नवीन जनरेशन प्रीमियम सेगमेंटच्या हॅरियर आणि सफारी होणार लाँच होणार आहे. १७ ऑक्टोबर २०२३ रोजी कंपनी अधिकृत रित्या गाडीचे अनावरण करणार असून किमती सुद्धा जाहीर केल्या जाणार आहेत. मिळालेल्या माहिती नुसार सफारी आणि हॅरियर मध्ये अडस फीचर्स, जेशचर कंट्रोल बूट आणि व्हाईट एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स देण्यात येणार आहेत.
हायलाईट्स
- १७ ऑक्टोबर रोजी किमती जाहीर होणार.
- १६ लाख रुपयां पासून पुढे किंमती सुरु.
- बेस व्हेरिएंट मध्ये मिळणार सर्व सेफटी फीचर्स
टाटा मोटर्सने नुकतेच हॅरियर आणि सफारीचे ब्रोशर सार्वजनिक केले आहेत. या ब्रोशर नुसार दोन्ही वाहन आता पूर्वीपेक्षा आधीकी अद्ययावत असतील.
👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप
टाटा सफारी, हॅरियर डिजाईन अपडेट
टाटा सफारी आणि हॅरियर मध्ये सर्वात मोठा बदल झालेला आहे या वाहनांच्या डिजाईन आणि लुक मध्ये. आता नवीन मॉडेल महदये पॅरामेट्रिक ग्रिल, कनेक्टेड एलईडी डीआरएल्स आणि कनेक्टड एलईडी टेल गेट दिले गेले आहे जे या फेसलिफ्ट चे मुख्य आकर्षण आहे. नेक्सन पासून टाटा मोटर्स ची बदलली डिजाईन लँग्वेज सफारी आणि हॅरियर मध्ये आधीक अग्रेसिव्ह झालेली पाहायला मिळते. दोन्ही एसयूव्हीज मध्ये रिडिजाइन केलेले आलोय व्हील्स दिलेले आहेत. सफारी आणि हॅरियर मध्ये पूर्वी सारखी डिझाईनची एकसमानता न ठेवता पुढच्या ग्रील मध्ये भिन्नता ठेवली आहे.
दोन्ही मॉडेल्स चे इंटेरिअर सुद्धा मोठ्या बदलणे सुधारण्यात आले आहे. केबिन मध्ये आता नवीन अपहोल्स्टरी आणि अद्ययावत फीचर्स सह सीट्स दिलेले आहेत. डॅशबोर्डवर नवीन वूड ट्रिम फिनिश दिली आहे ज्याने कॉकपीट प्रीमियम वाटते. सफारी एसयूव्ही च्या सेकंड रो मध्ये कॅप्टन सीट्स आणि कम्फर्टेबल हेडरेस्ट देण्यात आले आहेत ज्याने प्रवास अधिक सुखकर होईल. केबिन मध्ये जास्तीत जास्त काळ्या रंगाचा वापर केल्याने दोन्ही एसयूव्हीज खूप प्रीमियम अनुभव देतील.
टाटा सफारी, हॅरियर फीचर्स अपडेट
सध्या भारतीय मार्केट मध्ये कोरियन ब्रॅण्ड्स फीचर्स मुळे जास्त पसंत केले जातात त्यांना मात देण्यासाठी आणि एक पाऊल पुढे टाकण्यासाठी टाटा मोटर्स ने सफरी आणि हर्रीर मध्ये फीचर्स चा भडीमार केला आहे. नवीन चार स्पोक असणारे नवीन स्टेरिंग चमकणाऱ्या लोगो सह देण्यात येते. टच बेस ऑटोमॅटिक एसी कंट्रोल्स डॅशबोर्ड वर देण्यात आले आहेत. १२.३० इंचाची नवीन हरमन ने डिजाईन केलेली टच इंफोटेंमेंट सिस्टिम सोबत १०.२५ इंचाचा ड्राइवर इन्ट्रुमेन्ट कन्सोल डिस्प्ले दिला आहे. ड्रायवर डिस्प्ले वर सुद्धा नेव्हिगेशन पाहण्याची सोया दिली आहे. दोन्ही एसयूव्ही मध्ये फ्रंट सीट्स व्हेंटिलेड दिलेले आहेत. गाणी ऐकण्याचा अनुभव द्विगुणित व्हावा याकरिता टाटा मोटर्स ने १० जेबीएल कंपनीचे स्पीकर्स दिलेले आहेत.
टाटा सफारी, हॅरियर सेफटी फीचर्स अपडेट
टाटा सफारी आणि हॅरियर दोन्ही एसयूव्ही मध्ये लँड रोव्हर कंपनींच्या OMEGARC D8 हा प्लॅटफॉर्म वापरण्यात आला आहे त्यामुळे फाईव्ह स्टार सेफटी स्कोर या वाहनांना भारत एनकॅप मध्ये मिळेल अशी अपेक्षा आहे. दोन्ही मध्ये ७ एअरबॅग्स चा ऑपशन दिलेला आहे तर ६ ऐरबॅग्स या कंपलसरी स्टॅंडर्ड दिली आहेत. टॉप मॉडेल मध्ये १ ऐरबॅग ड्रायवर च्या गुढग्यांचे संरक्षण करण्यासाठी अंडर डॅश बोर्ड दिलेली आहे. ड्रायविंग सेफटी साठी लेवल २ ची अडास टेक्नोलोंजि वापरलेली आहे, यामध्ये ड्रायविंगसाठी १७ अससिटीव्ह फीचर्स दिलेले आहेत. इतर सेफटी मध्ये एबीएस विथ ईबीडी, इलेकट्रोनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम, टायर प्रेशर मॉनेटरिंग सिस्टिम, क्रूज कंट्रोल, ड्रायवर अटेन्शन अलर्ट, हिल असेन्ट आणि डिसेंट कंट्रोल, एसओएस कॉल आणि ब्रेक डाउन अलर्ट असे इतर फीचर्स दिलेले आहेत.
इंजिन, गेअरबॉक्स आणि मायलेज
टाटा हॅरियर आणि सफारी मध्ये फक्त २ लिटर ४ सिलेंडर टर्बो चार्ज डिझेल इंजिनचा ऑपशन उपलब्ध आहे. हे इंजिन स्टेलांटीस या ग्रुप ने डेव्हलोप केलं आहे. स्टेलांटीस ग्रुप, हे इंजिन त्यांच्या जीप कंपास मध्ये युज करते. टाटा मोटर्सने त्या इंजिनला Kryotec नाव दिले आहे. हे इंजिन १७० ps & 350nm टॉर्क प्रोड्युस करते. हॅरियर मध्ये ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक विथ टॉर्क कनवर्टर ट्रान्समिशनचा पर्याय दिला आहे.
मॅन्युअल गेअरबॉक्स असणारी हॅरियर १६.८० किलोमीटर प्रति लिटरचे क्लेम मायलेज प्रदान करेल जे पूर्वीच्या हॅरियर पेक्षा जास्त आहे. ऑटोमॅटिक गेअरबॉक्स असणारी हॅरियर १४.६० किलोमीटर प्रति लिटरचे क्लेम मायलेज प्रदान करेल जे पहिल्या सेम गेअरबॉक्स असणाऱ्या हॅरियर पेक्षा कमी आहे. मॅन्युअल गेअरबॉक्स असणारी सफारी १६.३० किलोमीटर प्रति लिटरचे क्लेम मायलेज तर ऑटोमॅटिक सफारी १४.५० किलोमीटर प्रति लिटरचे क्लेम मायलेज प्रदान करेल.
नोट – किंमती जाहीर झाल्यास इथे अपडेट होतील.