सुझुकी साजरा करतेय ‘जश्न-ए-10 लाख’, सुझुकी टू-व्हीलरचे रेकॉर्ड ब्रेकिंग प्रोडक्शन

Suzuki Motorcycle India Limited ने या नव्या वर्षात 1 दशलक्ष म्हणजेच 10 लाख मनुफक्चरिंग यूनिट्स बनवून इतिहास रचला आहे. सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (SMIPL) ला हा आनंदाचा आणि अभिनमानाचा अनुभव मिळवण्यासाठी 2006 ते आर्थिक वर्ष 2023-24 पर्यंत उत्पादन वाढीचा प्रवास करावा लागला आहे, चला जाणून घेयूया हा याबदल अधिक माहिती

सुझुकी मोटारसायकल

2006 साली स्थापन झालेली सुझुकी मोटरसायकल इंडिया लिमिटेड, जपान भारतात अतिशय पॉपुलर कंपनी आहे, जी स्पोर्ट्स बाईक, स्कूटर, ATVs आणि मोटरसायकल बनवते.

वाचा: ही घ्या टाटाच्या नव्या 3 वेरिएंट्सची किंमत, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

सुझुकी 2023-24 मध्ये 10 लाख टू-व्हीलरचे रेकॉर्ड ब्रेकिंग प्रोडक्शन

ह्या वर्षात सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रा. लिमिटेडने एक कौतुकास्पद आणि उल्लेखनीय कामगिरी बजावत SMIPL चे नाव रोशन केले आहे. हा टप्पा गाठत असताना SMIPL कारखान्यातून बाहेर पडणारे 1 दशलक्षवे प्रोडक्ट सुझुकी ऍक्सेसचे युनिट होते, आणि सुजुकीसाठी हा टप्पा अधिक अभिमानाचा ठरल्याचे कारण; ही कामगिरी केवळ एका वर्षापेक्षा कमी कालावधीत पूर्ण झाली.

रजनीश कुमार मेहता  (कार्यकारी उपाध्यक्ष, उत्पादन, SMIPL) यांनी हा टप्पा पूर्ण झाल्याचा आनंदात सांगितले की , “एका वर्षापेक्षा कमी कालावधीत 10 लाख युनिट्सचे उत्पादन मिळवणे ही सुझुकी मोटरसायकल इंडियासाठी उल्लेखनीय कार्यप्रदर्शन आहे. देशामधल्या बाजारपेठेतून आणि देशाबाहेरील बाजारपेठेतील सुझुकी टू-व्हीलरच्या सतत वाढत्या मागणीला अनुसरून राहण्यासाठी आम्ही आमच्या मूळ स्थापित क्षमतेच्या 1 दशलक्ष युनिट्सच्या पलीकडे गेलो आहोत. SMIPL कामगारांनी आणि अभियंत्यांनी प्लांटला त्याच्या उच्च क्षमतेवर चालवताना आणि त्याच वेळी वितरण क्षमता वाढवण्यासाठी पावले उचलताना अतिशय उच्च पातळीवरील चातुर्य आणि वचनबद्धता दाखवली आहे. आम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि आमच्या पुरवठादारांचे आभारी आहोत ज्यांच्या प्रयत्नांमुळे हा महत्त्वपूर्ण टप्पा शक्य झाला आहे.”

वाचा: Kinetic Luna Electric: चल मेरी लुना! ₹५०० रुपयांत बुक करा ई-लुना, किंमत फक्त

सुझुकी मोटरसायकल लेटेस्ट अपडेट

नुकत्याच घडलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये V-Strom 800 DE ही मोटरसायकल सुझुकीने सादर केली, कंपनीच्या म्हणण्यानुसार या मोटारसायकलचे मायलेज मायलेज 22.7 km पर लिटर इतके आहे.  या मोटोसायकलमध्ये 776 cc, लिक्विड कूल्ड पॅरलल ट्विन इंजिन दिलं जेल आहे जे, 83 bhp इतकी कमाल पॉवर आणि 78 Nm चा पीक टॉर्क जनरेट करत. कंपनीने त्याचे असल्याचा दावा केला आहे, आणि लवकरच V-Strom 800 DE भारताच्या रोडवर पळताना दिसण्याची अपेक्षा सुद्धा आहे.

वाचा: एमजी कारवर 3.90 लाखांपर्यंत सुट, जाणून घ्या MG Motor च्या नवीन ऑफर्स

भारतातील सुझुकी बाईक मॉडेल्स

भारतामध्ये सुझुकी कंपनी मोटरसायकल आणि स्कूटरची विक्री करते,  सुझुकीच्या लोकप्रिय स्कूटरमध्ये  Access 125, Avenis, Burgman Street आणि Burgman Street EX चा समावेश आहे तर मोटरसायकलमध्ये जिक्सर एसएफ, जिक्सर, कटाना, हायाबुसा, व्ही-स्ट्रॉम एसएक्स, जिक्सर एसएफ २५०,व्ही-स्ट्रॉम 650XT आणि Gixxer 250 यांचा समावेश आहे.

सुझुकीची सर्वाधिक विक्री होणारी मोटरसायकल

सुझुकीच्या स्कूटरच्या सेगमेंट मध्ये सर्वाधिक लोकप्रिय आणि विक्री होणाऱ्या स्कूटर्समध्ये Access 125, Burgman Street आणि Avenis चा समावेश आहे तर सुझुकीची सर्वात महाग स्कूटर बर्गमन स्ट्रीट आहे.

सुझुकी बर्गमन

Suzuki Burgman Street 3 वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे; ज्यात बर्गमन स्ट्रीट एसटीडी 2023, सुझुकी बर्गमन स्ट्रीट राइड कनेक्ट एडिशन 2023, सुझुकी बर्गमन स्ट्रीट EX यांचा समावेश आहे. Burgman वेरिएंट्समधून Burgman Street EX हे टॉप मॉडेल आहे ज्याची किंमत 1,14,200 रुपये आहे.

सुझुकी बर्गमन इंजिन

डिस्क ब्रेक सिस्टम असणारी ही स्कूटर वजनाने 111 किलो आहे, ज्यामध्ये 124 सीसीचे इंजिन आहे, ज्याची 8.6 PS टाकी पॉवर आणि 10nm इतका टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. ही स्कूटर 48 km पर लिटर इतकं मायलेज देते.

बर्गमन फिचर्स

या स्कूटरच्या अत्याधुनिक फिचर्सबाबत बोलायचं झाल तर, इंजिन स्टार्ट आणि स्टॉप स्विच, एलईडी रिअर कॉम्बिनेशन लाइट, एलईडी हेडलाइट आणि पोझिशन लाइट्स, सुझुकी इझी स्टार्ट सिस्टम, ड्युअल टोन इनर लेग शील्ड, यूएसबी सॉकेट, ब्लूटूथ सक्षम डिजिटल कन्सोल, स्पोर्टी मफलर कव्हर आणि  ड्युअल लगेज हुक या सर्व वैशिष्ठ्यांचा समावेश आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment