Tesla Cybertruck unveiled: टेस्ला सायबर ट्रक बद्दलची आवश्यक माहिती ,पाहा किंमत आणि फीचर्स

2024 टेस्ला सायबरट्रक: नव्याने आलेला चर्चेचा विषय म्हणजे tesla cybertruck. इलेक्ट्रिक वेहिकल चा वर्तुळाचा केंद्रबिंदू असणारी एलोन मस्क चा टेस्ला सायबरट्रक नक्की काय आहे? याचे कुतूहल लागून गेलेलं आहे. आणि ह्या बहुचर्चित सायबरट्रकचा किंमतीपासून  डिलिव्हरी पर्यंत जाणून घेण्यासाठी खाली माहिती वाचा.

 

  • टेस्ला सायबर ट्रक डिलिव्हरी इव्हेंट
  • भारतामध्ये टेस्लाची उपलब्धता
  • 2019 पासून टेस्ला सायबर ट्रक चे बदल
  • टेस्ला सायबर ट्रकची भारतातील किंमत

टेस्ला सायबर ट्रक डिलिव्हरी इव्हेंट 

टेस्ला सायबर ट्रक

टेस्ला कंपनीचा मालक आणि 24,820 कोटी डॉलर्स नेटवर्थ संपत्ती असणारा एलोन मस्क यांनी २०१९ मध्ये टेस्लाच्या सर्वात महत्वाच्या आणि आकर्षक मॉडेल Tesla Cybertruck जगासमोर आणले होते. तेव्हापासून आतापर्यँत म्हणजे २०२३ च्या वर्षाअखेरपर्यंत या Tesla Cybertruck ची डिलिव्हरी घेण्यासाठी वाट बघावी लागली आहे. हा जगातील सर्वात पहिला ट्रक आहे जो all-electric pick-up truck असणार आहे. आतापर्यन्त ५० ग्राहकांना ह्या ट्रक ची डिलिव्हरी देण्यात आली आहे.

भारतामध्ये टेस्लाची उपलब्धता

भारतामध्ये टेस्ला प्लांट उभारण्यासाठी करणार 2 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्यास तयार असून पुढील वर्षापासून  म्हणजेच २०२४ वर्षांपासून टेस्ला भारतात उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळत आहे. आणि जर टेस्ला भारतात आली तर टेस्ला गाड्यांच्या किंमती काय असू शकतात याचीच उत्सुकता सर्वाना लागलेली आहे तर, भारतामध्ये टेस्ला ची कार 10-20 लाखांमध्ये मिळू शकते, अशी शक्यता मांडली जातेय.

हेही वाचा: Tata Zephyr Launch Date in India: कॉन्सेप्ट कि सत्यात उतरणार, वाचा सविस्तर


2019 पासून टेस्ला सायबर ट्रक चे बदल

टेस्लाच्या ट्राय-मोटर, 2019 ते सायबरबीस्ट 2023 टेस्ला सायबर ट्रक मध्ये काय काय बदल घडले आहेत ते पाहूया

स्पेसिफिकेशनट्राय-मोटर, 2019टेस्ला सायबर ट्रक, 2023
बॅटरी एक्स्टेन्डर500 मैल320 मैल / 440 मैल
हॉर्सपॉवर800 hp पेक्षा जास्त845 hp
टॉर्क क्षमता 1,000 lb-ft पेक्षा जास्त10,296 lb-ft

टेस्ला सायबर ट्रकची भारतातील किंमत आणि प्रतिस्पर्धी

या काळात फक्त United States म्हणजेच युनायटेड स्टेट्स मध्येच टेस्ला लॉन्च करण्यात येणार आहे.जिथं टेस्ला सायबर ट्रकच्या बेस व्हेरिएंटची किंमत $ 60,990 म्हणजेच 50.80 लाख इतकी किंमत आहे. याचा ड्युअल मोटर ऑल व्हील ड्राईव्ह मॉडेलची किंमत $79,990 म्हणजेच 66.60 लाख इतकी आहे आणि टॉप ह्याच गाडीच्या टॉप एन्ड मॉडेलची किंमत $99,990 म्हणजेच 88 लाख इतकी आहे. आजपर्यंत ह्या टेस्ला सायबर ट्रक तोडीस तोड वाहनबाजारात कोणीही उपलब्ध नसल्याने टेस्ला वेगळ्याच खुशीत आहे.

सायबर ट्रक किती दूर जाऊ शकतो?

सायबर ट्रक च्या बेस रीअर-व्हील ड्राइव्ह व्हेरियंट द्वारे हा ट्रक 250 मैल, ऑल-व्हील ड्राइव्ह द्वारे 340 मैल आणि “सायबरबीस्ट” द्वारे 320 मैल प्रवास करू शकतो.

सायबर ट्रक म्हणजे काय?

ज्या ट्रकची बॅटरी इलेक्ट्रिक पूर्ण-आकाराचा पिकअप ट्रक आहे असा ट्रक.

सायबर ट्रक टेस्ला किती किमतीला आहे?

50.80 लाख ते 88 लाख  या दरम्यान या ट्रकची किंमत असू शकते

मला सायबर ट्रक कधी मिळेल?

2024 या नव्या वर्षापर्यंत आपण टेस्ला ला भारतात पाहू शकतो.

टेस्ला सायबर ट्रक भारतात उपलब्ध आहे का?

या वर्षा अखेरच्या टप्प्यात म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये टेस्ला भारतात लॉन्च होऊ शकते.

आज किती सायबर ट्रक वितरित केले?

गुरुवारी – 12 सायबर ट्रक वितरित केले.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment