2025 KTM 390 Adventure: नवीन युगातील एडवेंचर बाईक

Published:

KTM ने 2025 या वर्षासाठी प्रसिद्ध 2025 KTM 390 Adventure मॉडेलची नवीन आवृत्ती लॉन्च केलेली आहे, KTM 390 मध्ये काही प्रीमियम आणि ऍडव्हान्स फीचर्स आणि टेक्नॉलॉजी चे अपडेट दिले गेलेले आहेत, ज्यामुळे ही बाईक वापरकर्त्यांसाठी अधिक सोयीस्कर सुरक्षित आणि पावरफुल बनलेले आहे. चला जाणून घेऊया 2025 2025 KTM 390 Adventure च्या नवीन आणि सुधारित अपडेट्स बाबतीत संपूर्ण माहिती.

2025 KTM 390 Adventure चे प्रमुख अपडेट्स

1. नवीन आणि सुधारित इंजिन

या बाईक मध्ये असणारे नवीन 399cc लिक्विड-कूल्ड इंजिन हे सहा स्पीड गियरबॉक्सची जोडलेले आहे, हे इंजिन 45 bhp इतकी पावर आणि 40 Nm इतका टॉर्क जनरेट करत. या इंजिन मध्ये दिलेल्या नवीन अपडेट मध्ये हे इंजिन हलक्या आवाजात अधिक शक्ती आणि कमी इंधना मध्ये अधिक मायलेज देईल अशी सुधारणा करण्यात आलेली आहे. ज्यामुळे ही स्पोर्ट बाईक ऑफ-रोड आणि लॉंग-राईड करत असताना अतिशय स्मूथ आणि शक्तिशाली वाटते.

2. अत्याधुनिक TFT डिस्प्ले आणि कनेक्टिविटी

KTM 390 Adventure स्पोर्टबाईक मध्ये 21 इंचाचे फ्रंट आणि 17 इंचाचे रियर वायर-स्पोक व्हील यांचा समावेश आहे, सोबत एक उंच उंच विंडस्क्रीन आणि ऑल नेव्हिगेशन यासारख्या ऍडव्हान्स फीचर्स सुद्धा समावेश आहे. यामध्ये TFT डिस्प्ले सुद्धा मिळतो ज्या डिस्प्ले मार्फत रियल टाईम डेटा, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि सुधारित ग्राफिक्स वापरता येऊ शकतात. प्रवासी या स्पोर्ट बाईक मार्फत राईड करत असताना मोबाईल नेव्हिगेशन, कॉल्स आणि मेसेज सुद्धा आरामात हाताळू शकतात, ज्यामुळे राईड अधिक स्मार्ट आणि सुरक्षित बनते

3. सुधारित राइडिंग मोड्स

यामध्ये स्ट्रीट, ऑफरोड आणि रेन मोड्स यांचा समावेश आहे जो भारतातील हर एक वातावरणासाठी आणि रस्त्यासाठी तयार केलेला आहे शिवाय एक विशेष मोड; “Enduro”, ज्यामध्ये राहिला खडतर ट्रेल्सवर बाईक मार्फत स्टॅबिलिटी आणि कंट्रोल मिळतं असा या बाईकमध्ये मिळतो.

4. आधुनिक हेडलाइट्स आणि LED लाइटिंग

2025 मॉडेलच्या नवीन जनरेशन KTM 390 Adventure मध्ये एलईडी हेडलाईट आणि टेल-लाईट्स मिळता, ज्यामुळे रात्रीचा राइडिंग करतानाचा अनुभव अधिक स्पष्ट आणि सुरक्षित मिळतो.

हेपण वाचा: TVS Apache RTX 300 2025 ऑटो एक्सपोमध्ये स्पॉट

5. सुरक्षा आणि तंत्रज्ञान

सुरक्षित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी या स्पोर्ट बाईकमध्ये ड्युअल चॅनेल ए बी एस म्हणजेच अँटी लोक ब्रेकिंग सिस्टिमचा समावेश आहे जो ऑफ-रोड राइडिंग दरम्यान प्रवाशांना सुरक्षितता आणि नियंत्रण प्रदान करतो. शिवाय याच्या मागच्या विल्सवर ABS स्विच-ऑफ करण्याची क्षमता दिली गेलेली आहे, ज्याच्यामुळे अधिक चांगला ट्रॅक्शन मिळतो.

2025 KTM 390 Adventure किंमत आणि उपलब्धता

2025 KTM 390 Adventure ची एक्स शोरूम किंमत साधारण 3 ते 4 लाख दरम्यानचे असू शकते, प्रीमियम फीचर्स ने असणारी ही एडवेंचर बाईक स्पोर्टप्रेमींसाठी एक उत्तम आणि बेस्ट पर्याय ठरू शकतो. या 2025 390 Adventure ची स्टायलिश अशी डिझाईन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सुधारित सस्पेन्शन यामुळे वापरकर्ता ऑफ रोडिंग आणि ॲडव्हेंचर राईटचे अधिक मजा घेऊ शकतो.

KTM 390 Adventure बुकिंग आणि लाँचिंग

केटीएम 390 मधलीच नवीन KTM 390 Adventure ही बाईक गोव्यामध्ये इंडिया बाईक विकमध्ये सादर केली गेली, ज्यामध्ये 390 Adventure ला महत्त्वाचे आणि प्रीमियम असे अपडेट सुद्धा देण्यात आलेले आहेत, KTM 390 Adventure भारतात 30 जानेवारी 2025 रोजी लॉन्च होणार आहे . केटीएमच्या ऑफ रोड लाइनअपची ओळख ही KTM 390 Adventure करून देते. स्पोर्ट बाईक प्रेमींच्या आवड बघता, भारतातील निवडक केटीएम डीलर्सने new 390 Adventure S आणि 390 Enduro R साठी बुकिंग सुद्धा चालू केलेले आहेत.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment