पहिल्यांदा इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेताय ? हे मुद्दे लक्षात घेवूनच करा इलेक्ट्रिक स्कूटरची खरेदी 

Published:

तुम्ही जर इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेण्याचा विचार करत असाल, तर खालील लेखात तुम्हाला असे कोणते ठळक वैशिष्ट्ये इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये असावे, ज्याने तुमची इलेक्ट्रिक स्कूटर रायिड अजूनच किफायतशीर किंमतीमध्ये आणि आरामदायी होईल याची संपूर्ण माहिती वाचा.

लेखातील ठळक मुद्दे

  • इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना आवर्जून ह्या गोष्टींची माहिती
  • 1 लाखापेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर्स
  • सुरक्षित प्रवास,परफॉर्मन्स आणि फिचर्स
  • सोयीस्कर चार्जिंग

नव्याने इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना आवर्जून ह्या गोष्टींची माहिती घ्या

तुम्ही जर एखादी इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेत असाल तर तिच्या इतर फिचर्स आणि स्पेसिफिकेशनसोबत किंमतसुद्धा परवडणारी असणं तितकीच महत्वाचं आहे. तुम्हाला किमान किंमतीमध्ये कमाल रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरची यादी खाली मिळेल.

भारतात 1 लाखापेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या टॉप इलेक्ट्रिक स्कूटर्स

युलू विन55,555 रुपये 68 किमी
बाउंस इन्फिनिटी E.159,000 रुपये100 किमी
कायनेटिक ग्रीन ई लुना69,990 रुपये110 किमी
कायनेटिक ग्रीन झिंग 71,990 रुपये100  किमी
Ola S1 X74,999 रुपये143 किमी
AMO इलेक्ट्रिक जाँटी-3W78,819 रुपये75 किमी
Okinawa PraisePro84,443 रुपये81 किमी

सुरक्षित प्रवास

तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरची राईड सुरक्षित होण्यासाठी काही महत्त्वाचे फिचर्स असावेत, ज्यामध्ये हेल्मेट, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम,रिलायबल ब्रेक्स, ब्रेक्स लाइट्स, चांगली सस्पेन्शन सिस्टिम, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम. या सेफ्टी फिचर्समुळे तुमचा प्रवास तर सुखकर होण्यासाठी स्पीड कंट्रोलमध्ये राहण्यासाठी किंवा अपघात टाळण्यासाठी खूप मदत होते.

लाँग रेंज- चांगला परफॉर्मन्स

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना किफायतशीर किंमतीसोबत चांगली आणि लांबचा पल्ला गाठणारी रेंजसुद्धा विचारात घ्यावी, जेव्हा रेंजच्या संदर्भात बोलले जाते त्यावेळी गाडीची बॅटरी ही चांगल्या रेंजसाठी गृहीत ठरवली जाते, त्यामुळे अश्या लाँग रेंजच्या बॅटरीची स्कूटर खरेदी करावी ज्यामुळे तुम्हाला लांबचा पल्ला गाठण्यासाठी मदत होईल.

फिचर्स- टॉप इलेक्ट्रिक स्कूटर्सची वैशिष्ट्ये

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्कूटरमध्ये असणारे एडवांस्ड फिचर्स.

  1. सोप्पी मोबाईल कनेक्टिविटी
  2. आकर्षक आणि आरामदायी डिझाइन
  3. पर्यावरणासाठी पूरक 
  4. आरामदायी बसण्याची व्यवस्था
  5. चांगली आणि टिकाऊ बॅटरी
  6. स्कूटर बनवण्यासाठी वापरलेले चांगले मटेरियल
  7. पॉवरफुल मोटर
  8. डू-नॉट डिस्टर्ब मोड
  9. इनकमिंग कॉल-मेसेज-अलर्ट्स
  10. नॅविगेशन असिस्ट
  11. ओव्हरस्पीड अलर्ट्स
  12. रोड-साइड असिस्ट

सोयीस्कर चार्जिंग

कोणतीही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे चार्जिंग स्टेशन उपलब्ध असणे, बॅटरी स्वाईप पर्याय असला तर उत्तमच. आजकालच्या अनेक इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्या अश्या प्रकारच्या बॅटरी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये देतात, ज्या तुम्ही ऑफिस-कॉलेज जवळ काम करता त्या भागात बॅटरी स्वैप करुन पुढचा प्रवासाचा मार्ग मोकळा करता येऊ शकतो.

Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment