Hyundai Creta 2024: लाँच आधीच डिलरशिपला आली क्रेटा, बघा फीचर्स

कोरियन ब्रँड ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड २०२४ फेसलिफ्ट क्रेटा लवकरच लाँच करणार असून हा सोहळा १६ जानेवारी २०२४ रोजी पार पडणार आहे. पण नवीन क्रेटा लाँच होण्या आधीच या गाडीची डिजाईन आणि फीचर्स समोर आले आहेत. नवीन Hyundai Creta 2024 facelift मध्ये काय आहे खास जाणून घ्या या लेखात.

ठळक मुद्दे  –

  • नवीन जनरेशन क्रेटा १६ जानेवारी रोजी लाँच होणार
  • क्रेटा २०२४ साठी बुकिंग्स सुरु
  • हेडलॅम्प आणि टेललॅम्प मध्ये मोठा बदल

Hyundai Creta 2024: डीलरशिप यार्ड मधील फोटो समोर

2024 Hyundai Creta dealers

जसे कि तुम्ही वरील फोटो मध्ये बघू शकता कि २०२४ क्रेटा सध्याच्या जुन्या  मॉडेलच्या तुलनेत अधिक तगडी आणि मजबूत दिसत आहे. सध्याच्या मॉडेलची डिजाईन हि गोलाकार असून नवीन जनरेशन क्रेटा अधिक बॉक्सी दिसत आहे. गाडीचे पॅनेल्स देखील अधिक शार्प आणि एरोडानामिक दिले गेले आहेत ज्याने सुधारित परफॉर्मन्स मिळेल.

2024 Hyundai Creta dealership 3

क्रेटा २०२४ फेसलिफ्ट मध्ये पाठीमागे संपूर्ण पणे नवीन लाईट सेटअप दिला आहे ज्यामध्ये कनेक्टेड लाईट बार देखील दिसत आहे. या व्यतिरिक्त मागील बम्पर आणि स्किड प्लेट पूर्णपणे रिडिजाईन केला गेला आहे. टेलगेट हे पूर्वी पेक्षा अधिक सपाट दिला आहे.

वाचा – लाँच पूर्वीच “ह्युंदाई क्रेटा २०२४ फेसलिफ्ट” चा विडिओ वायरल

पुढील बाजूस देखील उत्तम डिझाईनिंग करत नवीन आकर्षक एलईडी डे टाईम रनिंग लॅम्प दिला गेला आहे. मुख्य हेडलॅम्प मात्र कंपनीने बंपरवर सरकवलेली आहे.

2024 Hyundai Creta dealership

कंपनीने ADAS (Advance Driving Assistance System) खाली बंपरवर दिला  असून यामध्ये तब्ब्ल १९ फीचर्स आई ७० पेक्षा अधीक सेफटी फीचर्स दिले आहेत ज्यामध्ये ३६ सेफटी फीचर्स स्टॅंडर्ड दिले जाणार आहेत. पुढील स्किड प्लेट देखील आकर्षक डिजाईन करण्यात आली आहे.

creta cabin

ह्युंदाई ने भारतातील ग्राहकांच्या सेफटी मध्ये भर पडावी आणि BNCAP मध्ये चांगले क्रॅश टेस्ट मिळावेत यासाठी किया-ह्युंदाई चा के-प्लॅटफॉर्म  देखील सुधारित करण्यात आला आहे. चॅनेल वर क्रेटा २०२४ चा रिव्हिव लवकरच येणार आहे त्यामुळे आपला यूट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा.

इंजिन – 

२०२४ ह्युंदाई  क्रेटा फेसलिफ्ट मध्ये तीन इंजिन पर्याय उपलब्ध केले जाणार आहेत ज्यामध्ये एक असेल naturally ऍस्पिरेटेड पेट्रोल, एक असेल टर्बो-चार्ज डिजेल आणि एक असेल टर्बो-चार्ज पेट्रोल इंजिन.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment