Tata Harrier EV: नव्या वर्षात बऱ्याच मोठ-मोठ्या इलेक्ट्रिक वाहन कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक कारसोबत आगमनाच्या मार्गावर आहेत; त्यातलीच विश्वासू आणि नामांकित कंपनी म्हणजे Tata Motors. टाटा मोटर्स लवकरच त्याच्या लोकप्रिय हॅरियरची इलेक्ट्रिक आवृत्ती म्हणजेच हॅरियर ईव्ही घेऊन येणार आहे, हो..! अगदी योग्य बातमी वाचत आहेत, लवकरच टाटा, पंच इव्ही नंतर नवीन Tata Harrier EV सोबत मार्केटमध्ये दमदार एंट्री करणार आहे. टाटा हॅरियर ईव्हीच हे ‘ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत आकर्षक आणि मजबूत डिझाइन’ असणारं हे मॉडेल ‘ऑल-इलेक्ट्रिक हॅरियरची आवृत्ती’ म्हणून ओळखले जाईल.
टाटा पंच EV नंतर एसयूव्हीचा बाप करणार एंट्री
टाटा हॅरियर इव्हीच्या डिझाइनचा इंटरनेटवर धुमाकूळ
Tata Harrier EV ला मिळणार 500km पर्यंत रेंज आणि जबरदस्त फीचर्स
इलेक्ट्रिक हॅरियर मध्ये 500km पर्यंत रेंज मिळण्याची शक्यता मांडली जातेय, हे अंतर पार करण्यासाठी या इलेक्ट्रिक SUV मध्ये अंदाजे 60 kWh ते 80 kWh पर्यंतचा एक मजबूत बॅटरी पॅक असू शकतो.
दोन-स्पोक स्टीयरिंग व्हील, पॅनोरामिक सनरूफ, टच-बेस्ड HVAC कंट्रोल ,ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) सूट आणि 360° सराउंड व्ह्यू कॅमेरा, याशिवाय या इलेक्ट्रिक SUV मध्ये आधुनिक फीचर्स जसं ज्वेलेड गियर डायल आणि 10.25-इंच इंफोटेनमेंट स्क्रीन, वायरलेस चार्जिंग, एअर प्युरिफायर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड आणि पॉवरफुल फ्रंट सीट्स यांचा समावेश आहे.
या टाटा इलेक्ट्रिक हॅरियरचे प्रतिस्पर्धी क्रेटा ईव्ही आणि होंडा एलिव्हेट ईव्ही ठरू शकतात. या एसयूव्हीची किंमत रु. 22.00 – 25.00 लाख अंदाजित किंमत असल्याची शक्यता मांडली जातेय. 2024 च्या नवीन वर्षाच्या येत्या काही महिन्यांत हि एसयूव्ही ईव्ही लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.