‘नवीन फीचर्स’ मिळाले बजाज चेतक प्रीमियम मॉडेलला, 127 km रेंज देणारी बजाजची नवीन स्कुटर

भारतामधल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या सेगमेंटमधलं नावारूपास आलेलं बजाज ब्रॅंड, स्वतःची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन येत आहे. ह्या स्कुटरच नाव आहे; ‘बजाज चेतक प्रीमियम इंडिया’. या दमदार नाव मिळालेल्या बजाजच्या नवीन स्कुटरला तुमच्या अपेक्षेप्रमाणे आकर्षक मेकॅनिकल अपडेट्स मिळाले आहेत,या स्कुटरमध्ये मजबूत बॅटरी दिली गेली आहे ,जी तुम्हाला लांबच्या प्रवासाचा पल्ला गाठायला मदत करते.

बजाज चेतक प्रीमियम इंडिया

बजाज इतर चेतक स्कूटरची लोकप्रियता पाहता ,बजाज ने चालू चेतकमध्ये लोकांच्या अपेक्षेप्रमाणे काही बदल करत आणि नव्याने काही ‘अपडेट्स’ बजाज चेतक प्रीमियम इंडिया ला दिले आहेत. नव्या प्रीमियम बजाज चेतकच्या डिझाइन बाबतीत माहिती देता, चालू चेतकप्रमाणेच ही नवी चेतक प्रीमियम लुकनुसार आहे, चेतक अर्बन प्रमाणेच दी सिंगल-पीस सीट, कर्व्ही फेंडर्स ,राउंड एलईडी हेडलाइट, कर्व्ही साइड पॅनल्स या स्कूटर मध्ये पाहायला मिळणार आहेत. या स्कूटरमध्ये मोनोशॉक आणि सिंगल-डिस्क ब्रेक सेटअप अलॉय व्हील्स मिळत आहेत.

फिचर्सने सुसज्ज बजाज चेतक प्रीमियम इंडिया

बजाज चेतकच्या जुन्या मॉडेलप्रमाणेच लुक जरी असला, तरी ह्या नव्या चेतक प्रीमियर मध्ये आपल्याला नवीन आकर्षक पेंट कलर मिळणार आहे, मोठा आणि अतिशय सोप्या पध्दतीने ऑपरेट होणारा डिजिटल कन्सोल; ज्यामध्ये नेव्हिगेशन ,स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ कनेक्टिविटी , राइड मोड, रिव्हर्स मोड, जिओ-फेन्सिंग, LED इल्युमिनेशन , व्हेईकल ट्रॅकिंग आणि CBS सारखे तगडे फिचर्स असणार आहेत. यूजर या स्कूटरचा थीम डिस्प्ले बदलू शकतात आणि या नव्या बजाज चेतकमध्ये प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवणारे फिचर्स TPMS म्हणजेच टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम असणार आहे, सोबतच सिक्वेनशियल ब्लिंकर्स सुद्धा या स्कूटरमध्ये मिळणार आहेत. प्रेक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे, या स्कूटरच्या अंडर सिट स्टोरेज ची क्षमता सुद्धा वाढवण्यात आली आहे. या स्कूटरला अजून एक आकर्षित फिचर मिळत आहे, ज्याला ‘हिल होल्ड कंट्रोल’ म्हणतात ,यामुळे वळणदार किंवा उंच रस्त्यावर स्कूटर मागे न जाता एका जागी स्थिर राहुन स्कूटरला चढ पार करण, सोपे जातं .

वाचा : बिग बॉस विजेत्याला मिळणार ही इलेक्ट्रिक गाडी, बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच इको फ्रेंडली बक्षीस

लाँग रेंजची अपेक्षा पूर्ण करणारी चेतक प्रीमियमची बॅटरी

बजाज चेतक प्रीमियम मध्ये, 73kmph चा टॉप स्पीड असणारी आणि 127 km रेंज देणारी 3.2 kWh बॅटरी पॅक पुरवण्यात आला आहे. नवीन बजाज चेतकमध्ये असणारी बॅटरी चालू बजाजच्या 2.9kWh बॅटरी युनिटच्या तुलनेत मोठी आहे, ज्यामुळे प्रवास करताना स्कूटर कडून लाँग रेंजची अपेक्षा पूर्ण केली जाईल.

ओला-एथरला तोडीस-तोड देणाऱ्या बजाज चेतक प्रीमियमची किंमत

Ola S1 Pro, Ather 450X , Simple One यांची प्रतिस्पर्धी बजाज चेतक प्रीमियम ची किंमत साधारण ₹ 1.35 लाख (एक्स-शोरूम) असण्याची अपेक्षा आहे. तुम्ही जर मजबूत बॉडी स्ट्रक्चर आणि लाँग रेंज देणार्या गाडीच्या शोधात असाल तर, बजाज चेतक प्रीमियम इंडिया हा एक चांगला पर्याय आहे.

वाचा: Electric Honda Activa: ठरलं! या तारखेला लाँच होणार इलेकट्रीक होंडा ऍक्टिवा

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment