टाटा मोटर्स बाजारात आणणार CNG ऑटोमॅटिक कार, वाचा वैशिष्ठ्य

दोन CNG सिलेंडर तंत्रज्ञान सर्वात प्रथम भारतीय बाजारात आणल्यानंतर Tata Motors आता Tigor and Tiago CNG Automatic कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. CNG कार मध्ये ऑटोमॅटिक गियर बॉक्स ट्रान्समिशन आणणारी टाटा मोटर्स जगातील पहिली कंपनी आहे.

सध्या दोन्ही हॅचबॅक पेट्रोल, CNG आणि इलेक्ट्रिक अश्या दोन्ही पर्यायात उपलब्ध आहेत परंतु CNG इंजिन सह ऑटोमॅटिक ऑप्शन येणार आहे. डिसेंबर 2023 मध्ये टियागो आणि टिगोरच्या सेल कमी झाला आहे आणि जानेवारी मध्ये हा सेल अजून खाली येण्याची शक्यता आहे. परंतु ऑटोमेकर येत्या काही महिन्यात CNG AMT verient लाँच करू शकते ज्यामुळे सेल पुन्हा वाढू शकतो.

Tata Tiago, Tigor CNG AMT मॉडेल्स –

टाटा मोटर्स ने सोशल मीडिया द्वारे नवीन आगामी CNG automatic टियागो आणि टिगोरच्या मोडेलचा व्हिडिओ टिजर जारी केला आहे.

Tata Motors CNG AMT हा गियर बॉक्स ऑप्शन टियागो आणि टिगोरच्या XT आणि XZ+ या ट्रिम मध्ये ऑफर केला जाणार आहे. या एका छोट्या बदलामुळे कंपनीच्या सेल्स मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या दोन्ही वाहनात पेट्रोल १.२ ली. इंजिन सोबत ५ स्पीड मैन्युअल आणि ऑटोमॅटिक गियर बॉक्स दिला जातो. सध्या CNG वेरिएंट मध्ये फक्त ५ स्पीड मैन्युअल गियर बॉक्स ऑप्शन उपलब्ध आहे. या CNG इंजिन मध्ये 73.5 hp आणि 95 Nm टॉर्क प्रोड्यूस करण्याची क्षमता आहे.

वाचा – TATA Nexon सोबत वाढली, टाटाच्या ‘या’ टॉप गाड्यांची किंमत

एकदा दोन्ही गाड्यांचे CNG AMT मॉडेल बाजारात उतरले की या देशातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या AMT कार मध्ये नंबर 1 च्या कार बनणार आहेत. असे असले तरी manual गियर बॉक्सच्या तुलनेत AMT मध्ये मयलेज कमलीचे कमी होईल.

किंमत –

टाटा टियागो CNG या गाडीची सध्या किंमत 6.50 लाख आणि टीगोर CNG ची किंमत 7.80 लाख रुपयांपासून सुरू होते, आगामी AMT CNG वेरिएंट manual पेक्षा 60 ते 70 हजारांनी महाग असणार आहे.

टिगोर CNG ही गाडी मारुतीच्या डिजायर आणि ह्युंदाई ऑरा या सब कॉम्पॅक्ट सिडानशी प्रतिस्पर्धा आहे तर टियागो या हॉट हॅचबॅक कारचे मारुती सेलेरिओ, वॅगनआर आणि ह्युंदाई निओस या CNG वाहनांशी आहे. पण टिगोर आणि टियागो एकमेव CNG AMT ट्रान्समिशन असणारी वाहनं असल्यानं कोणत्याही वाहानाशी प्रतिस्पर्धा असणार नाही. टाटा मोटर्स भविष्यात याच पावलावर चालत पंच आणि अल्ट्रोज CNG चे AMT वेरिएंट लॉन्च करेल.

 

 

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment