Gurugram Accident: गुरुग्राम KMP एक्सप्रेसवेवर ढिगाऱ्याखाली 2 बिझमन ठार

गुडगाव: कुंडली-मानेसर-पलवल एक्स्प्रेस वेवर ट्रक च्या धडकेत हाई एंड मोटरसायकल चालकांचा मृत्यू झाला, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. या अपघातात दुर्दैवी मृतांचे नाव प्रशांत नरुला वय वर्ष -40 (दिल्ली, पंजाबी बाग,नॉर्थ अ‍ॅव्हेन्यू रोड) आणि परमीत सूद (डीएलएफ फेज 1, वय वर्ष -40) हे BMW आणि हार्ले डेव्हिडसन या वाहनांचे चालक होते, प्रशांत आणि परमीत दोघेही वीकेंडला हाय-एंड बाईक चालवणाऱ्या ग्रुपचा भाग होते आणि अपघाताच्या वेळी त्यांच्यासोबत त्याच्या हाय-एंड बाईक चालवणाऱ्या ग्रुपचे अजून 5 मित्र उपस्थित होते.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, 8.45 च्या सुमारास बिलासपूरजवळ एक्सप्रेस वे वर एका भरधाव वेगाच्या ओपन-बॉडी ट्रक X7 ने अचानक ब्रेक दाबला ज्यामुळे, एक i20 कार आणि BMW त्या ट्रकवर आदळली. आणि या दोन्ही वाहनाच्या अपघात ढिगाऱ्यात प्रशांत आणि परमीत दोन दुचाकीस्वार पाठीमागून आदळले. अपघात घडल्यानंतर तात्काळ दोन्ही मोटारसायकल चालकाना नल्हार मेडिकल कॉलेज आणि गुडगावच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये भरती करतानाच डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.

मृत्याच्या जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ट्रकचालकाने कोणताही इंडिकेटर अथवा संकेत एन देताच अचानक ब्रेक दाबला, त्यानंतर i20 आणि BMW कार आणि दुसरा ट्रक पहिल्या ट्रकवर आदळला, त्याच वेळी परमीत आणि प्रशांत वाहनांवर आदळूनजखमी झाले.

ट्रकचालक अजित राजस्थानचा असून त्याच्यावर बिलासपूर पोलिस स्टेशनमध्ये आयपीसी कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग ), 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि 427 (नुकसानास कारणीभूत) अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment