट्सची झाली आहे. TVS Motors ने तीनचाकी 10,614 युनिट्सची विक्री झाली.

TVS स्कूटरचा सेल 26% ने वाढला

टीव्हीएस मोटर सेल्समध्ये, TVS scooters ची फेब्रुवारी 2023 मध्ये 1,04,825 स्कूटरची विक्री झाली होती, तर फेब्रुवारी 2024 मध्ये 1,32,152 स्कूटर ची विक्री झालेली आहे, टीव्हीएसच्या स्कुटर सेलमध्ये या वर्षात 26.07% ची वाढ झाली आहे.

वाचा: ‘या किंमतीत’ Yamaha TMAX560 भारतात लाँच होण्याची शक्यता, जाणून घ्या फीचर्स आणि खासियत

TVS इ-स्कूटरचा सेल 15.70% ने वाढला

TVS इलेक्ट्रिक स्कूटरची फेब्रुवारी 2023 मध्ये 15,522 स्कूटरची विक्री झाली होती, तर त्याच तुलनेत फेब्रुवारी 2024 मध्ये 17,959 स्कूटर ची विक्री झालेली आहे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षात 15.70% ने या कंपनीचा सेल्स वाढलेला आहे.

वाचा: होंडाच्या ‘तगड्या’ अडव्हेंचर बाइक्स बाजारात हजर, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

TVS मोपेड चा सेल 15 % ने वाढला

टीव्हीएस मोटरने TVS moped मध्ये फेब्रुवारी 2023 मध्ये 35,958 वाहनांची विक्री केली, तर फेब्रुवारी 2024 मध्ये 41,635 वाहनांची विक्री झालेली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत मोपेडची वाढ 15.79 टक्क्यांनी झालेली आहे.

म्हणजेच फेब्रुवारी 2023 मध्ये देशाअंतर्गत टीव्हीएस मोटरने 2,21,402 वाहनांची विक्री केली होती, तर फेब्रुवारी 2024 मध्ये 2,67,5002 वाहनांची विक्री केलेली आहे, तर दुचाकी वाहनांची देशाबाहेर फेब्रुवारी 2023 मध्ये 45,624 वाहनांची विक्री केलेली असून, फेब्रुवारी 2024 मध्ये 90,308 वाहनांची विक्री केलेली आहे. या कंपनीच्या दुचाकी वाहनांचा मागील वर्षाच्या तुलनेत 2024 मधला सेल हा 34% टक्क्याने वाढलेला आहे.

वाचा: टाटा कर्वचा शानदार लुक, पावरफुल इंजन आणि कमाल फीचर्स जाणून घ्या

TVS मोटरची 2W+3W एकूण विक्री

देशांतर्गत टीव्हीएस तीनचाकी वाहनांचा सेल फेब्रुवारी 2023 मध्ये 1,343 झाला असून, फेब्रुवारी 2024 मध्ये 2,066 झाला आहे. जवळपास 53.83% नी हा सेल वाढलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तीनचाकी वाहनांचा सेल फेब्रुवारी 2023 मध्ये 7,781 युनिटचा झाला होता, त्याच दरम्यान फेब्रुवारी 2024 मध्ये 8,548 युनिटची विक्री झालेली आहे. थोडक्यात टीव्हीएस मोटरच्या तीनचाकी वाहनांची मागील वर्षात म्हणजेच फेब्रुवारी 2023 मध्ये 9,124 वाहनांची विक्री झाली होती आणि 2024 मध्ये ही वाढ 1490 युनिट्स ने जास्त झालेली आहे. थोडक्यात टीव्हीएस मोटरने या वर्षात देशांतर्गत दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची 2,69,568 युनिटची विक्री केली आहे, तर आत्तापर्यंत देशाबाहेर 98,856 वाहनांची विक्री झालेली आहे.

Leave a Comment