ह्युंदाई इंडिया ने भारतात i20 N Line फेसलिफ्ट 9.99 लाख (एक्स-शोरूम) रुपयांत लाँच करून बाजारपेठेत नवीन आणि फ्रेश फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत. 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन म्हणजे DCT सह आता ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन चा पर्याय ग्राहकांसाठी खुला केला गेला आहे. i20 N Line फेसलिफ्टबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Hyundai i20 N लाइन फेसलिफ्ट — प्रकार, किंमती आणि रंग पर्याय
i20 N Line फेसलिफ्टचे प्रकार आणि किंमती पहा:
HYUNDAI I20 N LINE FACELIFT EX SH किंमती | ||
प्रकार | 6-स्पीड एमटी | 7-स्पीड DCT |
N6 | रु. 9.99 लाख | रु. 11.22 लाख |
N8 | रु. 11.10 लाख | रु. 12.32 लाख |
Hyundai खालील रंग पर्यायांमध्ये i20 N Line ऑफर करते:
👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप
- काळा (Black, New)
- पांढरा (White)
- मोती पांढरा (Pearl White)
- राखाडी (Grey)
- निळा (Blue)
- गडद निळा (Dark Blue)
- काळ्या छतासह पांढरा (White/black roof – Dual Tone)
- काळ्या छतावर निळा( Blue/black roof – Dual Tone)
Hyundai i20 N लाइन फेसलिफ्ट – एक्सटेरिअर बदल

i20 N लाईन फेसलिफ्टमध्ये सध्या च्या जुन्या i20 N लाईन मध्ये फक्त थोडे बदल केले आहेत. फ्रंट प्रोफाइल आता अद्ययावत रिफ्लेक्टर-आधारित एलईडी हेडलाइट्स आणि उलटा मार्क – आकाराचे एलईडी डीआरएल ऑफर करते. ग्रील मध्ये N लाईन ब्रॅण्डिंग आणि लाल इन्सर्ट सह स्किड प्लेट दिलेली आहे. आजूबाजूला नवीन अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. गाडीच्या ब्रेक कॅलिपर वर लाल रंग देण्यात आला आहे ज्याने एन लाईन ची निशाणी कळते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की i20 N लाइन फेसलिफ्ट मध्ये फॉग लाइट्स ऑफर करणे सुरू ठेवले आहे तर i20 फेसलिफ्ट अलीकडील अपडेटमध्ये काढून टाकण्यात आले आहे.

Hyundai i20 N लाइन फेसलिफ्ट – इंटीरियर आणि फीचर्स

टाटा मोटर्स च्या नेक्सन मध्ये आपण पाहिलं असेल कि १० इंच स्क्रीन दिलेली आहे आणि प्रत्येकाला ती स्क्रीन आवडत आहे. ह्युंदाई ने सुद्धा आपल्या i20 N Line फेसलिफ्ट मध्ये 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम फिजिकल व्हॉल्यूम नॉब सह ऑफर करणे सुरू ठेवले आहे.

ड्रायविंग एक्सपेरिअन्स आणि चांगले मायलेज दोन्हीचा मेळ साधता यावा यासाठी इको, सिटी आणि स्पोर्ट असे 3 ड्राइव्ह मोड देखील ऑफर करण्यात आले आहेत. केबिन मधील रिचनेस वाढावा यासाठी डोर ट्रिम वर सॉफ्ट-टच लेथरेट ऍड करण्यात आले आहे.

i20 N Line फेसलिफ्टच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये वायरलेस फोन चार्जर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पॅडल शिफ्टर्स, बोस साउंड सिस्टम, USB-C फोन चार्जर, रेड एम्बिएन्ट लाइटिंग, इलेक्ट्रिक सनरूफ, पुडल लॅम्प आणि स्पोर्टी एक्झॉस्ट यांचा समावेश आहे.
Hyundai i20 N लाइन फेसलिफ्ट — पॉवरट्रेन तपशील

Hyundai i20 N Line फेसलिफ्ट मध्ये पूर्वी प्रमाणेच 4 सिलेंडर 1.0L टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात येते. हे इंजिन 6000rpm वर 120PS पॉवर आणि 1500rpm आणि 4000rpm वर 172Nm टॉर्क निर्माण करते. नवीन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे जे 6-स्पीड ऑटो-क्लच मॅन्युअल ट्रान्समिशन शी बदलण्यात आले आहे. 7-स्पीड DCT पॅडल शिफ्टर्स चा ऑपशन पूर्वी प्रमाणेच चालू ठेवण्यात आले आहे.