रॉयल एनफिल्ड हिमालयन 452 पहिल तर क्लासिक 350 विसरून जाल!

रॉयल एनफिल्ड प्रेमीकरिता नवीन खुशखबर….! 7 नोव्हेंबर दिवशी रॉयल एनफिल्ड ने आत्ता मार्केटमध्ये  ची एंट्री करायची ठरवली आहे. निर्मात्यांकडून बहुप्रतिक्षित असणाऱ्या रॉयल इन्फिल्फ नवीन जनरेशन हिमालयन 452 बद्दल अधिक माहिती उघड झाली आहे. तुम्ही जर रॉयल इन्फिल्फ प्रेमी असाल तर जाणून घेऊया, या रॉयल इन्फिल्फ च्या नवीन जनरेशन हिमालयन 452 बद्दल अधिक माहिती या लेखात. 

रॉयल एनफिल्ड हिमालयन 452 पहिल तर क्लासिक ३५० विसरून जाल

Royal Enfield (रॉयल इन्फिल्फ) नवीन जनरेशन हिमालयन 452 बद्दल अधिक माहिती देता, निर्मात्यांनी नवा कोरा या Royal Enfield Himalayan 452 गाडीचा एक व्हिडीओ प्रदर्शित केला आहे, ज्यामध्ये हिमालयन 452 ही KTM 390 ला तगडी टक्कर देत प्रदर्शित केली आहे. यामध्ये हिमालयन 452 क्रॉस स्पोक व्हील शिवाय tubeless टियर असणार आहेत, निर्मात्याकडून बाकीची माहिती जरी प्रसिद्ध झाली नसली तरी क्रॅश गार्ड्स ,विंडस्क्रीन,पॅनियर्स आणि सीट यासारखी उपकरणे असल्यामुळे क्रॉस स्पोक व्हील दिले आहे अशी दाट शक्यता आहे. 

रॉयल इन्फिल्ड नवीन जनरेशन हिमालयन 452 इंजिन असणार इतकं पॉवरफुल…!

रॉयल इन्फिल्ड च्या इतिहासात नव्याने असणारे हिमालयन 452 च इंजिन हे liquid cooling असून, सिंगल सिलेंडर युनिट आहे. यामध्ये असणारे नवीन शेर्पा 450 नाव असणार इंजिन 23,97 चे पीक पॉवर आणि LS 410 32 Nm 4,000 rpm चे पीक टॉर्क इतक आउटपुट करत. यामध्ये ६ स्पीड युनिट गियरबॉक्स असणार आहेत. 

हिमालयन 452 चाकाच्या रचनेबाबतीत बोलायला गेलं, तर पुढचं चाक 21 इंचाच, तर मागचं चाक 17 इंचाच असणार आहे. या गाडीतील पुढच्या बाजूला शोवा upside down fork आणि मागच्या बाजूलामोनो शॉक सस्पेंशन असणार आहेत. हिमालयन 452 मध्ये ड्युअल चॅनेल ABS असणार आहे, जे मागच्या चाकावर बंद होऊ शकतं. हिमालयन 452 मध्ये ब्रेकिंग सिस्टम ही मागील बाजूस डिसब्रेक असणार आहे. 

रॉयल इन्फिल्ड नवीन जनरेशन हिमालयन 452 असा असणार लुक..!

गाडीचा लूकबद्दल बोलायचं झाल, तर जुन्या हिमालयीन 411 पेक्षा खूप चांगल्या पद्धतीचं desgin या नवीन हिमालयन 452 गाडीमध्ये दिसून येत. गाडीमध्ये LED हेडलँप, पॉवर switch सोबत, कोरा करकरीत असा TFT डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या गाडीत दिला आहे, ज्याला bluetooth connectivity आणि navigation पर्याय आहे. नवीन ग्रॅब हँडल्स,मोठे इंटरकूलर, नवीन एक्झॉस्ट मुळे गाडीचा भन्नाट असा लुक दिसून येतो. सीटच्या बाबतीत बोलता , गाडीच्या सीटमध्ये बदलाव केला असून, गाडीच्या मागे luggage carrier दिलय ,ज्याची क्षमता ५ किलो इतकी आहे.

वाचा – New Tata Altroz Racer: टाटा मोटर्स करणार धमाका, Hyundai i20 N line चा द एन्ड?

वाचा – ओला इलेकट्रीक स्कूटरला आग, कंपनीने काय दिल स्टेटमेंट वाचा

इतकी असणार रॉयल इन्फिल्ड नवीन जनरेशन हिमालयन 452 ची किंमत…!

गाडीची किंमत रिव्हिल झाली असून कंपनीने न्यू रॉयल एनफील्ड हिमालयन 452 ची किंमत २.७० लाख रुपये इतकी ठेवली आहे. एक लक्ष्यात घ्या कि हि किंमत एक्स शोरूम आहे. जर न्यू रॉयल एनफील्ड हिमालयन 452 मार्केट मध्ये कोणत्या कंपनीच्या वाहनांना टक्कर देईल तर, Yezdi Adventure, BMW G 310 GS आणि KTM 390 Adventure या गाड्या या लिस्ट मध्ये अग्र स्थानी असतील.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment