2025 मध्ये आगामी रॉयल एनफिल्ड मोटरसायकल : 440cc ते 750 सीसी

Published:

तमाम बुलेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे येत्या नवीन वर्षात म्हणजेच 2025 मध्ये रॉयल इन्फिल्ड मोटरसायकल काही नवीन मोटरसायकल मॉडेल्स लॉन्च करत आहे. जे 440cc ते 750 सीसी असून आता रॉयल इन्फिल्डच्या पोर्टफोलिओ मध्ये आता नवीन मोटरसायकलचा समावेश झालेला आहे. 

रॉयल इन्फिल्ड 2025 नवीन मोटरसायकल्स

दरवर्षी नवीन चार मोटरसायकल लॉन्च करण्याचा निर्धार रॉयल इन्फिल्ड अवलंबत असत. 2024 मध्ये रॉयल इन्फिल्डने काही प्रमुख नवीन मोटरसायकल्स लॉन्च केल्या होत्या, ज्यामध्ये Interceptor Bear 650 , Shotgun 650, Guerrilla 450 आणि Classic Goan 350 यांचा समावेश आहे आणि आता त्याच यादीत 2025 दरम्यान रही दुचाकी कंपनी त्यांच्या काही नवीन कोऱ्या करकरीत दुचाकींचा समावेश त्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करत आहे.

रॉयल एनफिल्ड मोटरसायकल हिमालयन 450 रॅली

रॉयल इन्फिल्ड च्या 2025 च्या वर्षातल्या सेट मधली पहिली दुचाकी म्हणजे हिमालयन 450 रॅली, मागील काही दिवसांमध्ये या आवृत्तीला चाचणी दरम्यान फिरण्यात आलेलं होतं. ज्या लोकांना ऑफरोड ट्रॅव्हलिंग आवडतं त्या लोकांसाठी ही दुचाकी उत्तमच आहे, हिमालयन 450 रॅली मध्ये एक नवीन एक्झॉस्ट एंड कॅम्प समावेश आहे. ही मोटरसायकल संपूर्णपणे ऍडजेस्टेबल असून यामध्ये अनेक फंक्शनल अपडेट सुद्धा देण्यात गेलेले आहेत.

स्क्रॅम 440

रॉयल इन्फिल्डच्या सेट मधली दुसरी दुचाकी म्हणजे स्क्रॅम 440. या वाहनाला 443 सीसी च सिंगल सिलेंडर इंजिन दिले गेलेला आहे, जे 411 सीसी इंजिनचं बिग-बोर वर्जन आहे. हे इंजिन 25.4 बीएचपी इतकी पिक-पावर आणि 34 एनएम इतका टॉर्क तयार करतात, हे इंजिन सहा स्पीड गिअर बॉक्सशी जोडले गेलेल आहे. या नववर्षामध्येच ही दुचाकी लॉन्च होणार असून याचे अधिक माहिती याच पेजवर लवकरच अपडेट करण्यात येईल.

रॉयल एनफिल्ड मोटरसायकल क्लासिक 650

यातील तिसरी दुचाकी म्हणजे क्लासिक 650 जी 2025 मध्येच लॉन्च होणार आहे, या दुचाकीचे 648 सीसीचे इंजिन हे 46.3 बीएचपी आणि 52.3 एनएम इतका टॉर्क जनरेट करतात, याच इंजिन  6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलं गेल आहे, ज्या लोकांना विद्यमान क्लासिक 350 बाईक आवडते आणि याच बाईक अपग्रेटेड वर्जन हवं असेल, त्या लोकांसाठी क्लासिक 650 उत्तम पर्याय ठरू शकते.

रॉयल एनफिल्ड मोटरसायकल इंटरसेप्टर 750

यानंतरची मोटरसायकल म्हणजे इंटरसेप्टर 750 या मोटरसायकलला शक्तिशाली असं इंजिन दिले गेलेला आहे ब्रेकिंग पावर साठी सुद्धा पुढच्या बाजूला मिळतो लवकरच या मोटरसायकल बाबतीत अपडेट्स तुम्हाला या पेजवर मिळतील.

 रॉयल एनफिल्ड मोटरसायकल कॉन्टिनेंटल जीटी 750

या मोटरसायकल मध्ये रॉयल इन्फिल्ड इंटरसेप्टर 75 च्या प्रमाणेच पुढच्या बाजूला डीस ब्रेक सेटअप मिळणार आहे शिवाय नवीन ट्यूबलेस टायर आणि आल्यावर याच सोबत रेसर स्टाईल सेमीफायरिंग सुद्धा या मोटरसायकल मध्ये दिले जात आहे या मोटरसायकलचे इंजिन हे 55 आणि 65 एमएम इतका टॉर्क तयार करू शकतो.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment