New 2025 Suzuki access चे 3 नवे वेरिएंट्स लॉंच, बजेट-फ्रेंडली आणि एडवांस्ड फीचर्सने भरपूर

Published:

2025 भारत मोबिलिटी एक्सपोमध्ये सुझुकी मोटरसायकल इंडियाने न्यू 2025 सुझुकी एक्सेस 125 चे तीन वेरिएंट्स सादर केले आहेत. तुम्ही जर बजेट-फ्रेंडली आणि एडवांस्ड फीचर्स ने भरपूर असणारी बाईक शोधत असाल तर New 2025 Suzuki Access 125 हा पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो का चला जाणून घेऊयात. New 2025 Suzuki access

2025 Suzuki Access 125 Ride Connect Edition

या टॉप वेरियंटमध्ये प्रीमियम एडवांस्ड फीचर्स मिळतात, राइड कनेक्ट एडिशनमध्ये – ब्लूटूथ-आधारित कनेक्टिव्हिटी, कॉल, एसएमएस, व्हॉट्सॲप ॲलर्ट, ओव्हर स्पीडिंग ॲलर्ट, हवामान अपडेट्स आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सारखे फीचर्स ऍक्सेस करू शकतात. या Ride Connect Edition वेरिंटमध्ये पर्ल शायनी बीज या रंगाचा पर्याय मिळतो. डिजिटल कन्सोल फोनच्या बॅटरीची पातळीची लेव्हलसुद्धा दर्शवू शकते. याचा प्रीमियम फीचर्समध्ये ड्राइविंग लायसन्स आणि व्हेईकल रजिस्ट्रेशन सॉफ्ट कॉपी सारखे कागदपत्र हाताळता येऊ शकतात.

2025 Suzuki Access 125 स्पेशल एडिशन

88,200 या किंमतीमध्ये उपलब्ध असणारे हे वेरिएंट सॉलिड आइस ग्रीन रंगामध्ये उपलब्ध आहे. बेस वेरिएंटच्या तुलनेत या Access 125 स्पेशल एडिशन वेरिंटमध्ये समोरच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक दिला आहे. मागील बाजूचा ड्रम ब्रेक 130 मिमी इतका आहे.

2025 Suzuki Access Standard Edition

न्यु सुझुकी 125 ची किंमत 81,700 ते 93, 300 पर्यतची असून यामध्ये तीन वेरिएंट्स उपलब्ध झाले आहेत. यातील बेसिक वेरिएंट 81,700 किंमतीमध्ये उपलब्ध आहे, या 2025 Suzuki Access Standard Edition यामध्ये पर्ल ग्रेस व्हाइट, मेटॅलिक मॅट स्टेलर ब्लू आणि मेटॅलिक मॅट ब्लॅक या रंगामध्ये उपलब्ध आहे.

हेपण वाचा: ‘छप्पड फाडके’ कार सेल, मालामाल झाल्या या कार कंपन्या Car Sales

Suzuki Access 125 Standard Edition च्या ब्रेकिंग सेटअपमध्ये पुढच्या आणि मागील बाजूस 130 mm ड्रम ब्रेक्स आहेत. सेफ्टीसाठी, एक सीबीएस प्रणाली मानक , पार्किंग ब्रेक आणि साइड स्टँड इंटरलॉक यांचा समावेश आहे. Access 125 Standard Editionच्या एडवांस्ड फीचर्स मध्ये ओडोमीटर, स्पीडोमीटर, ट्रिप मीटर आणि फ्युएल गेज सोबत इंडिकेटर्स लॅम्प्स दिले गेलेले आहे. याचसोबत सीटखालील स्टोरेज, ड्युअल युटिलिटी हुक, दोन अंडर सीट हुक आणि ॲल्युमिनियम फूटरेस्ट, ड्युअल यूटिलिटी पॅकेट्स, यूएसबी चार्जिंग पोर्ट सोबत यामध्ये दिली गेली आहे.

सुझुकी एक्सेस 125 इंजिन

2025 Suzuki Access 125 मध्ये 124cc चे सिंगल सिलिंडर एयर कोल्ड इंजिन जे CVT गिअरबॉक्स सोबत जोडलं गेलेले आहे. हे इंजिन 8.4 PS आणि 10.2 Nm इतका टॉर्क जनरेट करत. स्कूटरच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक आणि स्विंग आर्म सस्पेंशन दिले आहे.

Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment