नवीन “किया सोनेट” लाँच ₹7.99 लाख पासून सुरू होते, मिळते 22 kmpl मायलेज – वाचा व्हेरिएंटनुसार किंमत

Published:

Kia Sonet 2024 Facelift Prices in Maharashtra (Marathi) – किया इंडियाने १२ जानेवारी रोजी फेसलिफ्ट सॉनेट मॉडेल लाँच केले असून या गाडीच्या किंमती सुद्धा रिव्हिल केल्या आहेत. सॉनेट आता पूर्वी पेक्षा अधिक आक्रमक दिसते. नवीन फीचर्स आणि ADAS वैशिष्ट्यांमुळे गाडी अधिक ऍडव्हान्स झाली आहे. किया २०२४ सॉनेट सब ४ मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंट मध्ये मारुती फ्रॉन्क्स, ब्रेझा, टाटा नेक्सॉन, निसान मॅग्नाइट, रेनॉल्ट कायगर आणि महिंद्रा XUV300 या गाडयांना तगडे आव्हान देणार आहे.

New Kia Sonet 2024 Prices – कमी किंमती!

नवीन किया सॉनेट मध्ये सात ट्रिम्स ऑफर केल्या जात आहेत ज्यामध्ये HTE या बेस मॉडेल पासून ट्रिम सुरु होते पुढे HTK, HTK+, HTX, HTX+, GTX+ आणि X-Line पर्यंत रेंज दिली आहे. Engine ऑपशन्स मध्ये ३ पर्याय आहेत ज्यामध्ये 1.2 NA पेट्रोल इंजिन त्याच्या सह 5MT गियरबॉक्स ट्रान्समिशन, 1.0L टर्बो पेट्रोल सह iMT आणि 7DCT गियरबॉक्स ऑपशन आणि एकमात्र 1.5L टर्बो डिझेल इंजिन सह 6MT, 6iMT आणि 6TC ट्रान्समिशन पर्याय.

kia sonet 2024

किया सॉनेट 2024 महाराष्ट्रातील किंमती:

खाली दिलेल्या सर्व किमती एक्स-शोरूम आहेत.

  • HTE – 7,99,000/-
  • HTK+ G1.0T iMT – रु.10,49,000/-
  • HTX G1.0T DCT – रु.12,29,000/-
  • HTX 1.5 CRDi iMT – रु.12,59,900/-
  • HTE 1.5 CRDi MT – रु.9.79,000/-
  • X-Line 1.5 CRDi AT – रु.15,69,000/-

किया सॉनेट ऑन रोड प्राईज लिस्ट – पहा किया सॉनेट २०२४ च्या महाराष्ट्रातील सर्व व्हेरिएंट्सच्या ऑन रोड प्राईज

डायमेन्शन्स – 

डायमेन्शन्स एमएम फूट
लांबी 3995 13.10
रुंदी 1790 5.87
उंची 1642 5.38
व्हीलबेस 2500 8.20

स्टोरेज – 

बूट स्टोरेज 392L
ग्राउंड क्लिअरन्स 205mm
इंधन टाकी 45L

 

New Kia Sonet 2024 Facelift Petrol & Diesel Mileage 

  • 1.5 डिझेल मॅन्युअल – 22.30kmpl
  • 1.5 डिझेल ऑटोमॅटिक – 18.60kmpl
  • 1.2 पेट्रोल मॅन्युअल – 18.83kmpl
  • 1.0 टर्बो पेट्रोल मॅन्युअल – 18.70kmpl
  • 1.0 टर्बो पेट्रोल ऑटोमॅटिक –  19.20kmpl
  • 1.5 डिझेल मॅन्युअल ACMT 116PS –  22.30kmpl

फीचर्स अपग्रेडस बाबत

नवीन सोनेटमध्ये सर्व प्रकारांमध्येस्टॅंडर्ड म्हणून 6-एअरबॅग कंपलसरी असतील यावर सेफटी मध्ये भर टाकण्यासाठी कॅमेरा बेस ADAS (ऍडव्हान्स ड्राइव्हर असिस्टं सिस्टिम) आणि 360° कॅमेरा सारखे प्रीमियम फीचर्स ऑफर केले जातील. सध्या भारतीय मार्केट मध्ये सब ४ मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंट लिस्ट मध्ये किया सॉनेट एकमेव ADAS हे सेफटी फिचर ऑफर करते त्यामुळे या गाडीच्या विक्रीला येत्या काही महिन्यात चालना मिळू शकते. या व्यतिरकीत 4-वे अॅडजस्टेबल सीट्स, ट्रॅक्शन मोड हे फीचर्स देखील सेगमेंट-फर्स्ट आहेत. गाडीची अजून माहिती वाचण्यासाठी किया सॉनेट फिचर्सचा लेख जरूर वाचा.

🤫 नेक्सॉन कोमात -  2024 KIA Sonet Facelift Review, Features Explain & Maharashtra's On Road Price

Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version