जगातल्या पहिल्या CNG बाईकची संपूर्ण माहिती

Bajaj CNG Bike – बजाज फ्रीडम

आजपर्यंत तुम्ही CNG कार च पाहिली असेल, पण आत्ता चक्क भारतामध्ये CNG बाईक लाँच झाली आहे, जिची किंमत अगदी 1 लाखाच्या आतमध्ये आहे. तुम्ला सुद्धा Bajaj CNG bike models संबंधित प्रश्न पडले असतील, तर खालील माहिती संपूर्ण वाचा.

जगातील पहिली CNG बाईकची किंमत

CNG बाईक म्हणजे सर्वात प्रथम डोक्यात येत सेफ्टी बद्दल. tank फुटला किंवा देव न करो पण रोड वर अपघात झाला तर सुरक्षिततेचा काय? या सगळ्याचा विचार बजाज ने केला आहे. बजाज फ्रीडम बाईक सरकारच्या सर्व सेफ्टी नियम चे पालन करते. गाडीची रियल टेस्ट सुधा केली आहे. बजाज ने लाखो CNG रिक्षा विकल्यात कधी अपघाताची बातमी कानावर नाही आली ! जर कधी गॅस लिकेज झाला तर नॉब दिला आहे, त्याला बंद केला की CNG सप्लाय बंद होईल.

बजाज Freedom : इंजिन स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स माहिती

या गाडीत प्रॉटेक्तिव ट्रेलीस फ्रेम सह CNG tank सीट खाली दिला आहे. त्याला उधडण्यासाठी डाव्या बाजूला खाली की लॉक मिळतं. या टाकीची 2 kg ची क्षमता आहे. या टाकीला दर 3 वर्षाला टेस्टिंग करण आवश्यक आहे. सर्व्हिस सेंटर मध्ये ते काम होऊन जाईल. कंपनी क्लेम नुसार गाडी 1 kg CNG मध्ये ही 100 km अवरेज देते. पेट्रोल मध्ये 65 kmpl आवरेज मिळतं. 2 किलो CNG आणि 2 लिटर पेट्रोल क्षमता या गाडीत दिली आहे. एकूण 330 km रेंज या गाडीत मिळणार आहे.

गाडीमध्ये नवनिर्मित 4 स्ट्रोक एअर कुल्ड 125 cc इंजिन दिलं आहे. CNG मध्ये 9.5 ps पॉवर आणि 9.7 nm tork निर्माण करते. पेट्रोल मध्ये 93.4 किमी तर CNG मध्ये 90.5 किमी टॉप स्पीड दिले आहे. गाडीमध्ये 5 गेअर्स दिलेत. 1 ला पुढे आणि बाकीचे पाठीमागे टाकावे लागतात. दर 5 हजार किमिला गाडी सर्व्हिस करावी लागेल. खर्च सुधा पेट्रोल गाडी एवढंच येईल.

फ्रीडमचे 3 मॉडेल्स

NG 04 Drum, या मॉडेल ची किंमत 95 हजार आहे. NG 04 Drum LED मॉडेल ची किंमत 1,05,000 आहे. NG 04 Disc LED ची किंमत 1,10,000. तीन ही मॉडेल्स मध्ये फीचर्स मध्ये बदल आहेत. टोटल 5 कलर्स फ्रीडम मध्ये दिले आहेत. फ्रीडम मध्ये मोठा हँडलबर दिला आहे. लांबच्या राईड वेळेस त दुःखी यामुळे टळेल. स्विच गियर एसीसिसबल आहेत. मोबाईल चार्ज करण्यासाठी USB A पोर्ट दिला आहे. टॉप मॉडेलमध्ये दिलेला एलसीडी डिस्प्ले ब्ल्यू टूथ फीचर सह येतो.

गाडीची डिजाइन सब्जेक्टिव आहे. पारंपरिक दुचाकी पेक्षा या गाडीची डिजाइन थोडी वेगळी आहे. महत्त्वाचं म्हणजे पॅनल गॅप नाहीयेत. स्वच्छ टापटीप डिजाइन आहे. गोल LED hedlamp दिला आहे. इंडिकेटर असे दिले आहेत. पुढे ट्वीन Telescopic सस्पेंशन दिले असून त्यावर gaurd दिला आहे. पुढच्या चाकाला टॉप मॉडेल मध्ये डिस्क ब्रेक दिला असेल. टायर 17 इंच दिलेला आहे. रियर डिजाइनमध्ये टेल लॅम्प आणि इंडिकेटर सुद्धा मिळतो. पाठीमागे CBS ड्रम ब्रेक दिला आहे. टायर 16 इंच दिलेला आहे. पुढच्या टायर पेक्षा याची रुंदी जास्त आहे. पाठीमागे मोनो लिंक सस्पेंशन दिले आहे.

On road price –

बजाज फ्रीडम CNG बाईक ची रानिंग कॉस्ट calculate केल्यावर 88 पैसे प्रती किलोमिटर इतकी येते आहे जी पेट्रोल chya तुलनेने खूप कमी आहे.

  • डिस्क CNG बाईक :- 133256/-
    एक्सशोरूम:-109997/-
  • ड्रम LED CNG बाईक :-127586/-
    एक्सशोरूम:-104998/-
  • ड्रम हॅलोजन CNG बाईक:- 116240/-
    एक्सशोरूम:- 94995/-

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment