MG Comet EV: एमजी कॉमेट ईव्ही वर 65,000 रुपयांपर्यंत सवलत

Published:

मॉरिस गॅरेज म्हणजेच MG मोटर्सने वर्ष्याअखेरदरम्यान MG Comet EV वर जवळजवळ 50,000 रुपयांच्या वर सुट मिळत आहे. ही कॉम्पॅक्ट चार-सीटर इलेक्ट्रिक कार असून या मॉडेल मध्ये पेस, प्ले आणि प्लस उपलब्ध आहेत, ज्याची किंमत रु. 7.98 लाख (एक्स-शोरूम). ही सूट केवळ MG कॉमेट EV वर नसून MG च्या अन्य गाड्यांवर सुद्धा अव्हेलेबल आहे.

एमजी कॉमेट ईव्ही बद्दल थोडक्यात

पेस, प्ले आणि प्लश या तीन मॉडेलसमध्ये उपलब्ध असणारी एमजी कॉमेट ईव्ही कार ४ सिटर आहे. 17.3 kWh बॅटरी क्षमता असणारी ही गाडी 230 किमी इतकी रेंज देते. रियर-व्हील ड्राइव्ह इलेक्ट्रिक मोटर ही 42 PS आणि 110 Nm देते. या गाडीसाठी 3.3kW चा चार्जर वापरला तर संपूर्ण गाडी चार्ज करण्यासाठी सात तास लागतात.

thmbnail 1 11

एमजी कॉमेट ईव्ही कार :प्रमुख वैशिष्ट्ये

या गाडीमध्ये फिचर्सच्या यादीत Android Auto आणि Apple CarPlay ,LED हेडलाइट्स आणि टेललाइट्स, वायरलेस सोबत इन्स्ट्रुमेंटेशन आणि इंफोटेनमेंटसाठी ड्युअल 10.25-इंच इंटिग्रेटेड डिजिटल स्क्रीनचा सेटअप प्रदान केला आहे. कीलेस एंट्री हेसुद्धा गाडीच्या अन्य वैशिष्ठापैकी एक वैशिष्ठ आहे.

एमजी कॉमेट ईव्ही कार: सुरक्षितता,रंग पर्याय आणि किंमत

या गाडीमध्ये प्रवाशी सेफेटीसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ISOFIX चाइल्ड सीट अँकर , EBD सह ABS, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि पार्किंग सेन्सर प्रदान केले आहेत.

दोन ड्युअल-टोन आणि तीन मोनोटोनमध्ये मिळणारी MG Comet EV मध्ये Apple Green with Starry Black, Candy White and Starry Black, Aurora Silver, Candy White, and Starry Black हे रंग पर्याय दिले आहेत.

एमजी कॉमेट ईव्ही: मूळ किंमत आणि सवलत

वेरीएंट्स एक्स-शोरूम प्राइस
कॉमेट ईवी पेस
Rs. 7.98 लाख
कॉमेट ईवी पेस गेमर
Rs. 8.63 लाख
कॉमेट ईवी
Rs. 9.28 लाख
कॉमेट ईवी प्ले गेमर इडिशन
Rs. 9.93 लाख
कॉमेट ईवी प्लश
Rs. 9.98 लाख
कॉमेट ईवी प्लश गेमर इडिशन
Rs. 10.63 लाख

जर तुम्ही या वर्षा अखेरच्या दरम्यान MG Comet EV बुक करण्याचं नियोजन करत असाल, तर MG कॉमेट EV घेण्याची ही अगदी योग्य वेळ आहे. कारण डिसेंबरमध्ये या गाडीवर रोख सवलत, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट बोनस आणि इतर विशेष योजनांच्या स्वरूपात जवळजवळ 65,000 रुपयापर्यंत सूट मिळू शकणार आहे . कॉमेट EV ची किंमत संपूर्ण भारतातील एक्स-शोरूम 7.98 लाख ते 9.98 लाख रुपये आहे.तुम्हाला या बाबतीत अधिक माहिती हवी असल्यास, तुम्ही जवळील MG-अधिकृत डीलरशीपशी संपर्क साधावा, अशी आम्ही शिफारस करतो.

हेपण वाचा:

MG Motor च्या ह्या ‘5’ गाड्यांच्या खरेदीवर भरभरून discount

Shahrukh’s first EV: किंग खानच्या ब्रँडेड कार्सच्या ताफ्यात ‘ह्युदाई लॉनिक ५’ ची एंट्री..!

Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version