नवीन Kia Sonet 2024 फेसलिफ्ट लाँच, फीचर्स, डिजाईन, स्पेसिफिकेशन्स आणि प्राईज

एंट्री-लेवल सबकॉम्पैक्ट Kia Sonet 2024 एसयूवी मध्ये जबरदस्त सेफटी फीचर्स आणि फ्रेश facelift डिजाईन दिले जाणार.

किया सॉनेट फेसलिफ्ट १२ जानेवारी २०२४ रोजी लाँच झाले. खरे तर या एसयूव्ही चे अनावरण डिसेंबर २०२३ मध्येच पार पडले होते आणि त्याच वेळी अनेक महत्चाचे फीचर्स या गाडीचे रिव्हिल केले गेले होते. गेले चार आठवडे गाडीचे ऑफिशिअल बुकिंग्स केल्या जात असून अनेक उत्साही ग्राहकांनी गाडी बुक देखील केली आहे. गाडी मध्ये केलेले अपडेट आणि बदल खाली सविस्तर सांगण्यात आले आहेत.

Kia Sonet 2024 Facelift: डिजाईन बदल आणि फीचर्स अपडेट्स

किया सॉनेट चे फ्रंट आणि रिअर बम्पर डिजाईन मध्ये बदल करण्यात आला आहे पूर्वी पेक्षा डिजाईन अधिक शार्प आणि स्टायलिस्ट देण्यात आली आहे. गाडीला एलईडी डीआरएल आणि कनेक्टेड टेललॅम्प्स सारखे लाईटींग एलेमेंट्स ऍड करण्यात आले आहेत. टेल गेट पूर्वी पेक्षा वेगळे असेल टेल लॅम्प्स अधिक स्लिक (पातळ) बनवण्यात आल्या आहेत. डॅशबोर्ड आणि कॉकपीट मध्ये देखील कमालीचे अपडेट्स दिले असल्याने गाडी पूर्वीपेक्षा आकर्षक वाटते. गाडीमध्ये एअर प्युरिफायर दिला आहे, ADAS लेव्हल १ चे सेफटी फीचर्स दिले गेले आहेत, 10.25-इंच डिजिटल ड्राइवर डिस्प्ले, 360-डिग्री कैमरा, ६ ऐरबॅग्स स्टॅंडर्ड, ४ वे एडजस्टेबल ड्राइवर सीट असे उच्च सेफटी असणारे फीचर्स दिले आहेत.

कलर्स, व्हेरिएंट्स आणि ट्रीम्स, फीचर्स – 

2024 Sonet व्हेरिएंट्स आणि ट्रीम्स – सॉनेट २०२४ मध्ये पूर्वीच्या मॉडेल प्रमाणेच ३ इंटिरियर ट्रीम्स दिले जाणार आहेत ज्यामध्ये X Line, GT Line आणि Tech Line. X Line या ट्रिम मध्ये काळ्या रंगाच्या डॅशबोर्ड इंटेरिअर सह हिरव्या रंगाचे लेदर अप होल्स्टरी सीट्स आणि छोटे इन्सर्ट एलेमेंट्स दिले जातात. GT Line मध्ये संपूर्ण काळ्या रंगात इंटिरियर, पांढरे इन्सर्ट एलेमेंट्स आणि काळे स्टीट्स दिले जातात. Tech Line या ट्रिम मध्ये ३ वेगवेगळे कलर ऑपशन्स उपलब्ध आहेत ज्यामध्ये बेस वेरिएंटमध्ये ऑल ब्लॅक इंटीरियरसह सेमी लेदरेट सीट्स आहेत, मिड व्हेरियंटमध्ये ड्युअल टोन इंटीरियरसह ब्लॅक आणि बेज सेमी-लेथरेट सीट्स आहेत. टॉप व्हेरिएंट मध्ये संपूर्ण ब्लॅक डॅशबोर्ड सह तपकिरी इन्सर्टसह ब्लॅक आणि तपकिरी लेदरेट सीट्स दिले गेले आहेत.

2024 Sonet कलर्स – Sonet 2024 मध्ये X-Line मध्ये फक्त Matte Graphite कलर दिला जातो. GT-Line मध्ये Intense Red + Aurora Black Pearl (लाल-काळा), Glacier White Pearl + Aurora Black Pearl (पांढरा-काळा), Gravity Grey (दगडी), Gravity Grey (संपूर्ण काळा), Intense Red (संपूर्ण लाल), Sparkling Silver (सिल्वर), Glacier White Pearl (पर्ल पांढरा), Pewter Olive (हिरवा), Imperial Blue (निळा) हे कलर्स ऑपशन्स उपलब्ध आहेत.

Facelift sonet फीचर्स – 2024 सोनेट फेसलिफ्ट पूर्वीचे सर्व फीचर्स आहे तसे राखून ठेवते या व्यतिरिक्त ADAS (ऍडव्हान्स ड्राइवर असिस्टंस सिस्टिम) लेव्हल १ सारखे सेफटी + कन्विनिएंट फीचर्स ऑफर करते.

 • फ्रंट कोलिशन वॉर्निंग (FCW) + अव्हॉइडन्स असीस्ट
 • लेन कीप असिस्ट
 • लेन डिपार्चर वॉर्निंग
 • हाय बीम असिस्ट
 • ड्राइवर अटेंशन वॉर्निंग
 • लेन फॉलोविंग असिस्ट
 • लिडिंग वेहिकल डिपार्चरअलर्ट

वाचा – नव्या ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्टचे वेटींग पिरियड जाणून घ्या किती असणार?

इंजिन पॉवरट्रेन

किया सॉनेट मध्ये ३ इंजिन पर्याय आणि ६ ट्रान्समिशन ऑपशन्स उपलब्ध आहे. सध्या सॉनेट २०२४ मध्ये मिळणारे इंजिन पर्याय पुढे वाचा –

डिजेल इंजिन पर्याय – 

 • 6-स्पीड ऑटो-क्लच मॅन्युअल ट्रान्समिशनसह 1.5L टर्बो डिझेल इंजिन
 • 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह 1.5L टर्बो डिझेल इंजिन
 • 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर स्वयंचलित ट्रांसमिशनसह 1.5L टर्बो डिझेल इंजिन

पेट्रोल इंजिन पर्याय – 

 • 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह 1.2L नॅच्युरल ऍस्पिरेटेड पेट्रोल इंजिन
 • 6-स्पीड ऑटो-क्लच मॅन्युअल ट्रान्समिशनसह 1.0L टर्बो पेट्रोल इंजिन
 • 7-स्पीड ड्युअल-क्लच स्वयंचलित ट्रांसमिशनसह 1.0L टर्बो पेट्रोल इंजिन
इंजिन1.2-लीटर पेट्रोल1-लीटर टर्बो-पेट्रोल1.5-लीटर डीजल
पॉवर83 पी.एस120 पी.एस116 पी.एस
टॉर्कः115 एनएम172 एनएम250 एनएम
ट्रान्समिशन5-स्पीड एमटी6-स्पीड iMT, 7-स्पीड DCT6-स्पीड iMT, 6-स्पीड एमटी, 6-स्पीड एटी

प्राईज – 

नवीन सॉनेट २०२४ च्या बे मॉडेल च्या किमती ८ लाखां पासून सुरु होतील आणि टॉप व्हेरिएंट १५ लाख रुपयांपर्यंत जातील. या ठिकाणी गाडीच्या सर्व किमती लवकरच अपडेट होतील.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment