अस म्हणतात की बाज की नजर और होंडा यूनिकॉर्न की रिलेबिलिटी पर कभी संदेह नाही करते, एकदा यूनिकॉर्न घेतली की पुढची 15 – 20 वर्ष खच्चून वापरायची. 2010 मधे घेतलेल्या यूनिकॉर्न बाइक ला लोक अजून चालवतात. मस्त मायलेज, जास्त देखभालीचा खर्च नाही आणि देशाच्या काना कोपऱ्यात पार्ट मिळतात. होंडा ने याच लोकप्रिय यूनिकॉर्न ला नव्या रूपात लाँच केली आहे. कंपनीने सरकारच्या OBD2B emission norms च्या अटी पूर्ण करण्यासाठी हे मॉडल अपडेट केले आहे.
अपडेटेड मॉडल मधे इंजिन आणि फीचर्स मधे अपग्रेड केले असले तरी ग्राहकांच्या खिश्यावर आता अतिरिक्त खर्चाची झळ पडणार आहे..
रंग पर्याय –
होंडा ने यूनिकॉर्न मधील निळा कलर बंद केला आहे आणि आता या बाईक मधे फक्त 3 कलर्स उपलब्ध असणार आहेत ज्यामध्ये – पर्ल इग्नियस ब्लॅक, मॅट ॲक्सिस ग्रे मेटॅलिक आणि रेडियंट रेड मेटॅलिकचा समावेश आहे.
डिझाईन –
2025 यूनिकॉर्न च्या डिझाईन शी कंपनीने छेडछाड केली नाही तुम्हाला तोच क्लासिक लुक या गाडीमध्ये मिळणार आहे. नवे मॉडल All New LED headlamp क्रोम बॉर्डर सह येतो ज्यामुळे गाडीचा लुक प्रीमियम आणि नव्या जमान्याचा वाटतो.
अनलॉग स्पीडो मीटर हटवून आता फुल डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर दिले आहे जे की एक स्टँडआउट फिचर आहे.. या मधे रायडर ला गियर इंडिकेटर, सर्विस रिमांडर, आणि इको इंडिकेटर दिले आहेत.. रायडर च्या ese साठी USB Type-C port यामधे देण्यात आला आहे.
दैनंदिन प्रवास करण्यासाठी comfort आणि practicality मिळण्यासाठी युनिकॉर्नची रचना करण्यात आली आहे. या बाईक ची लांबी 2,081 मिमी, रुंदी 756 मिमी आणि उंची 1,103 मिमी आहे, व्हीलबेस 1,335 मिमी आणि ग्राउंड क्लीयरन्स 187 मिमी आहे.
गाडीचे संपूर्ण वजन 139 किलोग्रॅम, तर सीटची उंची 798 मिमी आणि सीटची लांबी 715 मिमी आहे.. हे मोठे सिट रायडर आणि पिलियन दोघांसाठी आरामदाई आहे… पेट्रोल टैंक 13 लिटर चा दिला असून यामधे E20 पेट्रोल भरले तरी चालणार आहे..
बाईक मधे पुढे 80/100-18 आणि पाठी 100/90-18 tubeless tyres दिले आहेत. पुढे 240 mm डिस्क आणि मागे 130 mm ड्रम ब्रेक दिला आहे.
इंजिन –
सरकारच्या OBD2B compliance रेग्युलेशन सोबतच रिलायबल परफॉरमेंस आणि बेस्ट फ्यूल एफिशियन्सी मिळण्यासाठी 162.71cc, single-cylinder, 4-stroke SI engine यूनिकॉर्न मधे दिले आहे जे 9.7 kW पॉवर आणि 14.58 Nm टॉर्क जनरेट करते.
किंमत –
2025 होंडा यूनिकॉर्न ची किंमत पहिल्या मॉडल पेक्षा 8 हजार रुपयनी वाढली असून ही गाडी आता 1.19 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमती मधे उपलब्ध असणार.. या बाईक ची सरळ टक्कर ही Yamaha FZ, Bajaj Pulsar, Suzuki Gixxer और TVS Apache RTR 160 2V यांसारख्या वाहनांशी होणार आहे.