टाटा कर्वचा शानदार लुक, पावरफुल इंजन आणि कमाल फीचर्स जाणून घ्या

Published:

नेक्सॉन आणि पंच लाँच करून, सब-4 मीटर एसयूव्ही सेगमेंट मध्ये आपले मजबुतीने पाय रोवल्या नंतर टाटा मोटर्स, ह्युंदाई आणि मारुती या तगड्या खेळाडूंना चितपट करण्यासाठी सज्ज आहे. नेक्सॉन आणि हॅरिअर मधील गॅप भरण्यासाठी टाटा मोटर्स लाँच करणार आहे, त्यांची पहिली कॉम्पैक्ट एसयुव्ही ‘टाटा कर्व’. टाटाची ही कार इलेक्ट्रिक, डिजेल आणि पेट्रोल अश्या पर्यायांमध्ये हि ‘क्रॉसओवर’ प्रकारची गाडी लाँच होणार आहे.

टाटा कर्व डायमेन्शन्स

टाटा कर्वच्या डायमेन्शन्स बद्दल बोलायचे झाल्यास, SUV ची लांबी 430 8mm, रुंदी 1810 mm आणि उंची 1630 mm आहे, व्हीलबेस 2560mm आहे आणि टाटा कर्व 422 लीटरच्या बूट स्पेससह येईल. क्रेटा फेसलिफ्टच्या तुलनेत, Curvv लांबीने 22 mm कमी आहे, व्हील बेस शी तुलना केली, तर सुमारे 50 mm ने छोटे आहेत आणि फक्त 5 मिमी उंची ने कमी आहे. तथापि, टाटा curvv Creta पेक्षा 20mm ने रुंद आहे.

टाटा कर्व इंजिन

टाटा curvv मध्ये 1.2 Litre Turbo Petrol Revotron Engine दिले जाईल, जे 88.2 ps power, 170 nm Torque प्रोड्युस करते.दुसरं 1.5L Turbocharged Revotorq Diesel Engine दिलं जाईल. हि मशीन 113bhp आणि 260 nm Torque प्रोड्युस करते. महत्वाचं म्हणजे दोन्ही इंजिन सध्या नेक्सॉन मध्ये दिले जात आहेत. यामध्ये 1.5 litre Turbo Petrol पर्याय देखील दिला जाईल. हे इंजिन 168bhp and 280Nm of torque जनरेट करते. सर्व इंजिन पर्यायात ऑटो आणि मॅन्युअल गेअरबॉक्स ऑपशन्स उपलब्ध असतील. टाटा मोटर्स प्रेस रिलीज मध्ये डिजेल इंजिन साठी फक्त 6 स्पीड मॅन्युअल गेअरबॉक्स मेन्शन केला आहे पण लाँच वेळी ऑटोमॅटिक transmistion दिले जाऊ शकते अशी अपेक्षा करू. 

curvv चे इलेक्ट्रिक व्हर्जन सुद्धा लाँच होणार आहे. Curvv EV टाटा मोटर्स च्या नव्या active प्लॅटफॉर्म वर आधारित असेल आणि या मध्ये 50 kWh बॅटरी पॅक दिला जाईल ज्यामुळे ५०० किलोमीटर प्रति चार्ज क्लेम रेंज मिळेल. मोटर बाबत अधिक माहिती तूर्तास उपलब्ध नाही.

वाचा: लाँच पूर्वीच “ह्युंदाई क्रेटा 2024 फेसलिफ्ट” चा विडिओ वायरल, पहा कशी दिसते आता

टाटा कर्व डिजाईन 

कर्व चे फायनल प्रोडूकशन व्हर्जन भारत मोबिलिटी एक्स्पो मध्ये दाखवण्यात आले आहे. दाखवण्यात आलेले व्हर्जन केशरी कलर चे होते. हि गाडी संपूर्ण बाजूने स्पोर्टी आहे. Curvv समोरून नेक्सॉन आणि हॅरिअर चे कॉम्बिनेशन दिसते आहे. ग्रिल आणि त्याच्या बाजूचे डिजाईन पॅटर्न, हेडलॅम्प,फॉगलपं, इंडिकेटर्स,कनेक्टड एलईडी बार हे सर्व फीचर्स harrier या एसयूव्ही शी तंतोतंत जुळते आहेत. बंपरच्या खालच्या भागासोबत पाठीमागचा भाग सुद्धा नेक्सॉन शी तंतोतंत जुळतो आहे. पण टेल लॅम्प मात्र इथे पातळ ठेवल्या आहेत. 

साईड प्रोफाइल पारंपरिक डिझाइन पॅटर्नला फॉलो करत नाही. सरळ शार्प लाईन्स आणि मेटल बेन्डस यामुळे नवीन शैली या गाडीत बाजूने बघायला मिळते. जाड बॉडी कॅलॅडींग, चौकोनी डिजाईनचे व्हील आर्च यामुळे गाडी नेक्सॉन पेक्षा अग्रेसिव्ह दिसते. सांडशीच्या आकाराचे 18 इंच मोठे ड्युअल टोन अलोय व्हील्स गाडीचे अधिमूल्य वाढवते, म्हणजे प्रीमियमनेस वाढवते.

गाडीच्या इतर डिटेल्स वर नजर टाकली, तर खिडक्यांना असलेली chrome ओउटलीने, स्लोपींग रूफ लाईन, फ्लश टाईप डोर हॅन्डल यामुळे नवीन काहीतरी ऍड झालं आहे हे लक्ष्यात येत. गाडीचा ग्राउंड clearance बाबत अचूक माहिती सध्या तरी बाहेर पडली नाहीये पण नेक्सॉन, harrier आणि सफारी यांच्या पेक्षाही जास्त असेल, असा अंदाज आहे.

वाचा: Kinetic Luna Electric: चल मेरी लुना! ₹५०० रुपयांत बुक करा ई-लुना, किंमत फक्त

टाटा कर्व फीचर्स

Curvv मध्ये नेक्सॉन प्रमाणेच, 10.25-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट स्क्रीन, हरमन JBL स्पीकर्स सह येण्याची अपेक्षा आहे या व्यतिरिक्त वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले आणि 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर क्लस्टर दिले जाण्याची अपेक्षित आहे. कारच्या आत अपेक्षित असलेल्या इतर प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये मोठ्या पॅनोरामिक सनरूफचा समावेश असेल, मध्यभागी प्रकाशित लोगोसह टू-स्पोक स्टीयरिंग व्हील, वायरलेस चार्जिंगपॅड, हवेशीर फ्रंट सीट्स, एअर प्युरिफायर. रिअर AC व्हेंट्स. आणि ADAS सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात.

वाचा: ‘स्वस्तात मस्त’ टाटाची Altroz Racer, टाटाची डायरेक्ट ह्युंदाईशी टक्कर

टाटा कर्व लाँच आणि किंमत

टाटा मोटर्स ने curvv लाँच होणार असल्याचे प्रेस रिलीज केले आहे, तर हि गाडी 2024 च्या सेकंड quarter मध्ये लाँच होऊ शकते; म्हणजे एप्रिल ते जून 2024 च्या दरम्यान. गाडीची किंमत रिव्हिल झालेली नाहीये, पण अपेक्षा आहे कि रेंज नेक्सॉन पेक्षा जास्त आणि harrier पेक्षा कमी असेल. राहिली चर्चा ev curvv ची, तर हि गाडी MG ZSev शी स्पर्धा करणार आहे. त्यामुळे 25 – 26 लाखांच्या आसपास गाडीची on-रोड किंमत असण्याचे अपेक्षित आहे.

बाप रे 😱 Tata Curvv!

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version