मारुती सुझुकी स्विफ्ट ADAS लेव्हल २ सह अपडेट होणार, देणार ४० kmpl चे मायलेज, जाणून घ्या खास माहिती

Ajinkya Sidwadkar

Maruti Suzuki Swift with ADAS: जपान कार मेकर कंपनी सुझुकीने नवीन जनरेशनची स्विफ्ट रिव्हिल केली आहे ज्यामध्ये नवीन जनरेशनचे अपडेट्स देण्यात आले आहेत. स्विफ्ट हि भारतातील नंबर १ ची सेल होणारी hatchback आहे. मारुती सुझुकी इंडिया लवकरच ADAS म्हणजे ऍडव्हान्स ड्रायव्हर अस्सिस्टन्ट सिस्टिम लेव्हल २ चे फीचर्स स्विफ्ट मध्ये अपडेट करून येत्या काही महिन्यात भारतात विक्री साठी उपलब्ध करणार आहे. जपान ऑटो शोमध्ये शोकेस केलेली स्विफ्ट, कॉन्सेप्ट स्वरूपात असली तरी ती उत्पादनासाठी तयार दिसते आणि नवीन स्विफ्ट काय अपडेट असेल याची झलक देते.

2 29.jpg

एक्सटेरिअर अपग्रेडस

3 23.jpg

नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट मध्ये संपूर्ण स्टान्स, डिजाईन, शेप, कर्व सध्याच्या स्विफ्टशी संलग्न असणार आहेत. तथापि, हेडलॅम्प, टेललॅम्प, पुढचा आणि पाठीमागचा बम्पर यांच्या डिजाईन मध्ये बदल करण्यात आला असून गाडी अधिक स्पोर्टी दिसण्यासाठी बदल करण्यात आले आहेत. ब्लॅक रूफ आणि निळ्या कलर मध्ये शोकेस केलेले मॉडेलला लूक हा अधिक स्पोर्टी आणि अग्रेसिव्ह दिसला.

4 13.jpg

नवीन DRLs, अधिक शार्प पॅटर्नसह नवीन ग्रील, फ्रेश फ्रंट क्रोम स्ट्रिप, नवीन फॉग लॅम्प आणि एक स्पोर्टियर दिसणारा बंपर यामुळे येत्या काही महिन्यात विक्रीसाठी उपलब्द होणारी स्विफ्ट चौथ्या जनरेशनची असेल.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

इंटेरिअर अपग्रेडस

1 26.jpg

एक्सटेरिअर प्रमाणे स्विफ्टच्या इंटिरिअर मध्येही बदल करून अपग्रेडस केले आहेत. नवीन जनरेशन च्या हॅचबॅकमध्ये संपूर्ण नवीन कॉकपीट, मोठा ९ इंच असणारा टचस्क्रीन, नवीन डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ३६०-डिग्री कॅमेरा, नवीन एसी व्हेंट्स, वायरलेस एंड्रॉइड ऑटो और एप्पल कार प्ले, वायरलेस चार्जिंग पॅड, इलेकट्रीक सनरूफ, ऍडव्हान्स ड्रायव्हर अस्सिस्टन्ट सिस्टिम लेव्हल २, हाइब्रिड इंजिन असे बरेच काही अपडेट्स मिळतील. हे फीचर्स उघड झाले असले तरी मारुती सुझुकीने काहीही माहिती ऑफिशिअली दिलेली नाही.

इंजिन अपग्रेडस

आगामी नवीन सुझुकी स्विफ्टच्या इंजिन पॉवर आणि मायलेजबद्दल मीडिया रिपोर्ट्सनुसार अशी माहिती समोर आली आहे किया, यात सध्याचेच 1.2 लीटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन असेल, जे स्ट्रॉंग हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. या नेक्स्ट जनरेशन हॅचबॅकचे मायलेज 35-40 kmpl पर्यंत असू शकते असे सांगितले जात आहे. असे म्हटले जात आहे की भारतात हे सध्याच्या K-सीरीज इंजिनसह दुसरा पर्याय म्हणून स्ट्रॉंग हायब्रीड इंजिन पर्याय सादर केले जाईल.

लाँच आणि किंमत

चौथ्या जनरल सुझुकी स्विफ्टने टोकियो मोटर शोमध्ये कॉन्सेप्ट अवतारात पदार्पण केले आहे. तथापि, हे प्रोटो टाईप दिसते. नवीन जनरेशन स्विफ्ट या वर्षाच्या अखेरीस जपानमध्ये लॉन्च होईल आणि 2024 च्या सुरुवातीला भारतातविक्री साठी उपलब्ध केली जाणार आहे. नवीन फीचर्स आणि बदल यामुळे नवीन स्विफ्ट सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत ८० हजार ते 1 लाख रुपयांनी महाग असेल.

माहितीचा सोर्स

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment