झेलिओ लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर्स 59 हजारापासून सुरू, 4 तासात फुल चार्ज शिवाय 150 किमीपेक्षा जास्त रेंज 

Zelio electric scooter all models information with price

झेलिओ ऑटो प्रायव्हेट लिमिटेड ही इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारी कंपनी सध्या अचानक चर्चेत आली आहे त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरमुळे. या स्कूटरची खासियत म्हणजे एखादा दुचाकी खरेदी करणाऱ्याच्या गरजा लक्षात घेवून केलेली ह्या स्कूटरची जोडणी. झेलिओ कंपनी एकूण 7 प्रकारच्या स्कूटर विकते ज्या 54,575 रुपये या परवडणाऱ्या किंमतीमध्ये उपलब्ध आहे तर या स्कूटरचे सर्वात महागडे मॉडल 80,000 रुपयांचे आहे. तुम्हाला या भारतातील सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटरची माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील माहिती संपूर्ण वाचा.

झेलिओ इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 7 प्रकार उपलब्ध आहेत ज्यांची किंमत 80 हजारापेक्षा कमी आहे. झेलिओ ग्रेसी आय, झेलिओ ईवा, झेलिओ ग्रेसी, झेलिओ लिजेंडर, झेलिओ ग्रेसी झेडएक्स, झेलिओ ग्रेसी प्लस आणि झेलिओ ग्रेसी प्रो. यातील झेलिओ ग्रेसी ची किंमत Rs. 56,825 – 82,273 रुपये असून एका चार्जवर ही स्कुटर 120 इतकी रेंज देते तर यातील टॉप मॉडल झेलिओ ग्रेसी प्रो ची किंमत Rs. 79,999 इतकी असून ही स्कूटर एका चार्जवर 120 km रेंज देते.

zelio electric scooter price

झेलिओ इलेक्ट्रिक स्कूटरएक्स-शोरूम किंमत
झेलिओ ग्रेसी आयRs. 56,825
झेलिओ ईवाRs. 54,575
झेलिओ ग्रेसीRs. 56,675
झेलिओ लिजेंडरRs. 59,048
झेलिओ ग्रेसी झेडएक्सRs. 59,000
झेलिओ ग्रेसी प्लस Rs. 60,073
झेलिओ ग्रेसी प्रोRs. 79,999

ग्रेसी आय स्कूटर तपशील

झेलिओ ग्रेसी आय इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत Rs. 56,825 इतकी असून या स्कूटरमध्ये 7 किलोची 1.34 Kwh ची लिथियम आयन बॅटरी मिळते, जी एका चार्जवर 80 किमी इतकी रेंज देते. या स्कूटरमधील मोटर BLDC आहे. स्कूटरची बॅटरी चार्ज होण्यासाठी 4 तास पुरेसे आहेत.  एप्रॉन-माउंटेड स्प्लिट हेडलाइट, पुढचा डिस्क ब्रेक आणि मागचा ड्रम ब्रेक सोबत डिजिटल स्पीडोमीटर,ट्रिपमीटर मिळतात. एलईडी हेडलाइट-टेललाइट्स दिले आहेत. ह्या 150 किलोपर्यंत कोणतेही वजन तुम्ही आरामात वाहू शकता.

झेलिओ ग्रेसी आय प्रकाररेंजकिंमत
1.92kWh (लीड ऍसिड बॅटरी)60 किमीRs 59,273
2.24kWh (लीड ऍसिड बॅटरी)80 किमीRs 61,773
2.28kWh (लीड ऍसिड बॅटरी)90 किमीRs 65,073
2.66kWh (लीड ऍसिड बॅटरी)120 किमीRs 68,773
1.8kWh (लिथियम आयन बॅटरी)80 किमीRs 82,273

का झेलिओ इलेक्ट्रिक स्कूटर विकत घ्यावी?

  1. Zelio लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर्स 59 हजारापासून सुरू
  2. एका चार्जवर 120 km रेंज
  3. 7 प्रकारातून उपलब्ध
  4. 150kg लोड-वाहन क्षमता

तुम्हाला पडलेले प्रश्न

भारत 2024 मध्ये Zelio ची सर्वात लोकप्रिय स्कूटर कोणती आहेत?

ग्रेसी, ईवा आणि ग्रेसी आय

Zelio स्कूटरची किंमत काय आहे?

Zelio स्कूटरची किंमत 54,575 ते 83,073 आहे.

Zelio Gracy चालवण्यासाठी मला लायसेन्सची गरज आहे का?

होय, Zelio Gracy i चालविण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे.

भिवानी हरियाणामध्ये Zelio इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत किती आहे?

भिवानी हरियाणामध्ये Zelio इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 56,825 आहे.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment