बजाज ने माय पल्सर ऑफिशियल- mypulsarofficial या सोशल मीडिया पेजवर ब्लॅक अँड व्हाईट थीममध्ये एक शॉर्ट अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये ही नवीन मोटरसायकल बजाज RS160 असेल? की RS200 असेल? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे पण या क्लिपमध्ये मोटरसायकलच्या मागच्या टायरचा आकार आणि डिझाईन बघता ही मोटर सायकल आरएस 160 असण्याची शक्यता दाट आहे. New Bajaj Motorcycle Launch This Week- Pulsar RS160
bajaj Pulsar RS160 या आठवड्यात लॉंच
बजाजचे आगामी मोटरसायकल RS160 ही या आठवड्यातच लॉन्च होणार असून सोशल मीडियावर 0X-01-2025 तारीख अशी दाखवलेली आहे , मग ही तारीख 6 ते 9 जानेवारी दरम्यान मधली कोणतीही तारीख असू शकते.
हेपण वाचा: 2025 मध्ये आगामी रॉयल एनफिल्ड मोटरसायकल : 440cc ते 750 सीसी
RS160 ला मिळणार हे बोल्ड लुक्स
या आठवड्यात लॉन्च होणाऱ्या बजाजच्या Pulsar RS160 मोटरसायकलमध्ये अनेक अशा बोल्ड गोष्टी पाहायला मिळणार आहेत, ज्यामध्ये फ्युएल टैंक, सिग्नेचर ड्रॅगन टेल LED टेललाइट, प्रोजेक्टर हेडलाइट आणि LED DRLs, अपडेट साइड आणि मागील प्रोफाईल यांचा समावेश आहे. Pulsar N160 सारखेच RS160 मधले इंजिन हे 164.82 सीसीचे असेल जे इंजिन 16 ps इतकी पॉवर आणि 14.65 इतका टॉर्क तयार करू शकते.
बजाज RS160 ची सेफ्टी आणि ॲडव्हान्स फिचर्स
या मोटरसायकल मध्ये एक स्टेबल रायडींग एक्सपिरीयन्स येण्यासाठी पुढच्या बाजूला अपसाईट आणि मागच्या बाजूला मोनूशक दिलेले आहेत, पुढचा टायर 130/80 फ्रंट टायर आणि 130/70 मागचा टायर मिळतो, या मोटरसायकल मध्ये सुरक्षितेच्याच्या दृष्टिकोनातून ब्रेकिंग सिस्टीम मध्ये ABS सोबत फ्रंट ब्रेक आणि रियरसाठी डिस्क ब्रेक दिला गेलेला आहे. या मोटरसायकलमध्ये डिजिटल कन्सोल ज्यामध्ये रूट गायडन्स साठी ब्लूटूथ नेवीगेशन कॉल्स आणि मेसेज इकॉनोमी इंडिकेशन्स स्मार्टफोन नेटवर्क रेंज डिस्प्ले यांसारखे ॲडव्हान्स फिचर्स मिळतात.