टीव्हीएस ने नुकतेच नवीन स्कूटर लाँच करणार असल्याचे संकेत सोशल मीडिया च्या माध्यमातून दिले आहेत. या नवीन टीजर मुळे नक्की कोणती गाडी लाँच होणार याची उत्कंठा सर्वच स्तरातून आपल्याला पाहायला मिळते आहे. टीव्हीएस ची अपकमिंग स्कूटर ही ज्युपिटर सीएनजी असल्याचे काहींचे मत आहे तर काही म्हणत आहेत की संपूर्ण नवी स्कूटर मार्किट मध्ये लाँच होणार आहे.
TVS Jupiter CNG टेस्टिंग?
बजाज फ्रीडम सीएनजी बाईक मार्किट मध्ये आल्यानंतर दुचाकी क्षेत्रातील सीएनजी चळवळ सुरू झाल्याचे सध्या चित्र आहे. बजाज नंतर टीव्हीएस सुद्धा त्यांच्या सीएनजी स्कूटर वर रिसर्च करत असून नुकतीच सीएनजी स्कूटर टेस्टिंग दरम्यान आपल्या कॅमेरात टिपली गेली आहे. या गाडीची संपूर्ण मांडणी पाहता गाडी दिसायला जरी पारंपरिक असली तरी नव्या फिचर्स ने लोडेड असल्याचे दिसते आहे.
रिपोर्ट च्या अनुसार नव्या सीएनजी स्कूटरला कंपनीने codenamed U740 दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही आगामी स्कूटर 125 सीसी इंजिन सह येणार असून संपूर्ण पणे ज्युपिटर च्या प्लेटफॉर्म वर तयार करण्यात आली असल्याचे समजते.
सदर गाडीला तुम्ही फोटोंच्या माध्यमातून पाहू शकता की पुढे LED लैंप दिला असून तो हेड विसर वर दिला आहे. इंडिकेटर साइड ला तर डीआरएल उभ्या पद्धतीचे दिले आहेत. मिरर सिल्वर दिले असून डिस्प्ले च्या वर विंड गार्ड दिले आहे. 12 इंच टायर, नवीन डिजाईन असलेले सिट आणि ग्रैब हँडल्स, फ्रेश टेल लैंप आणि निळा रंग या गादी मध्ये दिसत आहे.
TVS न्यू स्कूटर लाँचिंग
TVS मोटर्स ने नुकतेच त्यांच्या सोशल मीडिया पेज वर 22 ऑगस्ट रोजी नवीन गादी लाँच करणार असल्याचे वृत्त दिले आहे. ही आगामी स्कूटर कोणत्या सेगमेंट मध्ये असेल याची उत्सुकता सर्वांचा लागलेली असताना सदर स्कूटर सीएनजी आहे की पेट्रोल असे प्रश्न विचारले जात आहेत परंतु आमच्या माहिती नुसार ही आगामी स्कूटर पेट्रोल स्कूटर असून ज्युपिटर चे 110 सीसी मॉडल असेल.
The lights are on!
Unveiling the scooter that’s more soon. Stay tuned.#NewLaunch pic.twitter.com/ZntsTTRzMx
— TVS Motor Company (@tvsmotorcompany) August 19, 2024
फ्रंट फ्यूल लिड, ELD डीआरएल, ब्लूटूथ कनेक्टिविटी मोठे सीट आणि मोठे स्टोरेज या आगामी स्कूटर मध्ये देण्यात येईल असे टीजर च्या माध्यमातून समजते.
नव्या ज्युपिटर मध्ये आत्याच्या मॉडल प्रमाणेच 109.7 सीसी, सिंगल सिलेंडर, 4 स्ट्रोक इंजिन असेल जे 7.88 पीएस पॉवर आणि 8.80 एनएम टॉर्क प्रोड्यूस करेल. या गाडीते पुढे डिस्क आणि पाठीमागे ड्रम ब्रेक दिला असेल. या गादीची अंदाजे किंमत 77 हजार रुपये असेल.