Ather 450 Apex Launch: ब्रेक न दाबता थांबते हि ई-स्कूटर,

Ather 450 Apex Launch झाली असून काही कॉस्मेटिक बदल करत गाडीचे टॉपस्पीड वाढवण्यात आले आहे. तुम्ही जर पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, बीड, नागपूर, मुंबई, रायगड, रत्नागिरी या शहरांत वास्तव्यास आहेत आणि अथर अपेक्स ची Price आणि फीचर्स ची माहिती घेऊ इच्छित आहात तर हा लेख नक्की वाचा.

front ather apex 450 side

ठळक मुद्दे – 

  • अथर अपेक्स फेब्रुवारी २०२४ रोजी शोरूमला येणार
  • १०० किमी/तास स्पीड मिळणार
  • गाडीत ट्रान्सपरंट बॉडी पॅनल असणार

Ather 450 Apex: स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

ather apex 450 front

कंपनीचे सीईओ आणि फाउंडर, तरुण मेहता यांनी ६ जानेवारी २०२४ रोजी अपेक्स या त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरला लाँच केले असून त्यांनी या गाडीमध्ये ब्रेकिंग, पॉवर आणि कलर यांच्यात केलेल्या बदलावाची माहिती दिली आहे.

ather apex 450 side

ट्रान्सपरंट बॉडी – नवीन अथर ४५० अपेक्स यामध्ये ट्रान्सपरंट बॉडी दिली आहे म्हणजे गाडीचे पार्टस पारदर्शक असतील ज्यामधून आरपार दिसेल. गाडी आतून सुद्धा सुंदर आहे आणि आतील सगळे सुंदर स्ट्रक्चर भारतीयांनी बनवले आहे आणि ते आम्ही सेलिब्रेट करत आहोत असे तरुण मेहता म्हणाले.  लक्ष्यात घेण्याची गोष्ट आहे कि गाडीमध्ये पुढचे आणि साईडचे सर्व पॅनेल्स हे रंग दिलेले असतील परंतु पाठीमागचे दोन साईड पॅनेल्स हे फक्त पारदर्शक असणार आहेत.

ather apex 450 back

Warp+मोड – गाडीच्या डिजाईन मध्ये काहीही बदल नाही म्हणजे डिजाईन, बॅटरी किंवा इतर, पण कंपनीने टॉप स्पीड वाढविण्यासाठी मोटरला जास्त पॉवर दिली आहे. आता गाडीमध्ये ७ kw पॉवर असणारी २६ एनएम टॉर्क निर्माण करणारी पीएमएस मोटर दिली जाईल ज्याने आता १०० किमी/ताशी वेग या गाडीला मिळणार आहे आणि त्यासाठी Warp+ हा नवीन रायडींग मोड गाडीत दिला आहे. या मोडमुळे गाडी पूर्वी पेक्षा २.९ सेकंदाने आधी वेगवान झाली आहे. आता गाडीमध्ये टोटल पाच रायडींग मोड्स उपलब्ध असतील. या मोडमध्ये गाडी ७५ किमी रेंज एका चार्ज मध्ये देईल.

वाचा – Tata Punch EV: फक्त २१ हजारांत करा बुक, कलर्स आणि व्हेरिएंट्स तपशील लॉन्चपूर्वी उघड

मॅजिक ट्विस्ट – अथर अपेक्स मध्ये मॅजिक थ्रॉटल ट्विस्ट हे फिचर दिले आहे जे गाडीचा ब्रेक न दाबता गाडीला थांबवते. अथर पूर्वीपासूनच रिजनरेटिव्ह मोड देत आहे ज्यामध्ये थ्रोटल पुढे फिरवला कि गाडीचे ब्रेक लागतात आणि बॅटरी चार्ज होते. पण हे फिचर गाडीची बॅटरी ८५% पेक्षा कमी झाल्यावरच काम करत असे शिवाय याची गाडी थांबवण्याची क्षमता कमी होती. आता पेक्स मध्ये यात अपग्रेड केले असून १००% बॅटरी असल्यावर सुद्धा हे काम करणार आहे ज्याने ब्रेक वापरायची गरज पडणार नाही. याचा फायदा असा होईल कि रेंज जास्त मिळेल आणि ब्रेक पॅड्स वारंवार बदलावे लागणार नाहीत.

वाचा – Bajaj Chetak Premium 2024 – पहा नवीन चेतकची ऑन-रोड किंमत, फीचर्स आणि न सांगितलेल्या गोष्टी

किंमत – अथर एनर्जीने गाडीची किंमत हि Rs 1.89 lakh (maharashtra) एक्स-शोरूम इतकी ठेवली असून गाडीची ऑन-रोड किंमत लवकरच इथे अपडेट केली जाणार आहे. गाडी बुक करण्यासाठी ऑफिशिअल वेबसाईट जाऊन ग्राहक ₹२५०० च्या रिफंडेबल अमाऊंट ने बुक करू शकतात. अपेक्स ची डिलिव्हरी मार्च २०२४ पासून सुरु होणार असून गाडी शोरूम मध्ये फेब्रुवारी २०२४ पासून टेस्ट राईड साठी उपलब्ध होणार आहे.

Ather 450 Apex Price in Maharashtra

  • Ex-showroom price* – ₹ 1,89,157
  • FAME || subsidyState subsidy (Direct to customer) – NO
  • Effective ex-showroom price – ₹ 1,89,158
  • Insurance (Approx) – ₹ 7,484
  • RTO registration & smart card fees – ₹ 258
  • Road tax – NO
  • On-road price –  ₹ 1,96,900

ऑटो हेल्पर मराठी या चॅनेल वर गाडीचा रिव्हिव लवकरच येणार आहे त्यामुळे आपला यूट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा.

Ather 450 Apex Specifications – 

स्कूटर मॉडेलAther 450 Apex
एडिशनLimited
बॅटरी3.7 kWh
रेंज110 KM
मोटर7.0 kW PMSM / 26NM
टॉपस्पीड100 KMPH
0-40 स्पीड2.9 Sec
बूट स्टोरेज21 L
कलर पर्यायIndium Blue (निळा)
Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment