2 लाखात ‘Worth’ आहे का अपडेटेड Bajaj Pulsar RS 200 ?

Published:

बजाजची एन्ट्री लेवल परफॉर्मन्स बाईक RS200 लॉंच झालेली आहे , 2025 पल्सर RS200ची किंमत दोन लाखाच्या आतील आहे, तुम्हाला या नवीन वर्षात चांगले फीचर्स, डिझाईन आणि टेक्नॉलॉजीने भरून असणारी अपडेटेड बाईक विकत घ्यायची असेल तर नवीन 2025 पल्सर RS200 तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो, चला या मोटरसायकलची अजून माहिती जाणून घेऊया. New Bajaj Pulsar RS 200 Launch under Rs 2 Lakh 

2025 Bajaj Pulsar RS 200

पल्सर RS200 सगळ्यात पहिल्यांदा 2015 मध्ये सादर करण्यात आली होती, यानंतर भारतातील रस्त्यावर अनेक पल्सर RS200 धावताना आवडीने चालवताना सुद्धा दिसल्या गेल्या, म्हणूनच बजाजने या मोटरसायकलला महत्त्वपूर्ण अपडेट्स सोबत लॉन्च केलेला आहे. या नवीन अपडेट्स मध्ये नवीन इंजिन आणि ट्रान्समिशन, टायर सस्पेन्शन आणि इलेक्ट्रिकल फीचर्स चा समावेश झालेला आहे.

हेपण वाचा: Tata Car Discounts – सणसुदीच्या मुहूर्तावर टाटा कार्स वर मिळतोय 3 लाख रुपयांचा डिस्काऊंट

पल्सर RS200 डायमेन्शन्स

RS200 च्या डायमेन्शनची माहिती देता, 1999 mm या गाडीची लांबी आहे, 775 mm या गाडीची रुंदी आहे, उंचीने ही मोटरसायकल 1114 mm इतकी, आहे तरी या मोटरसायकलचा ग्राउंड क्लिअरन्स 157 इतका आहे. मोटरसायकल मधली सिटची उंची 810 mm इतकी दिलेली आहे, विल बेस १३५८ mm आहे. एकूण या मोटरसायकलचे वजन 167 किलो इतका आहे.

पल्सर RS200 इंजिन

बजाजच्या या मोटरसायकल मध्ये 199.5cc BSVI-compliant, liquid-cooled engine दिल गेलेल आहे, ज्याची 9750 rpm वर 24.5 PS इतकी पॉवर आणि 8000 rpm वर 18.7 Nm इतका पार्क जनरेट करण्याची क्षमता आहे. सहा स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन या मोटरसायकलमध्ये असून गेअर शिफ्टिंगचा पॅटर्नमध्ये एक गियर खालच्या बाजूला तर उर्वरित पाच गियर हे वरच्या बाजूला दिलेले आहेत.

पल्सर RS200 ब्रेकिंग सिस्टीम

या मोटरसायकल मध्ये पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक सोबत अँटी फ्रिक्शनल बस सस्पेन्शन दिलेला आहे तर मागच्या बाजूला कॅनिस्टरसह नायट्रॉक्स मोनो शोकोब्स दिलेले आहेत. या बाईकमध्ये ब्रेकिंग सिस्टीम मध्ये पुढच्या बाजूला 300 mm डिया-डिस्क ब्रेक मिळतो आणि ड्युएल चॅनेल ABS सोबत तीन रायडींग मॉड्स मिळतात, ज्यामध्ये रेन, ऑफ रोड आणि रोड यांचा समावेश आहे. तर मागच्या बाजूला २३० mm डिया-डिस्क ब्रेक मिळतो.

 पल्सर RS200 एडवांस्ड फीचर्स

या मोटरसायकलच्या इलेक्ट्रिक फीचर्स मध्ये 24 वॅटचा लो बीम एलईडी प्रोजेक्टर आणि 36 वॅटचा हाय बीम एलईडी प्रोजेक्टर मिळतो. ही मोटर सायकल टेक्नॉलॉजी भरपूर आहे यामध्ये डिजिटल बॉण्डेड ग्लास स्पीडोमीटर सोबत ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी , TBT नेवीगेशन, गियर इंडिकेशन, कॉल आन्सरिंग आणि ABS मोडस आणि DTE आणि इंटिग्रेटेड लाईट सेन्सर सुद्धा या मोटरसायकल मध्ये दिलेले आहेत.

Bajaj Pulsar RS 200 Price – किंमत

या एन्ट्री लेवल परफॉर्मन्स बाईक 2025 पल्सर RS200 ची किंमत 1,84,115/- (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी आहे, तुम्ही जर रोजच्या राईडसाठी स्पोर्टी ग्राफिक्स- डायनामिक फेसिंग, स्टाइलिंग आणि अपडेटेड फीचर्सने भरलेली बाईक शोधत असाल, तर बजाजची अपडेटेड पल्सर RS200 ही तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment