टीव्हीस ज्युपिटर का होंडा एक्टिवा? कोण आहे बेस्ट वाचा

TVS Jupiter 110 vs Honda Activa 110 - जाणून घ्या कोण आहे तुमच्यासाठी बेस्ट? कारण ज्युपिटर मधे मिळतात बेस्ट फिचर्स आणि पॉवरफुल इंजिन तर दुसरीकडे एक्टिवा मधे मिळते चांगली सर्विस आणि बेस्ट रिलेबल इंजिन.

Published:

होंडा एक्टिवा की नवी टीव्हीस ज्युपिटर – हे आर्टिकल वाचल्यानंतर तुमच सगळ कन्फ्युजन दूर होईल. जाणून घेऊया ज्युपिटर 110 की एक्टिवा 110 कोणती तुमच्या साठी बेस्ट आहे.

वेरिएंट्स आणि किंमत कंपॅरिजन

ज्युपिटर 110 मध्ये 4 वेरिएंट्स आहेत. ड्रम, ड्रम अलॉय, स्मार्टकनेक्ट ड्रम आणि स्मार्ट कनेक्ट डिस्क. ड्रम जुपिटर ची किंमत – 76,100 रुपये ठेवली आहे तर स्मार्टकनेक्ट डिस्क ची किंमत 89,350 ठेवली आहे.

होंडा एक्टिवा 110 मध्ये 3 वेरिएंट्स आहेत. एक्टिवा स्टँडर्ड, DLX आणि H-SMART यामेधे स्टँडर्ड मॉडल ची किंमत 78,803 रुपये आणि H-SMART ची किंमत 83,803 रुपये आहे.

दोन्ही च्या किमती साईड बाय साईड ठेवल्या तर ज्युपिटर च्या बेस मॉडल पेक्षा एक्टिवा चे बेस मॉडल 2700 रूपयानी महाग आहे. मिडल वेरिएंट DRUM ALLOY आणि ऐक्टिवाचे DLX सेम किंमतीला मिळते आहे आणि टॉप वेरिएंट ज्युपिटर DISC SXC आणि एक्टिवा H-SMART यांच्यात 5500 रुपयांचा डिफ्रन्स आहे. बेस मध्ये एक्टिवा महाग आहे तर टॉप मध्ये ज्युपिटर महाग आहे.

बघूयात डायमेन्शन्स

ज्युपिटरची लांबी 1848 एमएम आहे आणि एक्टिवा ची लांबी 1833 एमएम आहे इथे ज्युपिटर 15 एमएम ने लांब आहे. ज्युपिटरची उंची 1158 एमएम आहे तर एक्टिवा ची उंची 1156 एमएम आहे दोन्ही च्या उंचीत थोडाच फरक आहे. ज्युपिटर ची रुंदी 665 एमएम आहे आणि एक्टिवा ची रुंदी 697 एमएम आहे इथे एक्टिवा 32 एमएम ने रुंद आहे.

ज्युपिटर चा व्हील बेस 1275 एमएम आहे तर एक्टिवा चा 1260 एमएम आहे. इथे ज्युपिटर चा व्हील बेस 15 एमएम ने जास्त आहे. ज्युपिटर मध्ये 163 एमएम चा ग्राउंड क्लीयरेंस मिळतो आणि एक्टिवा मध्ये 162 एमएम चा. ज्युपिटर आणि एक्टिवा चे वजन सेम 106 किलो आहे. ज्युपिटर चे सीट 756mm चे आहे तर एक्टिव मध्ये 692 एमएम चे सिट मिळते.

डायमेन्शन वाइस सगळा विचार केला तर इथे ज्युपिटर 110 क्लियर विनर आहे. सिट सुद्धा ज्युपिटर चे 64 एमएम ने एक्टिवा पेक्षा मोठे आहे त्यामुळे आपले परिवारातील सदस्य ज्युपिटर वर कम्फर्टेबल बसतील.

डायमेन्शन ने ज्युपिटरलामी प्राधान्य देईल..

स्टोरेज स्पेस

ज्युपिटर आणि एक्टिवा मध्ये स्टोरेज स्पेस कंपेअर केले तर ज्युपिटर ची माहिती कंपनीने उपलब्ध केली आहे परंतु एक्टिवा ची माहिती होंडा ने दिलेली नाही.

ज्युपिटर मध्ये 5.1 लिटर चा पेट्रोल टैंक दिला आहे आणि होंडा एक्टिवा चा 5.3 लिटर चा पेट्रोल टैंक आहे दोन्हीत इथे 200 ml चा फरक आहे जो जास्त वाटत नाही.

ज्युपिटर मध्ये 33 लिटर चा मोठा अंडर सिट स्टोरेज दिला आहे ज्यामध्ये हाफ साइज़ २ हेलमेट बसतील.. पण एक्टिवा चा अंदाजे 18 लिटर चा स्पेस आहे त्यामुळे यात एक छोट हाफ साइज़ हेलमेट बसेल ते पण खात्री नाही. फ्रंट ग्लो बॉक्स मध्ये 2 लिटर स्पेस ज्युपिटर मधे दिला आहे पण एक्टिवा मध्ये ग्लो बॉक्स दिला नाही.

स्पेस च्या बाबतीत इथे सुद्धा ज्युपिटर जिंकते..

आता इंजिनच कंपारिजन करूयात

ज्युपिटर मध्ये 113.3 cc च इंजिन दिल आहे आणि याची पॉवर पाहिली तर 6500 rpm वर 5.9kW आणि 5000 rpm वर 9.8Nm टॉर्क प्रोड्यूस करते. आता हे 9.8 nm टॉर्क विद गो-आसिस्ट सह आहे विदाउट गो असिस्ट सह 9.2Nm हे इंजिन प्रोड्यूस करते.

या गाडीत गो-आसिस्ट दिल आहे ज्यामुळे 10 टक्के मायलेज जास्त मिळेल आणि टॉर्क सुद्धा जास्त मिळेल. तिकडे होंडा एक्टिवा मध्ये 109.51 cc इंजिन दिल आहे जे 8000 rpm वर 5.77kW पॉवर जनरेट करते आणि 8.90 Nm टॉर्क 5500 rpm वर जनरेट करते.

इंजिन च्या बाबतीत पुन्हा इथे ऑन पेपर ज्युपिटर ने बाजी मारली आहे. पण जर होंडा कंपनी कश्या साठी फेमस आहे तर ते त्यांच्या इंजिन साठी. “रिलायबल इंजिन” हा पॉइंट एक्टिवा साठी महत्वाचा आहे.

आता मायलेज बद्दल बोलूयात –

jupiter 110 मध्ये 62 kmpl चे क्लेम मायलेज मिळते तर एक्टिवा मध्ये 60 kmpl चे क्लेम मायलेज मिळते. रियल वर्ल्ड मायलेज पहिले तर दोन्ही मध्ये 45 ते 50 च्या दरम्यान मायलेज मिळते.

त्यामुळे मायलेज च्या दृष्टीने दोन्ही वाहन सेम आहेत.

आता बुलूयात स्पेक्स & फिचर्स बद्दल –

ज्युपिटर मध्ये टॉप वेरिएंट मधे डिजिटल क्लस्टर डिस्प्ले मिळतो पण एक्टिव मध्ये अनलॉग क्लस्टर मिळतो. किक बद्दल लोकांच्या कंप्लेंट आहेत. जर एक्टिवा आणि ज्युपिएटर दोन्ही च्या टॉप मॉडल मधे किक मिळत नाही पण दोन्ही च्या लोअर वेरियंट मधे किक स्टार्ट उपलब्ध आहे.

ज्युपिटर च्या लोअर वेरिएंट मध्ये आलोय चा ऑप्शन आहे पण एक्टिव च्या टॉप वेरिएंट मध्ये आलोय दिला आहे. ज्युपिटर मध्ये डिस्क ब्रेक चा ऑप्शन उपलब्ध आहे जिथे एक्टिवा मधे ड्रम ब्रेकच दिला आहे. ज्युपिटर मधे इमर्जन्सी ब्रेकींग सिस्टम दिली आहे जी एक्टिवा मध्ये नाही.

ऑटो टर्न इंडिकेटर ज्युपिटर मध्ये आहेत जे एक्टिवा मधे मिसिंग आहेत. हा पण एक्टिवा च्या एच स्मार्ट वेरिएंट मधे स्मार्ट की मिळते जी ज्युपिटर च्या कोणत्याच वेरिएंट मध्ये मिळत नाही. ज्युपिटर मध्ये स्टार्ट स्टॉप फिचर आहे जे एक्टिवा मध्ये नाही.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्टिवा मध्ये तुम्हाला पुढे तर 90/90 R12 इंच टायर मिळतो पण पाठीमागे 90/100 R10 इंच टायर मिळतो. टायर ची रुंदी जास्त मिळते पण उंची कमी असल्याने एक्टिवा घसरण्याच्या कंप्लेंट खूप जास्त येतात. ज्युपिटर मधे दोन्ही ठिकाणी 90/90 R 12 इंच टायर दिले आहेत.

ज्युपिटर मध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि छोटा कप्पा दिला आहे जो एक्टिवा मध्ये नाही. एक्टिवा मध्ये कील स्विच दिला आहे जो ज्युपिटर मधे नाही. फिचर्स च्या बाबतीत सुद्धा ज्युपिटर जिंकते. पण खूप उपयोगी किल स्विच आणि स्मार्ट की सारखे फीचर्स एक्टिवा मधे दिले आहेत..

कन्ल्युशन

चला आता फायनली बघूयात की तुम्ही ज्युपिटर घेतली पाहिजे की एक्टिवा.

दोन्ही गाड्यांचे फिचर आणि सेफ्टी वाइज कंपेअर केले तर ज्युपिटर खूप मोठ्या फरकाने जिंकते. जिथे एक्टिवला मागचा छोटा टायर आहे. साधा एनलॉग स्पीडो मिळतो. सिट सुद्धा ज्युपिटर पेक्षा लहान आहे. ज्युपिटर च इंजिन नव आहे. मायलेज दोन्हीच सेम आहे पण सर्विस होंडा बेस्ट देते यात शंका नाही. पण मायलेज, किंमत आणि फिचर्स याच गणित पहाता मी तुम्हाला ज्युपिटर सजेस्ट करेल कारण अपडेटेड गाडी घेणं हे कधीही चांगल.

सगळी माहिती मिळाल्या नंतर सुद्धा तुम्ही अजून कन्फ्युज आहात तर मी इथे क्लियर करतो.

जर तुम्हाला चांगली राईड क्वालिटी, बेस्ट फीचर्स, उत्तम ब्रेक्स, मोठे टायर्स, बेस्ट लुक पाहिजे तर ज्युपिटर घ्या आणि जर तुम्हाला चांगले सस्पेंशन, उत्तम स्मूद नेस आणि ट्राइड टेस्टेड इंजिन पाहिजे आणि तुम्ही फिचर्स ला दुर्लक्ष करू शकता आणि महत्वाचं म्हणजे चांगली रीसेल वैल्यू पाहिजे तर एक्टिवा बेस्ट आहे.

तर हे होते ज्युपिटर आणि एक्टिवा चे कंपेरिजन.

Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment