हर घर रेंज रोव्हर, आता रेंज रोव्हरची किंमत 56 लाखांनी कमी

The price of Range Rover has reduced by 56 lakh

तुम्ही रेंज रोव्हर घ्यायच्या विचारात आहात का? पण बजेट हलतंय का ? आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरजच नाहीये कारण आता रेंज रोव्हर आणि रेंज रोव्हर स्पोर्ट भारतात बनणार आहे, ज्यामुळे ह्या गाडीच्या मूळ किंमतीवर तब्बल 1 कोटी 40 लाख रुपयांपर्यंत सुट मिळतेय. त्यामुळे हर घर रेंज रोव्हर सारखीच परिस्तिथी झाली आहे, तुम्हाला सुध्दा ह्या कारच्या किंमतीसंबंधित, फिचर्स संबंधित माहितीसाठी खालील माहिती संपूर्ण वाचा.

यापुढे कमी किंमतीमध्ये भारतात बनणार रेंज रोव्हर

भारतामध्ये सर्वाधिक मागणी असणारी लक्झरी SUV म्हणजेच जग्वार लँड रोव्हर (JLR) रेंज रोव्हरच उत्पादन आता आपल्याच देशात होणार आहे, आताच्या घडीला रेंज रोव्हरची किंमत 3 कोटी 30 लाख रुपये असून हिच्या मूळ किंमतीवर सुट मिळुन हया कारची किंमत 2 कोटी 60 लाख रुपये झाली आहे. याचसोबत रेंज रोव्हर स्पोर्ट कारच्या किंमतीमध्ये सुद्धा घसरणं झाली आहे, या कारची मूळ किंमत 1 कोटी 80 लाख रुपये आहे आणि जी आता 1 कोटी 40 लाख इतकी झाली आहे. या दोन गाड्यांच्या किंमतीसोबत रेंज रोव्हर वेलार आणि रेंज रोव्हर इव्होक या दोन गाड्यांची किंमतीसुद्धा भारतामधून कमी झाल्या आहेत.

रेंज रोव्हरची डिलीव्हरी झाली सुरु

रेंज रोव्हर कारची डिलव्हरी सुरू झाली असून तुम्ही या कारचे बुकिंग थेट शोरूम अथवा डीलरमार्फत करू शकता, तर रेंज रोव्हर स्पोर्टसाठी मात्र तुम्हाला 16 ऑगस्ट 2024 पर्यंत वाट बघावी लागणार आहे. रेंज रोव्हर स्पोर्टचे डिझेल आणि पेट्रोल व्हेरिएंट या दोन्हीची समान अशी किंमत ठेवण्यात येणार आहे जी 1.40 कोटी रुपये असणार आहे. इंडियन मेड आणि 2.36 कोटी रुपये किंमत असणाऱ्या  रेंज रोव्हरला HSE LWB इंजिन मिळणार आहे जे 3.0-लिटरचे असणार आहे, तर या कारच्या दुसरा प्रकार 3.0-लीटर पेट्रोल ऑटोबायोग्राफी असणार आहे ज्याची किंमत 2.60 कोटी रुपये असणार आहे. ओव्हर-द-एअर अपडेट्स कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, वायरलेस फोन चार्जिंग, टचस्क्रीन, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले, powered फ्रंट सीट, वेंटिलेटेड सीट, powered टेलगेट, powered ड्राइवर सीट, 13.1-इंच फ्री फ्लोटिंग पीव्ही प्रो टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूज कंट्रोल सारखे इतर अनेक एडवांस्ड फिचर्स कारमध्ये दिले गेले आहेत.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment